Monday, 16 May 2022

लहान मुलांमधिल #मानसिक आजार व त्यावर आयुर्वेदिक उपचार

सद्ध्या लहानमुलांना मध्ये मानसिक आजाराचे  प्रमाण वाढले आहे.  #AttentionDeficitHyperactivityDisorder(ADHD) ह्या मानसिक आजार चे प्रमाण सर्वाधिक आहे.  

**#ADHD ची साधारणपणे आढळणारी लक्षणे:-

  • ही मुले स्वतः च्याच विश्वात असतात. दुसऱ्यांच्या भावना समजू शकत नाही 
  • भावना फक्त स्वतः पूरत्याच मर्यादित असल्याने मनासारखे झाले नाही तर तांडव करतात. समजावून सांगणे अवघड असते
  • दुसऱ्यांच्या कामात मुद्दाम व्यत्यय आणतात 
  • विनाकारण खूप चिडणे, रागाने अंगावर धावून येणे,वस्तू फेकणे, मारणे अशी लक्षणे दिसतात 
  • ही मुले एका जागेवर स्थिर राहत नाही. सारखे फिरत राहतात, पळतात. जबरदस्तीने खुर्चीत बसवले तर चुळबुळ करतात, मान, डोळे, हातपाय हलवतात. 
  • अशा मुलांना व्यवस्थितपणे खेळणे अवघड जाते. चित्र काढणे, पेंटिंग करणे संगित शिकणे,अशा इतर कला शिकण्यासाठी  एकाग्रता नसते. 
  • अनेक काम करण्यासाठी ही मुले इच्छा आहे असे दाखवू शकतात पण ते पूर्ण करु शकत नाही. एक काम अर्धवट सोडून दुसरे करायला लागतात.
  • एकाग्रता नसल्याने आपण जे बोललो तेच परत सांगायला लावले तर ते जमत नाही. 
  • बुद्धी चे काम करतांना ताण पडतो म्हणून ते करायला टाळाटाळ करतात. बराचवेळ कामे विसरून जातात. ही मुले शाळेत मागे पडतात 
  • सांगितलेल्या गोष्टी पार पाडणे त्यांना कठीण जाते त्यामुळे खुप चुका होतात. ह्याचा अर्थ ते बुद्धी ने मंद असतात किंवा आळशी असतात असे नव्हे. 
  • काही मुलांमध्ये स्वप्नाळूपणा दिसून येतो .ही शांत बसून राहतात व इतर मुलांशी अजिबात मिसळत नाही. बाहेर काय चालले आहे  ह्याचे भान नसते
  • जर व्यवस्थित उपाय केले नाही तर ही मुले मोठी झाल्यावर इतर त्याच्या वयाच्या मुलाप्रमाणे वैचारिक प्रगल्भता नसते. Driving skill, निर्णय क्षमतेची कमतरता आढळते.म्हणून अशा मुलांसाठी बाल्यावस्थेपासूनच मानसिक स्वास्थ्यासाठी प्रयत्नशील असायला  हवे

************

आजार दूर करण्यासाठी उपाययोजना :-

************

मनोविकार तज्ञ केमिकल औषधांनी हा आजार 80%नियंत्रणात आणतात, परंतु त्या औषधांचे ह्या लहान मुलांवर खुप वाईट परिणाम होतात. 

-आयुर्वेदिक उपचार - 

*********

*आयुर्वेदीक पद्धती ने हा आजार खूप चांगल्या प्रकारे नियंत्रणात आणला जातो. तसेच औषधे बिनविषारी आहेत. जसे

*ब्राम्ही, शंखपुष्पी, अश्वगंधा, जेष्ठमध, जटामांसी वेखंड, पिंपळी, कुमारकल्याणघृत इत्यादी औषधे योग्य प्रमाणात दिली जातात 

 *तसेच षष्ठीशाली पिंडाने/औषधीयुक्त तेलाने संपूर्ण शरीराची मालिश केली जाते 

*दुधाची धार, विशिष्ट अंतरावर, 30ते 45 मिनिटे सतत कपाळावर विशिष्ट पद्धतीने सोडणे. असे दर महिन्याला 14 दिवस 

*श्लोक पाठांतर करुन घेणे 

*व्यायाम करवून घेणे

*आहार व दिनचर्या ठरवून देणे. 

ह्या सारख्या आयुर्वेदिक उपायांनी मानसिक आजार बरा होतो. 


Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 

8766740253

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...