काही स्त्रियांना पहिले मूल असते, पण नंतर प्रयत्न करुनसुद्धा गर्भ राहत नाही किंवा राहिले तर वाढत नाही, ह्यालाच आधुनिक शास्त्रीय भाषेत Secondary Infertility म्हणतात.
आयुर्वेद शास्त्रानुसार असे घडण्याची कारणे:-
1) गर्भ मार्ग, गर्भाशय, बीजग्रंथी चे आजार असणे
2) मानसिक तणाव
3) रक्त दुषित होणे
4) शुक्र दोष,पाळीचे आजार निर्माण होणे
5) आहार व दिनचर्ये मध्ये चुका करणे,त्यामुळे निरनिराळे आजार निर्माण होणे
6) गर्भधारणा करण्यासाठी च्या काळात प्रयत्न न होणे
7) शारीरिक शक्ती कमी होणे
ह्या कारणांमुळे पुन्हा गर्भ राहण्यासाठी अडचण निर्माण होते.
संदर्भ च. शा. 2/7
*ह्यासाठी आयुर्वेदात रुग्णाची तपासणी करुन मूल न राहण्याचे नेमके कारण शोधले जाते. कारणानुसार निरनिराळ्या औषधांनी रुग्णाच्या अवस्थेचा विचार करुन औषधी, पंचकर्म, स्थानिक चिकित्सा, प्रतिसारण, लेपन, पिचू, प्रक्षालन, अवगाह, उत्तरबस्ति इत्यादी ने उपचार केले जातात.
Vd Pratibha Bhave
BAMS MD Ayu
Obstetrics and gynecology 8766740253
No comments:
Post a Comment