Monday, 16 May 2022

प्रमेह / मधुमेह / Prediabetes / Diabetes

1) डायबेटिस साठी असलेल्या औषधांनी फक्त साखर वाढणे मर्यादित करणे हे अगदी वरवरची ट्रिटमेंट आहे. कारण रक्तातील साखर नियंत्रणात येण्यासाठी औषधाचे प्रमाण वाढत जाते व आतून ह्रदय, किडनी, डोळे, रक्तवाहिन्या ह्यांचे स्वास्थ्य बिघडत जाते. 

2) सर्व प्रकारच्या Pre diabetes ,Diabetes  रुग्णांनी दिनचर्या, पथ्यकर आहार विहार करावा. तसेच बस्ति, वमन, विरेचन, रक्तमोक्षण अशा अनेक आयुर्वेदिक उपचार पद्धती ने आरोग्य टिकवावे. 

***रक्तातील साखर नियंत्रणात असणे महत्वाचे आहेच पण त्याचबरोबर  अवयवांचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रयत्न करणे अतिशय आवश्यक आहे. 

Vd Pratibha Bhave 

8766740253

लहान मुलांमधिल #मानसिक आजार व त्यावर आयुर्वेदिक उपचार

सद्ध्या लहानमुलांना मध्ये मानसिक आजाराचे  प्रमाण वाढले आहे.  #AttentionDeficitHyperactivityDisorder(ADHD) ह्या मानसिक आजार चे प्रमाण सर्वाधिक आहे.  

**#ADHD ची साधारणपणे आढळणारी लक्षणे:-

  • ही मुले स्वतः च्याच विश्वात असतात. दुसऱ्यांच्या भावना समजू शकत नाही 
  • भावना फक्त स्वतः पूरत्याच मर्यादित असल्याने मनासारखे झाले नाही तर तांडव करतात. समजावून सांगणे अवघड असते
  • दुसऱ्यांच्या कामात मुद्दाम व्यत्यय आणतात 
  • विनाकारण खूप चिडणे, रागाने अंगावर धावून येणे,वस्तू फेकणे, मारणे अशी लक्षणे दिसतात 
  • ही मुले एका जागेवर स्थिर राहत नाही. सारखे फिरत राहतात, पळतात. जबरदस्तीने खुर्चीत बसवले तर चुळबुळ करतात, मान, डोळे, हातपाय हलवतात. 
  • अशा मुलांना व्यवस्थितपणे खेळणे अवघड जाते. चित्र काढणे, पेंटिंग करणे संगित शिकणे,अशा इतर कला शिकण्यासाठी  एकाग्रता नसते. 
  • अनेक काम करण्यासाठी ही मुले इच्छा आहे असे दाखवू शकतात पण ते पूर्ण करु शकत नाही. एक काम अर्धवट सोडून दुसरे करायला लागतात.
  • एकाग्रता नसल्याने आपण जे बोललो तेच परत सांगायला लावले तर ते जमत नाही. 
  • बुद्धी चे काम करतांना ताण पडतो म्हणून ते करायला टाळाटाळ करतात. बराचवेळ कामे विसरून जातात. ही मुले शाळेत मागे पडतात 
  • सांगितलेल्या गोष्टी पार पाडणे त्यांना कठीण जाते त्यामुळे खुप चुका होतात. ह्याचा अर्थ ते बुद्धी ने मंद असतात किंवा आळशी असतात असे नव्हे. 
  • काही मुलांमध्ये स्वप्नाळूपणा दिसून येतो .ही शांत बसून राहतात व इतर मुलांशी अजिबात मिसळत नाही. बाहेर काय चालले आहे  ह्याचे भान नसते
  • जर व्यवस्थित उपाय केले नाही तर ही मुले मोठी झाल्यावर इतर त्याच्या वयाच्या मुलाप्रमाणे वैचारिक प्रगल्भता नसते. Driving skill, निर्णय क्षमतेची कमतरता आढळते.म्हणून अशा मुलांसाठी बाल्यावस्थेपासूनच मानसिक स्वास्थ्यासाठी प्रयत्नशील असायला  हवे

************

आजार दूर करण्यासाठी उपाययोजना :-

************

मनोविकार तज्ञ केमिकल औषधांनी हा आजार 80%नियंत्रणात आणतात, परंतु त्या औषधांचे ह्या लहान मुलांवर खुप वाईट परिणाम होतात. 

-आयुर्वेदिक उपचार - 

*********

*आयुर्वेदीक पद्धती ने हा आजार खूप चांगल्या प्रकारे नियंत्रणात आणला जातो. तसेच औषधे बिनविषारी आहेत. जसे

*ब्राम्ही, शंखपुष्पी, अश्वगंधा, जेष्ठमध, जटामांसी वेखंड, पिंपळी, कुमारकल्याणघृत इत्यादी औषधे योग्य प्रमाणात दिली जातात 

 *तसेच षष्ठीशाली पिंडाने/औषधीयुक्त तेलाने संपूर्ण शरीराची मालिश केली जाते 

*दुधाची धार, विशिष्ट अंतरावर, 30ते 45 मिनिटे सतत कपाळावर विशिष्ट पद्धतीने सोडणे. असे दर महिन्याला 14 दिवस 

*श्लोक पाठांतर करुन घेणे 

*व्यायाम करवून घेणे

*आहार व दिनचर्या ठरवून देणे. 

ह्या सारख्या आयुर्वेदिक उपायांनी मानसिक आजार बरा होतो. 


Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 

8766740253

PCOS / PCOD



ज्या स्त्रियांना /मुलींना 

PCOS /PCOD असेल तर  त्यांना पाळीच्या तक्रारी असतातच त्याशिवाय इतर अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात. 

जसे-

1) गर्भ न राहणे 

2) गर्भ राहिला तरी तो न टिकणे

3) प्रमेह ,मधुमेह (Diabetes) 

4) गर्भाशयाचा कॅन्सर 

5) रक्तात lipid चे असंतुलन होणे

6) हृदयाच्या कार्यात अडथळा येणे

7) घोरण्याचे प्रमाण वाढणे, 

8) झोपेत श्वास घेण्यास अडथळा येणे(Obstructive sleep apnea) 

*म्हणून वेळेत pcod/pcos नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. 

त्यासाठी स्रीरोग तज्ञाकडून तपासणी करुन आहार, विहार, व्यायाम व औषधाने आरोग्यासाठी प्रयत्न करावा. 


Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 

8766740253

द्राक्षा/मनुका उन्हाळ्यात सर्वांनीच खावे

1) ताजे व सूकलेले असे दोन्ही प्रकारे द्राक्षांचा औषधात उपयोग केला जातो. ते थकवा घालवणारे, कंठ शुद्धी करणारे,शुक्र वाढवणारे, डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे फळ आहे. 

2) हे फळ शरीरात थंड व स्निग्ध गुण निर्माण करणारे आहे त्यामुळे पित्त व वात कमी करतो. 

3) रक्त शुद्ध करतो, मांस व शुक्र वाढवतो 

4) मल व मुत्रप्रवृत्ती करण्यासाठी मदत करतो

5) उन्हाळ्यात उन लागल्यामुळे ताप आला असेल, तहान, उलट्या होणे, ही लक्षणे असल्यास  गरमपाण्यात मनुका टाकून थंड झाल्यावर कुस्करून गाळून प्यावे,आराम पडतो.

6) काविळमध्ये मनुकयांचा काढा मुख्य औषधासोबत देतात 

7) जुना खोकला, T. B., ह्यामध्ये मनुका पिंपळी, साखर व मध एकत्र दिल्याने आराम मिळतो 

8) अम्लपित्त, Acidity, छातीत जळजळ होणे, घश्यात आंबट पाणी येणे अशा तक्रारी असल्यास  मनुका, हिरडा व खडीसाखर एकत्र करुन खावे. 

9) डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी  मनुका खाव्या. 

10) गर्भिणी ने आरोग्यासाठी रोजच गोड द्राक्षे, मनुका खावे. 


Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 

8766740253

गर्भिणी अवस्थेत मोत्यांचा वापर:-

1) गर्भिणी अवस्थेत मळमळणे, उलटय़ा होणे, ह्या तक्रारींसाठी मोत्याची पिष्टी अतिशय उपयोगी आहे. 

2) वारंवार गर्भपात होणे, गर्भ असतांना गर्भाशयात रक्तस्राव होणे, गर्भाशयात रक्तस्राव झाल्यामुळे गर्भ बाहेर पडणे, गर्भाची वाढ खुंटणे, गर्भ योग्य प्रकारे न वाढणे ह्यासाठी आयुर्वेदात मोती पिष्टी चा खुप उपयोग होतो

3) गर्भाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येणे अशा तक्रारी निर्माण झाल्यास मोती पिष्टी दिल्याने ह्या तक्रारी दूर होतात 

4) गर्भाची त्वचा तजेलदार होण्यासाठी तसेच गर्भ पुष्ट होण्यासाठी सर्वच गर्भिणींना मोती पिष्टी च्यवनप्राश मधुन द्यावे. 

5) आधुनिक शास्त्राने सुद्धा हे सिद्ध झाले आहे कि asprin, heparin ह्या विषारी औषधांपेक्षा गर्भिणी अवस्थेत मोती पिष्टी वापरले तर अधिक चांगले. 


Ref-Pearls in clinical obstetrics: challenges in anticoagulation in pregnancy

Micaela DELLA TORRE ✉, Monique B. SUTHERLAND, Laura M. DIGIOVANNI

Division of Maternal Fetal Medicine, Department of Obstetrics and Gynecology, University of Illinois at Chicago, Chicago, IL, USA


Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 

8766740253

बडिशेप/सौंप लहान मुलांसाठी उत्तम औषध

1) बडिशेप गोड, कडवट चवीला आहे व किंचित उष्ण गुणाची आहे. 

2) बालकांना वारंवार पोटदुखी,पोटात  गॅस साठणे, पोट कडक होणे  अशा तक्रारींसाठी 1चमचा बडीशेप 40ml उकळत्या पाण्यात टाकून पाणी गार झाल्यावर दिवसातून 3 ते 4वेळा द्यावे. असे आठवडाभर केल्यास तक्रारी दूर होतात.

3) लहान मुलांना भूक न लागणे, खोकला येणे, दम लागणे, अजीर्ण, द्रवमलप्रवृत्ती होणे अशा तक्रारींसाठी पाव चमचा बडिशेप चूर्ण मध व तूपात मिसळून द्यावे. 

4) सुंठ, लवंग, ओवा, दालचिनी, हिंग व बडीशेप एकत्र करुन पाव चमचा (1gm) घेतल्यास अजीर्ण झाल्यामुळे होणारी पोटदुखी थांबते.


Ref- वैद्य गो. आ. फडके 

Vd Pratibha Bhave 

8766740253

लहान मुलांना उन्हाळ्यात होणाऱ्या उष्णतेचा त्रास टाळण्यासाठी

1) दिवसातून 2वेळा थंड पाण्याने आंघोळ करावी. 

2) रात्री झोपण्याआधी अर्धा तास डोळ्यांवर थंड दुधाच्या पट्टया ठेवाव्या 

3) उसाचा रस, फळे, ताजे लिंबु सरबत, कोकम सरबत, आंब्याचे पन्हे, गार बासुंदी, गार दूध, गुलकंद, मोरावळा, बोरकुटे, बोराचे गोड सूप, शेवयाची खीर असे पदार्थ खावे

4) पाण्यात सुगंधी वाळ्याची छोटिशी पुरचुंडी टाकावी. 

5) उन्हाळ्यात सर्व लहान मुलांना  रोज दूधात शतावरी कल्प व प्रवाळयुक्त गुलकंद घालून प्यावे. ह्यामुळे नाकातून रक्त पडणे, डोळे दुखणे, लघविला जळजळ होणे, मळमळणे, अॅसिडीटी होणे, ताप येणे अशा तक्रारी निर्माण होत नाही. 


टीप - 

1) लहान मुलांना अजिबात उन्हात फिरायला नेऊ नये

2) दुपारी विश्रांती घ्यायला सांगावे

3) दही ग्रीष्म ऋतुंमध्ये कधीच खाऊ नये. दही अतिशय उष्ण गुणाचे असते. 


 Vd Pratibha Bhave

पुन्हा मूल होत नाही! (Secondary Infertility)



काही स्त्रियांना पहिले मूल असते, पण नंतर प्रयत्न करुनसुद्धा गर्भ राहत नाही किंवा राहिले तर वाढत नाही, ह्यालाच आधुनिक शास्त्रीय भाषेत Secondary Infertility म्हणतात. 

आयुर्वेद शास्त्रानुसार असे घडण्याची कारणे:-  

1) गर्भ मार्ग, गर्भाशय, बीजग्रंथी चे आजार असणे

2) मानसिक तणाव 

3) रक्त दुषित होणे

4) शुक्र दोष,पाळीचे आजार निर्माण होणे

5) आहार व दिनचर्ये मध्ये चुका करणे,त्यामुळे निरनिराळे आजार निर्माण होणे

6) गर्भधारणा करण्यासाठी च्या काळात प्रयत्न न होणे

7) शारीरिक शक्ती कमी होणे

ह्या कारणांमुळे पुन्हा गर्भ राहण्यासाठी अडचण निर्माण होते. 

संदर्भ च. शा. 2/7

*ह्यासाठी आयुर्वेदात रुग्णाची तपासणी करुन मूल न राहण्याचे नेमके कारण शोधले जाते. कारणानुसार निरनिराळ्या औषधांनी रुग्णाच्या अवस्थेचा विचार करुन औषधी, पंचकर्म, स्थानिक चिकित्सा, प्रतिसारण, लेपन, पिचू, प्रक्षालन, अवगाह, उत्तरबस्ति इत्यादी ने उपचार केले जातात. 


Vd Pratibha Bhave

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 8766740253

बहुगुणकारी त्रिफळा गुग्गुळ

1) पोट साफ होत नसेल, अन्नाचे नीट पचन मलबद्धता व त्यासोबत अंगदुखी असेल अशावेळी त्रिफळा गुग्गुळ घेतल्याने पोट साफ होते व त्याबरोबर अंगदुखी सुद्धा बरी होते

2) हे औषध पोट साफ करत असल्यामुळे मुळव्याध, परिकर्तिका (piles/fissure) ह्या आजारात खुप वापरले जाते. 

Delivery झाल्यावर स्त्रियांना कधीकधी ह्या तक्रारी निर्माण होतात, तेव्हा सुद्धा हे औषध वापरता येते. 

3) ह्या औषधी गोळया मुळव्याध इ. आजारात रक्त पडणे, वेदना होणे, खाज येणे,पोट फुगणे, मलप्रवृत्ति अतिशय कष्टाने होणे ह्या तक्रारी दूर करतात. 

4) भगंदर (fistula) ह्या आजारात  पूय (pus) तयार होतो. त्यावर सुद्धा हे औषध फारच गुणकारी आहे 

5) ह्या औषधी गोळ्यांनी जखमा लवकर भरुन येतात . डायबेटिस पेशंट मध्ये हयाचा चांगला उपयोग होतो. 

6) हे औषध रक्त शुद्ध करणारे आहे.  दूषित जखमा, पूय होणे, ठणका बसणे अशा तक्रारींसाठी उपयोगी आहे 

7) वातरक्त(gout),त्वचारोग (skin diseases) ह्या आजारात उपयोगी आहे 

8) ह्याशिवाय त्रिफळा गुग्गुळ भूक वाढवणते, अन्नाचे पचन करते व शरीरातील वात पित्त व कफाचे संतुलन राखणारे बहुगुणी औषध आहे 

9) प्रसूति झाल्यावर टाके लवकर भरुन येण्यासाठी उपयोगी आहे 

10)  पाळीच्या वेळी पोट दुखत असेल, तसेच पाळीच्या वेळी पोट साफ होत नसेल,  endometriosis असेल तर त्रिफळा गुग्गुळ विशेष उपयोगी आहे. 


Vd Pratibha Bhave

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 

8766740253

वय 5वर्षे ते 16वर्षे साठी

 वय 5 वर्षे ते 16 वर्षे साठी

सर्व मुलामुलींसाठी विशेषतः उंची वाढवण्यासाठी, 

उन्हाळ्यात दुधाचे उपचार पद्धती खूप च उपयोगी आहे. 

***********

1) ह्या उपचारात आयुर्वेदिक औषधांनी शिजवलेले दुध सतत माथ्यावर सोडले जाते, तसेच संपूर्ण  अंगावर सतत विशिष्ट लयीत सोडले जाते. ह्यालाच क्रमाने दुग्ध शिरोधारा व सर्वांग धारा म्हणतात. 

2) तसेच आयुर्वेदिक औषधाची पुरचुंडी दुधात बूडवून त्याने संपूर्ण अंगाला  औषध चोळतात. 

3) हा उपचाराने शरीरातील उष्णता कमी होते. तसेच डोळ्यावरचा ताण कमी होतो

4) केसांचा पोत सुधारतो व त्वचा चमकदार होते

5) डोके दुखणे, झोप न येणे, चिडचिडपणा ही सर्व लक्षणे कमी होतात 

6) ह्यामुळे hypothalamus, pituitary ह्यावर तणाव कमी होईल असे हार्मोन्स बाहेर पडतात त्यामुळे मानसिक व शारीरिक थकवा दूर होतो. 

7) दुधासोबत असलेल्या औषधे शरीरात शोषली जातात. हार्मोन्स मध्ये सुधारणा व औषधांचा परीणामाने शरीराची उंची वाढण्यास मदत होते, व्यायाम करण्याची शक्ती वाढते. 

7) पचन क्रीया सुधारते त्यामुळे अजीर्ण, पोट साफ न होणे, पोट दुखणे अशा पोटाच्या तक्रारी नष्ट होतात 

8) मानसिक क्रियांमध्ये खूपच सुधारणा होत असल्यामुळे चिडचिड पणा, अव्यवस्थितपणा, दूर होतो. 

9) सर्वांनी आपल्या मुलांसाठी अशी आयुर्वेदिक चिकित्सा करायला हवी. 


Vd Pratibha Bhave

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 

 8766740253 

प्रसूत वात म्हणजे काय?



1) आयुर्वेदानुसार प्रसूति झाल्यावर शरीरामध्ये वात व कफ ह्यांचे प्राधान्य असते. पित्त कमी झालेले असते. 

2) त्यामुळे ह्या अवस्थेत होणारे आजार मुख्यतः वात व कफाचे असतात 

जसे थंडी वाजणे, शरीर जड वाटणे, अंग सुजणे, डोके दुखणे, अंग दुखणे, सांधे दुखणे, चिंता वाढणे,झोप न येणे, श्वास लागणे, खोकला होणे, जबडे दुखणे(गालाची हाडे), कंबर दुखणे, अन्न पचनाच्या तक्रारी निर्माण होणे,मुळव्याध अशी अनेक लक्षणे निर्माण होतात 

3) प्रसूति नंतर अशी लक्षणे निर्माण झाली तर त्याला प्रसूत वात असे म्हणतात. 

4) प्रसूतवात होऊ नये म्हणून कुठलाही ऋतु असला तरी पिण्यासाठी व वापरासाठी गरम पाण्याचा उपयोग करावा. 

वात व कफ वाढवणारे व थंड गुणाचे खाऊ नयेत. 

केळी, दही, कढी, कलिंगड, चिकू, लोणची, पापड, कुल्फी, आइस्क्रीम, असे पदार्थ टाळावे. शारीरिक व मानसिक परिश्रम करु नये. 

5) प्रसूति कुठल्याही पद्धतीने झाली असेल तरी पोटपट्टा बांधावा

6) संपूर्ण अंगाला तेलाने मालीश करावी 

7) बाळंतकाढा, दशमुलारीष्ट हे दोन्ही काढे प्यावे व दूधातून शतावरी कल्प प्यावा. 

8) दुपारी विश्रांती घ्यावी. 

9) आनंदी व समाधानी राहावे.

PCOS /PCOD ह्या आजारात जलौकावचरण (Leech Therapy)

 PCOS /PCOD ह्या आजारात जलौकावचरण (Leech Therapy) 

—------------------------

1) PCOSह्या आजारात पाळी फार उशिरा उशिरा ने  येते. वजन वाढत जाते. त्वचेला काळपटपणा येतो. सोनोग्राफी मध्ये ovaries सुजलेल्या दिसतात. रक्त तपासणी मध्ये serum insulin वाढलेले दिसते. पुरुषी Hormones - Testosterone वाढते. त्यामुळे अंगावर, हनुवटीवर गालावर, मिशा upper lips अधिक प्रमाणात केस येऊ लागतात. 

2) ह्याला आयुर्वेद औषधी गोळयांबरोबर leech therapy केली तर लवकर सुधारणा होते. 

-ह्या आजाराला आयुर्वेदात स्थौल्यामुळे होणारा आर्तव क्षय असे म्हणतात 

3) ह्यात वमन, बस्ति, उद्वर्तन व जलोकावचरण(leech therapy) हे उपचार केल्यास गुण येतो. 

4) वरील उपचारांना वजन लवकर कमी होउन ovaries ची सुज कमी होते व पाळी दर महिन्याला सुरळीतपणे येऊ लागते

5) ह्या उपचाराने शरीरात साठलेले विषारी पदार्थ निघुन जातात. नविन चांगले शरीर घटक तयार होतात. 

6) PCOS मुळे गर्भ राहण्यास, गर्भ टिकण्यास अडचणी येतात. अशावेळी ह्या उपचाराने सुदृढ गर्भधारणा होते.  

7) ह्या उपचाराने शरीरात साठलेले विषारी पदार्थ निघुन जातात व नविन चांगले शरीर घटक तयार होतात त्यामुळे पाळीच्यावेळी च्या तक्रारी जसे पोट दुखणे, कंबर दुखणे, अंगावर खूप कमी जाणे किंवा जास्त जाणे, गर्भाशययात गाठी होणे ह्या तक्रारी सुध्दा दूर होतात 

8) विदेशात सुद्धा, जेथे आयुर्वेद सारखे परंपरागत चिकित्सा प्रणाली आहेत, तेथे PCOS साठी शास्त्रीय पद्धतीने Leech therapy केल्या जाते. 


Ref - A review on Iranian Traditional Medicine about Leech Therapy in Polycystic Ovary Syndrome

Document Type : Review Article

“Ehtebas tams”.

Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 

8766740253

लहान मुलांचे दात येतांना अतिशय उपयोगी असे औषध

 लहान मुलांचे दात येतांना अतिशय उपयोगी असे औषध

'दन्तोद्भेदगदान्तक रस'

*********



1) लहान मुलांना दात येतांना अनेक तक्रारी निर्माण होतात 

द्रवमलप्रवृत्ती होणे, उलटय़ा होणे, पोट दुखणे, ताप येणे, चिडचिडपणा, अपचन, किरकिर करणे, रडणे, अशी लक्षणे निर्माण होतात 

2) ह्या औषधी गोळ्यांनी कुठल्याही प्रकारचा त्रास न होता  सहजपणे चांगले दात येतात. 

3) दात येतांना हिरड्या शिवशिवतात, भरपूर लाळ येते, हातात येईल ती वस्तू हिरड्यांनी चावतात, परीणामस्वरुप तयार होणारा रस बाळाच्या पोटात जातो व निरनिराळ्या तक्रारी निर्माण होतात. 

4) ह्या औषधी गोळ्यांची क्रिया हिरड्यांवर होउन ते पोटात जाते व पाचनक्रिया उत्तम राहते व सहजपणे दात येतात 

5) ह्या गोळ्यांमध्ये ओवा, हळद, सुंठ, जेष्ठमध, पिंपळी, काकडशिंगी, नागरमोथा, लोह, शंख अशी अनेक प्रकारची पाचन सुधारणार, जंतू नष्ट करणारी, हाडे मजबुत करणारी, रक्त  व व्याधीक्षमत्व वाढवणारी औषधे आहेत. 

6) आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार लहान मुलांना दात येतांना हे औषध प्रत्येकाने द्यावे. 

Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 

8766740253

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...