1) ताजे व सूकलेले असे दोन्ही प्रकारे द्राक्षांचा औषधात उपयोग केला जातो. ते थकवा घालवणारे, कंठ शुद्धी करणारे,शुक्र वाढवणारे, डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे फळ आहे.
2) हे फळ शरीरात थंड व स्निग्ध गुण निर्माण करणारे आहे त्यामुळे पित्त व वात कमी करतो.
3) रक्त शुद्ध करतो, मांस व शुक्र वाढवतो
4) मल व मुत्रप्रवृत्ती करण्यासाठी मदत करतो
5) उन्हाळ्यात उन लागल्यामुळे ताप आला असेल, तहान, उलट्या होणे, ही लक्षणे असल्यास गरमपाण्यात मनुका टाकून थंड झाल्यावर कुस्करून गाळून प्यावे,आराम पडतो.
6) काविळमध्ये मनुकयांचा काढा मुख्य औषधासोबत देतात
7) जुना खोकला, T. B., ह्यामध्ये मनुका पिंपळी, साखर व मध एकत्र दिल्याने आराम मिळतो
8) अम्लपित्त, Acidity, छातीत जळजळ होणे, घश्यात आंबट पाणी येणे अशा तक्रारी असल्यास मनुका, हिरडा व खडीसाखर एकत्र करुन खावे.
9) डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मनुका खाव्या.
10) गर्भिणी ने आरोग्यासाठी रोजच गोड द्राक्षे, मनुका खावे.
Vd Pratibha Bhave
BAMS MD Ayu
Obstetrics and gynecology
8766740253
No comments:
Post a Comment