Monday, 16 May 2022

लहान मुलांना उन्हाळ्यात होणाऱ्या उष्णतेचा त्रास टाळण्यासाठी

1) दिवसातून 2वेळा थंड पाण्याने आंघोळ करावी. 

2) रात्री झोपण्याआधी अर्धा तास डोळ्यांवर थंड दुधाच्या पट्टया ठेवाव्या 

3) उसाचा रस, फळे, ताजे लिंबु सरबत, कोकम सरबत, आंब्याचे पन्हे, गार बासुंदी, गार दूध, गुलकंद, मोरावळा, बोरकुटे, बोराचे गोड सूप, शेवयाची खीर असे पदार्थ खावे

4) पाण्यात सुगंधी वाळ्याची छोटिशी पुरचुंडी टाकावी. 

5) उन्हाळ्यात सर्व लहान मुलांना  रोज दूधात शतावरी कल्प व प्रवाळयुक्त गुलकंद घालून प्यावे. ह्यामुळे नाकातून रक्त पडणे, डोळे दुखणे, लघविला जळजळ होणे, मळमळणे, अॅसिडीटी होणे, ताप येणे अशा तक्रारी निर्माण होत नाही. 


टीप - 

1) लहान मुलांना अजिबात उन्हात फिरायला नेऊ नये

2) दुपारी विश्रांती घ्यायला सांगावे

3) दही ग्रीष्म ऋतुंमध्ये कधीच खाऊ नये. दही अतिशय उष्ण गुणाचे असते. 


 Vd Pratibha Bhave

No comments:

Post a Comment

Premature graying of hair

  केश पांढरे का होतात? त्यावर उपाय  ********** Causes of graying of hair according to the ayurveda - शोकश्रमक्रोधकृत: शरीरोष्मा शिरोगत्त: l ...