Monday, 16 May 2022

बडिशेप/सौंप लहान मुलांसाठी उत्तम औषध

1) बडिशेप गोड, कडवट चवीला आहे व किंचित उष्ण गुणाची आहे. 

2) बालकांना वारंवार पोटदुखी,पोटात  गॅस साठणे, पोट कडक होणे  अशा तक्रारींसाठी 1चमचा बडीशेप 40ml उकळत्या पाण्यात टाकून पाणी गार झाल्यावर दिवसातून 3 ते 4वेळा द्यावे. असे आठवडाभर केल्यास तक्रारी दूर होतात.

3) लहान मुलांना भूक न लागणे, खोकला येणे, दम लागणे, अजीर्ण, द्रवमलप्रवृत्ती होणे अशा तक्रारींसाठी पाव चमचा बडिशेप चूर्ण मध व तूपात मिसळून द्यावे. 

4) सुंठ, लवंग, ओवा, दालचिनी, हिंग व बडीशेप एकत्र करुन पाव चमचा (1gm) घेतल्यास अजीर्ण झाल्यामुळे होणारी पोटदुखी थांबते.


Ref- वैद्य गो. आ. फडके 

Vd Pratibha Bhave 

8766740253

No comments:

Post a Comment

Premature graying of hair

  केश पांढरे का होतात? त्यावर उपाय  ********** Causes of graying of hair according to the ayurveda - शोकश्रमक्रोधकृत: शरीरोष्मा शिरोगत्त: l ...