1) पोट साफ होत नसेल, अन्नाचे नीट पचन मलबद्धता व त्यासोबत अंगदुखी असेल अशावेळी त्रिफळा गुग्गुळ घेतल्याने पोट साफ होते व त्याबरोबर अंगदुखी सुद्धा बरी होते
2) हे औषध पोट साफ करत असल्यामुळे मुळव्याध, परिकर्तिका (piles/fissure) ह्या आजारात खुप वापरले जाते.
Delivery झाल्यावर स्त्रियांना कधीकधी ह्या तक्रारी निर्माण होतात, तेव्हा सुद्धा हे औषध वापरता येते.
3) ह्या औषधी गोळया मुळव्याध इ. आजारात रक्त पडणे, वेदना होणे, खाज येणे,पोट फुगणे, मलप्रवृत्ति अतिशय कष्टाने होणे ह्या तक्रारी दूर करतात.
4) भगंदर (fistula) ह्या आजारात पूय (pus) तयार होतो. त्यावर सुद्धा हे औषध फारच गुणकारी आहे
5) ह्या औषधी गोळ्यांनी जखमा लवकर भरुन येतात . डायबेटिस पेशंट मध्ये हयाचा चांगला उपयोग होतो.
6) हे औषध रक्त शुद्ध करणारे आहे. दूषित जखमा, पूय होणे, ठणका बसणे अशा तक्रारींसाठी उपयोगी आहे
7) वातरक्त(gout),त्वचारोग (skin diseases) ह्या आजारात उपयोगी आहे
8) ह्याशिवाय त्रिफळा गुग्गुळ भूक वाढवणते, अन्नाचे पचन करते व शरीरातील वात पित्त व कफाचे संतुलन राखणारे बहुगुणी औषध आहे
9) प्रसूति झाल्यावर टाके लवकर भरुन येण्यासाठी उपयोगी आहे
10) पाळीच्या वेळी पोट दुखत असेल, तसेच पाळीच्या वेळी पोट साफ होत नसेल, endometriosis असेल तर त्रिफळा गुग्गुळ विशेष उपयोगी आहे.
Vd Pratibha Bhave
BAMS MD Ayu
Obstetrics and gynecology
8766740253
No comments:
Post a Comment