1) आयुर्वेदानुसार प्रसूति झाल्यावर शरीरामध्ये वात व कफ ह्यांचे प्राधान्य असते. पित्त कमी झालेले असते.
2) त्यामुळे ह्या अवस्थेत होणारे आजार मुख्यतः वात व कफाचे असतात
जसे थंडी वाजणे, शरीर जड वाटणे, अंग सुजणे, डोके दुखणे, अंग दुखणे, सांधे दुखणे, चिंता वाढणे,झोप न येणे, श्वास लागणे, खोकला होणे, जबडे दुखणे(गालाची हाडे), कंबर दुखणे, अन्न पचनाच्या तक्रारी निर्माण होणे,मुळव्याध अशी अनेक लक्षणे निर्माण होतात
3) प्रसूति नंतर अशी लक्षणे निर्माण झाली तर त्याला प्रसूत वात असे म्हणतात.
4) प्रसूतवात होऊ नये म्हणून कुठलाही ऋतु असला तरी पिण्यासाठी व वापरासाठी गरम पाण्याचा उपयोग करावा.
वात व कफ वाढवणारे व थंड गुणाचे खाऊ नयेत.
केळी, दही, कढी, कलिंगड, चिकू, लोणची, पापड, कुल्फी, आइस्क्रीम, असे पदार्थ टाळावे. शारीरिक व मानसिक परिश्रम करु नये.
5) प्रसूति कुठल्याही पद्धतीने झाली असेल तरी पोटपट्टा बांधावा
6) संपूर्ण अंगाला तेलाने मालीश करावी
7) बाळंतकाढा, दशमुलारीष्ट हे दोन्ही काढे प्यावे व दूधातून शतावरी कल्प प्यावा.
8) दुपारी विश्रांती घ्यावी.
9) आनंदी व समाधानी राहावे.
No comments:
Post a Comment