1) हल्ली आहार व जीवन शैली बदललेली आहे.
2) अन्न पदार्थामध्ये भेसळ आहे.
3) अशा अन्नातून विचारापलीकडे रसायने, खते, किटकनाशकांचा शरीरात शिरकाव होत आहे.
4) ह्या सर्वांचा घातक परिणाम आपल्या शरीरातील प्रत्येक अणुरेणु, पेशींवर होत असतो.
5) वरील प्रकारच्या आहार व अनियमित जीवनशैली चा परिणाम शुक्राणू व बीजाणूंवर देखील होतो.
6) गर्भधारणा ही पुरुषातील शुक्राणू (sperm), व स्त्रियां मधिल बीजाणू(ovum) एकत्र आल्यावर होते.
7) तयार होणारा गर्भ हा गर्भाशयात वाढतो, त्यामुळे गर्भाशय शुद्ध असणे, आजार मुक्त असणे आवश्यक आहे.
8) म्हणून गर्भ राहण्याआधी दोघांनीही वैद्यकीय तपासणी करुन घेऊन पंचकर्म, उत्तरबस्ति करुन घ्यावी. आवश्यक ती औषधी वैद्यांच्या सल्ल्यानुसार घ्यावी.
9) अश्याप्रकारे शुद्धी करुन घेतल्याने शारिरीक व मानसीक संतुलन निर्माण होते. गर्भाशय शुद्ध होते. सत्वगुण वाढतो.
10) म्हणून शारिरीक व मानसिक दृष्ट्या बलवान अपत्यप्राप्ती साठी आयुर्वेदिक शास्त्रीय पद्धतीने गर्भधारणा करावी.
No comments:
Post a Comment