Monday, 16 May 2022

PCOS /PCOD ह्या आजारात जलौकावचरण (Leech Therapy)

 PCOS /PCOD ह्या आजारात जलौकावचरण (Leech Therapy) 

—------------------------

1) PCOSह्या आजारात पाळी फार उशिरा उशिरा ने  येते. वजन वाढत जाते. त्वचेला काळपटपणा येतो. सोनोग्राफी मध्ये ovaries सुजलेल्या दिसतात. रक्त तपासणी मध्ये serum insulin वाढलेले दिसते. पुरुषी Hormones - Testosterone वाढते. त्यामुळे अंगावर, हनुवटीवर गालावर, मिशा upper lips अधिक प्रमाणात केस येऊ लागतात. 

2) ह्याला आयुर्वेद औषधी गोळयांबरोबर leech therapy केली तर लवकर सुधारणा होते. 

-ह्या आजाराला आयुर्वेदात स्थौल्यामुळे होणारा आर्तव क्षय असे म्हणतात 

3) ह्यात वमन, बस्ति, उद्वर्तन व जलोकावचरण(leech therapy) हे उपचार केल्यास गुण येतो. 

4) वरील उपचारांना वजन लवकर कमी होउन ovaries ची सुज कमी होते व पाळी दर महिन्याला सुरळीतपणे येऊ लागते

5) ह्या उपचाराने शरीरात साठलेले विषारी पदार्थ निघुन जातात. नविन चांगले शरीर घटक तयार होतात. 

6) PCOS मुळे गर्भ राहण्यास, गर्भ टिकण्यास अडचणी येतात. अशावेळी ह्या उपचाराने सुदृढ गर्भधारणा होते.  

7) ह्या उपचाराने शरीरात साठलेले विषारी पदार्थ निघुन जातात व नविन चांगले शरीर घटक तयार होतात त्यामुळे पाळीच्यावेळी च्या तक्रारी जसे पोट दुखणे, कंबर दुखणे, अंगावर खूप कमी जाणे किंवा जास्त जाणे, गर्भाशययात गाठी होणे ह्या तक्रारी सुध्दा दूर होतात 

8) विदेशात सुद्धा, जेथे आयुर्वेद सारखे परंपरागत चिकित्सा प्रणाली आहेत, तेथे PCOS साठी शास्त्रीय पद्धतीने Leech therapy केल्या जाते. 


Ref - A review on Iranian Traditional Medicine about Leech Therapy in Polycystic Ovary Syndrome

Document Type : Review Article

“Ehtebas tams”.

Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 

8766740253

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...