- लिंबूचे पिकलेले फळ फार उपयुक्त आहे
- लिंबू चे पिकलेले फळ आंबट चवीचे असते
- लिंबूचा रस उष्ण गुणाचा आहे
उष्ण व तीक्ष्ण गुणाचा असल्यामुळे पित्त वाढवणारा आहे, तरी अम्लपित्तात उपयोगी आहे
- लिंबूचा रस कफ वाढवणारा व वात कमी करणारा आहे
- तो उष्ण व आंबट गुणीअसल्यामुळे भूक वाढविणारे आहे
- लिंबू रसाने आमा चे पचन होऊन अजीर्ण दूर होते
- लिंबूरस पोटातील वात काढून टाकत असल्यामुळे पोट दुखी कमी होते. यासाठी लिंबू रसात अद्रक रस व सैंधव मीठ टाकून घ्यावे
- लसूण वटी सोबत लिंबू रस घेतल्यास द्रव मलप्रवृत्ती, पोट दुखी कमी होते
- उलट्या होत असल्यास लिंबूरस साखरे सोबत घ्यावा
- लिंबूरस, संध्यामीठ, साखर, पाणी एकत्र घेतल्यास तहान थकवा दूर होऊन चागली मूत्रप्रवृत्ती होते
- त्वचारोगात शरीराला खाज येत असल्यास लिंबू रस लावल्याने तात्पुरता फायदा होतो
- लिंबू ची साल वाळवून तिला जाळले असता कोळसा होतो. त्याला मषी म्हणतात. ही मषी मधातून चाटण घेतल्यास उचकी, दमा, उलट्या थांबतात.
- ज्वर, ताप ह्यात लिंबू साल चुर्ण गरम पाण्यात घेतल्याने फायदा होतो.
संदर्भ :-वै. गो. आ. फडके
No comments:
Post a Comment