बाळंतकाढा (प्रसूति झाल्यावर घ्यायचे अतिशय महत्त्वाचे आयुर्वेदिक औषध):-
*बाळंतकाढा नंबर1:
प्रसूति झाल्यावर प्रथम दिवसांपासून ते 10व्या दिवसांपर्यंत घ्यावे
साधारणपणे 10ते 15मिली तेवढयाच कोमट पाण्यात , सकाळच्या व रात्रीच्या जेवणानंतर घ्यावे
*उपयोग-बाळंतपणात कळा ,रक्तस्त्राव यामुळे वाताचे आजार होण्याची शक्यता असते.तसेच गरोदर पणात बाळाच्या वाढीबरोबर गर्भाशयाचा आकार वाढलेला असतो.ह्या काढ्यामुळे बाळंतपणानंतर चे वाताचे आजार होत नाहीत,तसेच गर्भाशय लवकर पहिल्या सारखा होण्यास मदत होते.आईला दुध येण्यास उपयोग होतो
*बाळंतकाढा नंबर 2 :-
प्रसूति झाल्यावर 11व्या दिवसांपासून ते 30व्या दिवसांपर्यंत घ्यावा
साधारणपणे 10ते 15मिली तेवढयाच कोमट पाण्यात , सकाळच्या व रात्रीच्या जेवणानंतर घ्यावे
*उपयोग -हा काढा भूक वाढवतो व अन्नाचे पचन करण्यास मदत करतो
गर्भाशयाची शुद्धी व गर्भाशयाचा संकोच करणारे औषधींमुळे ह्या काढ्याने बाळंत रोग होण्याची शक्यता कमी होते
बाळंतकाढा नंबर 3 :-
प्रसूति झाल्यावर 31व्या दिवसांपासून ते 45व्या दिवसांपर्यंत घ्यावा
साधारणपणे 10ते 15मिली तेवढयाच कोमट पाण्यात , सकाळच्या व रात्रीच्या जेवणानंतर घ्यावे
उपयोग:- ह्या काढ्याने शरीरात झालेली रक्त,मांस,अस्थिं ची झीज भरुन येते.
गर्भाशयाच्या पेशी,उदराच्या/पोटाच्या पेशी,बंध/ligaments द्रृढ होतात
No comments:
Post a Comment