Wednesday, 23 October 2019

कटी बस्ती

1) पाठदुखी किंवा कंबरदुखी असल्यास कटी बस्ती केल्याने दुखणे दूर होते.
2) पाठीच्या व कंबरेच्या मांसपेशी व हाडे मजबूत होतात. स्नायू बळकट होतात. Spondylitis, spondylosis, sciatica nerve compression ह्यासाठी कटीबस्ती उत्तम उपचार आहे
3) पाठीची, कंबरेची मणके झिजल्यामुळे /घसरल्यामुळे वेदना होणे ह्यासाठी कटीबस्ती  ने बराच आराम मिळतो.

शुक्रा विकृतिमुळे(Abnormal Sperms) गर्भधारणा होत नसेल तर -

गर्भधारणा होत नसेल तर पुरुषांमध्ये वीर्य तपासणी(semen analysis) करतात.शुक्राणू कमी असतिल तर ती वाढविण्यासाठी, 
शुक्रजनन करण्यासाठी आयुर्वेदिक औषधी देतात. शुक्र दूषित असेल (abnormal sperms) तर त्यानुसार औषधी दिली जातात. 
1) शुक्रजनन औषधी शुक्राची प्रमाण वाढवतात 
 सहसा स्निग्ध, थंड, पचायला जड, पातळ, गोड अशी पदार्थ शुक्र वाढवतात. जसे  दूध, तूप, 
शुक्र वाढवणारी औषधी-अश्वगंधा, मुसळी, खडीसाखर, शतावरी 
2) शुक्राला बाहेर काढणारे व वाढवणारे औषध- दूध, उडीद, भल्लातक फलमज्जा (गोळंबी) 
3) शुक्राला बाहेर काढणारी औषधी-डोरलीफळ, 
4) शुक्र स्राव थांबवणारे-जायफळ
5) शुक्र शोषून घेणारे औषध-हिरडा

********शुक्र दूषित असेल (abnormal sperms) तर
पंचकर्म करुन घेऊन मग जो दोष असेल त्याप्रमाणे औषधी दिल्या जातात
जसे-
1) वातामुळे असेल तर - विदारिकंद औषध दूधात उकळून पिणे
2) पित्तामुळे असल्यास-गोखरु, गुळवेल, उसाचा रस
3) कफामुळे असल्यास-पाषाणभेद, अश्मन्तक, पिंपळी
4) रक्तदुषित असल्यास - धातकीचे फुले, खदिर, डाळींब, अर्जुन साल
5) कफवातमिश्रित असल्यास- पलाशक्षार, पाषाणभेद, 
6) शुक्र हे पूय युक्त असल्यास- चंदन, त्रिफळा, वडसाल, मनुका, परुषक ह्या औषधाने गुण येतो. 

संदर्भ : गो. आ. फडके

 ******औषधी आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने च घ्यावी. *******

तुम्ही विरुद्ध आहार घेता?

तुम्ही विरुद्ध आहार घेता? 
मग हे आजार होऊ शकतात. 
1) नपुंसकता(infertility), 
2) अपत्याला जन्मजात आजार होणे  
3) बाळ जन्माला आल्यावर लगेच मरणे
4) मृत बाळ जन्माला येणे. 
5) आंधळेपणा
6) त्वचेचे  निरनिराळे आजार 
7) अंगावर फोडे उठणे
8) जलोदर (Ascitis )
9) शरीरावर सूज येणे
10) मानसीक आजार, उन्माद (mania) 
11) भगंदर fistula
12) चक्कर येणे
13) अन्न पचनाच्या तक्रारी
14) घसा व गळयाचे आजार, वारंवार सर्दीहोणे
15) पाण्डु Anaemia
16) अम्लपित्त(acidity )
17) ज्वर (fever) 

उपचार Treatment. 
1) विरुद्ध आहार सोडून देणे, दोषांचे संतुलन करणाऱ्या आहार, विहार, औषधी घेणे
2) वमन व विरेचन शरीर शुद्ध करुन घेणे. 

संदर्भ :-च. सू. 26/102-105

आजारी पडू नये म्हणून

*******विरुद्ध आहार व औषध घेऊ नका******

*****विरुद्ध आहार व औषध म्हणजे काय? 
जे औषध किंवा आहार वात-पित्त-कफ दोषांना वाढवतात, शरीरात पसरवतात व वाढलेल्या त्या दोषांना शरीराच्या बाहेर काढून टाकत नाहीत, त्या आहार व औषधाला विरुद्ध म्हणतात. 
*** ते शरीराला अतिशय अपायकारक आहेत.

आयुर्वेदात विरुद्ध  अठरा(18) प्रकारचे सांगितले आहेत. संदर्भ च. सू. 26/81-101
  1. देश विरुद्ध - जसे उष्ण प्रदेशात उष्ण, रुक्ष, तीक्ष्ण, औषध व आहार हा देशाविरुद्ध आहे. विदर्भातील, मराठवाडय़ातील लोकांनी मिरचीचा ठेचा खाणे. 
  2. काल विरुद्ध -हिवाळ्यात थंड पदार्थ खाणे हे काल विरुद्ध आहे. जसे हिवाळ्यात आईस्क्रीम, कुल्फी खाणे 
  3. अग्नि विरुद्ध- पचनशक्ती कमी असताना जड पदार्थ खाणे, तसेच तीक्ष्ण पचनशक्ती असताना लाह्या सारखे हलके पदार्थ खाणे हे अग्नी विरुद्ध आहे
  4. मात्रा विरुद्ध- तूप आणि मध समप्रमाणात घेणे हे मात्रा विरुद्ध आहे. तसेच भूक लागली असतांना कमी जेवणे व आवश्‍यकतेपेक्षा अधिक मात्रेत भोजन करणे हे मात्रा विरुद्ध आहे
  5. सात्म्य विरुद्ध- एखाद्याला उष्ण, तिखट पदार्थ सात्म्य झाले असतिल तर त्याला गोड, थंड पदार्थ देणे सात्म्य विरुद्ध आहे. 
  6. दोष विरुद्ध - वातादी दोषांच्या समान गुणांचे पदार्थ,समान गुणाचे औषध व समान गुणाचे कर्म हे दोषविरुद्ध आहे. जसे अधिक चालणे हे वात विरुद्ध, दिवसा झोपणे हे कफासाठी विरुद्ध, क्रोध  करणे पित्तासाठी विरुद्ध आहे. 
  7. संस्कार विरुद्ध - आहार बनविण्याच्या पद्धतीला संस्कार म्हटले आहे. जसे मध गरम करणे विषाप्रमाणे आहे. अर्धे कच्चे, अधिक शिजवलेले, करपलेले, पुन्हापुन्हा गरम केलेले अन्न, उच्च तापमान वर शिजवलेले - जसे– फास्टफूड, अति थंड तापमान त ठेवलेले पदार्थ  – फ्रिज मधिल पाणी, फ्रीजमध्ये ठेवलेले शिजवलेले अन्न संस्कार विरुद्ध आहे 
  8. वीर्य विरुद्ध - शीत व उष्ण गुणाचे पदार्थ एकत्र घेणे वीर्य विरुद्ध आहे. ह्याने रक्त दूषित होते. 
जसे दूध व मासे एकत्र घेणे. पिझ्झा व आईस्क्रीम/थंड पेय एकावेळी खाणे. 
  1. कोष्ठ विरुद्ध-आपला कोठा कसा आहे ह्याचा विचार करुन खावे. जसे जड कोठा असणाऱ्या व्यक्ती ने मलावष्टंभ करणारी पदार्थ खाऊ नये. हलका कोठा असणाऱ्यांनी सारक पदार्थ घेणे कोष्ठ विरुद्ध आहे 
  2. अवस्था विरुद्ध - शरीराची अवस्था च्या विरुध्द आहार घेऊ नये. जसे जागरण झाल्यावर वडापाव खाणे, ह्यामुळे पित्त वाढते. दिवसा झोपून त्यानंतर श्रीखंड खाणे हे अवस्था विरुद्ध आहे, त्यामुळे कफ वाढतो. 
  3. क्रमविरुद्ध- आयुर्वेदानुसार आहार घेण्यासाठी एक क्रम सांगितला आहे. तो क्रम न पाळणे ह्याला क्रम विरुद्ध-म्हणतात.जसे मल मूत्रप्रवृत्ती करुन झाल्यावर, शरीराला हलकेपणा आल्यावर, उद्गार शुद्धी झाल्यावर, शरीर व मन उल्हास युक्त असतांना, भोजनाची इच्छा निर्माण झाल्यावर भोजन करणे आवश्यक आहे 
  4. परिहारविरुद्ध-विशिष्ट पदार्थावर विशेष पदार्थ खाऊ नये. जसे सिताफळ खाल्ल्यावर पाणी पिऊ नये. 
  5. उपचार विरुद्ध -उपचार चालू असतांना पथ्यापथ्यानुसार न वागणे ह्याला उपचार विरुद्ध म्हणतात . जसे औषधी तूप घेतल्यावर थंड पाणी पिऊ नये. 
  6. पाकविरुद्ध-आहार शिजवण्याची प्रक्रिया योग्य नसणे. जसे तांदुळ खुप शिजवणे किंवा अर्धेकच्चे ठेवणे. अयोग्य इंधन, जसे केरोसिन, आरोग्याला योग्य नही. 
  7. संयोग विरुध्द - निरनिराळे पदार्थ एकत्र करुन खाण्याला संयोग विरुध्द म्हणतात. जसे मांसाहार करताना सोबत मध, तिळ, गुळ, उडीद, मूळी, मोड आलेली धान्य खाणे हे संयोग विरुध्द आहे. 
  8. ह्दयविरुद्ध- जो आहार मनोनुकूल नाही त्याला ह्दयविरुद्ध म्हणतात.मनोनुकूल नसेल तर ते नीट पचत नाही 
  9. संपत् विरुद्ध - आपण आहारासाठी जे धान्य, पाणी, भाजीपाला इत्यादी घेतो ते भेसळयुक्त, केमिकल्स युक्त असणे हे संपत विरुद्ध आहे. 
  10. विधी विरुद्ध - भोजन कसे करावे ह्याची आयुर्वेदाने पद्धत सांगितली आहे. त्या पद्धतीने न केल्यास त्याला विधीविरुध्द म्हणतात. 

*****अशाप्रकारे निरोगी राहण्यासाठी असे 18 प्रकारच्या विरुद्ध गोष्टी आपल्या हातून घडणार नाही ही काळजी घ्यावी **********

दूध

रोज दूध का प्यावे? . 
आयुर्वेदानुसार 
1) दूध पिल्याने तृप्ती मिळते
2) शरिरातील मांसपेशी दृढ, बलवान होतात
3) वीर्य ,बल वाढवतो
4) मेधा,बुद्धी साठी पोषक आहे 
5) मनाला प्रसन्नता देतो
6) जीवनशक्ती वाढवतो. थकवा दूर करतो
7) खोकला व दमा दूर करणारा आहे
8) रक्तातिल उष्णता कमी करणारा, हाडांना मजबूत करणारा, तुटलेल्या हाडांना जोडण्यात फायदेशीर आहे 
9) घाव,जखमा,व्रण ह्याने लवकर भरुन येतात 
10) सर्व प्राण्यांसाठी उत्तम आहे. ते संपूर्ण शरीराची आतून शुद्धी करणारे व  वात पित्त कफ ह्यांना संतुलित करणारे आहे 
11) भूक वाढवणारे आहे व क्षीण (malnutrition) व्यक्तीला अतिशय उपयोगी आहे 
12) पाण्डु (anaemia ), अम्लपित्त, गुल्म (fibroids), उदर रोग (ascitis ),ह्या आजारात उपयोगी आहे 
13) शरीरातील उष्णता कमी करत असल्याने दाह, आग होणे ही लक्षणे कमी करतो. शरीरावरील सूज कमी करतो. 
14) गर्भाशयासंबंधीत आजार, शुक्राणू (sperms) विषयी आजार, मुत्रादींच्या तक्रारी, बद्धकोष्ठता, वातरोग व पित्तरोग ह्यासाठी दूध अतिशय उपयोगी आहे. 
15) आयुर्वेदात दुधाचा उपयोग द्रोणी अवगाह(दूधात संपूर्ण शरीर बुडवणे), नाकात थेंब सोडणे, अंगाला जिरवणे, वमन, विरेचन, बस्ती व स्नेहन ह्या वेगवेगळया पंचकर्माच्यांसाठी केला जातो. 

च. सू. 1/108-114
***************************

टीप:-दूध नेहमी देशी गायीचे च असावे. ते न मिळाल्यास म्हशीचे प्यावे. जर्सी गायी हायब्रिड असल्याने वरील गुण नसतात. 

गर्भधारणा करण्यापूर्वी शरीर व गर्भाशयाची शुद्धी का करायची?

1) हल्ली आहार व जीवन शैली बदललेली आहे. 
2) अन्न पदार्थामध्ये भेसळ आहे. 
3) अशा अन्नातून विचारापलीकडे रसायने, खते, किटकनाशकांचा शरीरात शिरकाव होत आहे. 
4) ह्या सर्वांचा घातक परिणाम आपल्या शरीरातील प्रत्येक अणुरेणु, पेशींवर होत असतो. 
5) वरील प्रकारच्या आहार व अनियमित जीवनशैली चा परिणाम शुक्राणू व बीजाणूंवर देखील होतो. 
6) गर्भधारणा ही पुरुषातील शुक्राणू (sperm), व स्त्रियां मधिल   बीजाणू(ovum) एकत्र आल्यावर होते. 
7) तयार होणारा गर्भ हा गर्भाशयात वाढतो, त्यामुळे गर्भाशय शुद्ध असणे, आजार मुक्त असणे आवश्‍यक आहे. 
8) म्हणून गर्भ राहण्याआधी दोघांनीही वैद्यकीय तपासणी करुन घेऊन पंचकर्म, उत्तरबस्ति करुन घ्यावी. आवश्यक ती औषधी वैद्यांच्या सल्ल्यानुसार घ्यावी. 
9) अश्याप्रकारे शुद्धी करुन घेतल्याने शारिरीक व मानसीक  संतुलन निर्माण होते. गर्भाशय शुद्ध होते. सत्वगुण वाढतो. 
10) म्हणून शारिरीक व मानसिक दृष्ट्या बलवान अपत्यप्राप्ती साठी आयुर्वेदिक शास्त्रीय पद्धतीने गर्भधारणा करावी. 

दिवसा झोपू नये


सतत दिवसा झोपल्याने होणारे आजार 

1) अजीर्ण, अपचन
2) अन्न पचण्याची शक्ती नष्ट होते. जठराग्नीचा नाश होतो. 
3) अंग गार पडल्यासारखे वाटते तसेच अंगावर ओले कपडे असल्यासारखे वाटते. 
4) शरिराला पाण्डुता येते. रक्ताचे प्रमाण कमी होते
5) त्वचारोग होतात, जसे अंगाला खाज येणे, पामा eczema, 
6) अंगाचा दाह होतो,शरीरात दाबल्या प्रमाणे दुखते, जड होते
7) ह्दयाच्या गती मध्ये अडथळा निर्माण होतो
8) डोळ्यांचे आजार होतात
9) मुत्राचे, प्रमेह,मधुमेह diabetes हे आजार होतात. 
10) शरीरात गाठी, lumps /tumors /cysts होतात. 
10) मुखाच्या तालू च्या ठिकाणी कफ साठतो
11) अशक्तपणा येतो. 
12) अधिक झोप  येते. 

संदर्भ :- च. सि. 12/7

****टिप :-गर्भिणी, सूतिका, बाल, वृद्ध यांनी मात्र दिवसा झोपावे.
तसेच ग्रीष्म ऋतुत दिवसा विश्रांती घ्यावी.

बहुगुणी लिंबू


  1. लिंबूचे पिकलेले फळ फार उपयुक्त आहे
  2. लिंबू चे पिकलेले फळ आंबट चवीचे असते
  3. लिंबूचा रस उष्ण गुणाचा आहे
उष्ण व तीक्ष्ण गुणाचा असल्यामुळे पित्त वाढवणारा आहे, तरी अम्लपित्तात उपयोगी आहे 
  1. लिंबूचा रस  कफ वाढवणारा व वात कमी करणारा आहे
  2. तो उष्ण व आंबट गुणीअसल्यामुळे भूक वाढविणारे आहे
  3. लिंबू रसाने आमा चे पचन होऊन अजीर्ण दूर होते
  4. लिंबूरस पोटातील वात काढून टाकत असल्यामुळे पोट दुखी कमी होते. यासाठी लिंबू रसात अद्रक रस व सैंधव मीठ टाकून घ्यावे
  5. लसूण वटी सोबत लिंबू रस घेतल्यास  द्रव मलप्रवृत्ती, पोट दुखी कमी होते
  6. उलट्या होत असल्यास लिंबूरस साखरे सोबत घ्यावा
  7. लिंबूरस, संध्यामीठ, साखर, पाणी एकत्र घेतल्यास तहान थकवा दूर होऊन चागली मूत्रप्रवृत्ती होते
  8. त्वचारोगात शरीराला खाज येत असल्यास लिंबू रस लावल्याने तात्पुरता फायदा होतो
  9. लिंबू ची साल  वाळवून तिला जाळले असता कोळसा होतो. त्याला मषी म्हणतात. ही मषी मधातून चाटण घेतल्यास उचकी, दमा, उलट्या थांबतात. 
  10. ज्वर, ताप ह्यात लिंबू साल चुर्ण गरम पाण्यात घेतल्याने फायदा होतो. 

संदर्भ :-वै. गो. आ. फडके

आपण रोगरहित आहोत हे कशावरून?


आयुर्वेद शास्त्रानुसार पुढिलप्रमाणे लक्षणे असल्यास आपल्याला रोग नाहीत असे समजावे. 
1) नेहमीप्रमाणे भोजन करता येणे
2) मल मुत्रादींची प्रवृत्ती सहज होणे. त्यात कुठलाही अडथळा नसणे
3) दैनिक कामात उत्साह असणे
4) ज्ञानेंद्रिय व कर्मेन्द्रिय आपली आपली कर्मे करण्यास सक्षम असणे
5) शारिरीक व मानसिक दृष्ट्या बलवान असणे
6) मन सत्वगुणयुक्त असणे

संदर्भ :-च. सि. 12/9

पंचकर्म झाल्यावर घ्यायची काळजी


1) पंचकर्म झाल्यावर वैद्याच्या सल्ल्यानुसार पथ्यापथ्यानुसार वागावे. 
2) विशेषतः आठ प्रकारचे पथ्य कसोशीने पाळावे. हे जर पाळले नाही तर आजार होण्याची शक्यता असतेच. ह्यांना "अष्टमहादोषकर" म्हणतात. 
******************************
अष्टमहादोषकर भाव पुढिल प्रमाणे 
1) जोरात ओरडून बोलू नये. 
2) खडबडीत रस्त्यावरुन वाहन चालवणे किंवा वाहनात बसून फिरु नये. 
3) अधिक प्रमाणात पायी चालू नये.
4) कष्ट देणाऱ्या, टोचणाऱ्या आसनावर अधिक काळापर्यंत बसू नये. 
5) अजीर्ण झाले असतानाच पुन्हा खाऊ नये
6) अपथ्य व शरीराला अयोग्य असा आहार घेऊ नये. 
7) दिवसा झोपू नये. 
8) स्रीसंग, व्यायाम करु नये. 
**********************************
अशाप्रकारे आरोग्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तिंनी पंचकर्म झाल्यावर जोपर्यंत स्वस्थ अवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत वरिल नियम पाळावे. 

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...