रोज दूध का प्यावे? .
आयुर्वेदानुसार
1) दूध पिल्याने तृप्ती मिळते
2) शरिरातील मांसपेशी दृढ, बलवान होतात
3) वीर्य ,बल वाढवतो
4) मेधा,बुद्धी साठी पोषक आहे
5) मनाला प्रसन्नता देतो
6) जीवनशक्ती वाढवतो. थकवा दूर करतो
7) खोकला व दमा दूर करणारा आहे
8) रक्तातिल उष्णता कमी करणारा, हाडांना मजबूत करणारा, तुटलेल्या हाडांना जोडण्यात फायदेशीर आहे
9) घाव,जखमा,व्रण ह्याने लवकर भरुन येतात
10) सर्व प्राण्यांसाठी उत्तम आहे. ते संपूर्ण शरीराची आतून शुद्धी करणारे व वात पित्त कफ ह्यांना संतुलित करणारे आहे
11) भूक वाढवणारे आहे व क्षीण (malnutrition) व्यक्तीला अतिशय उपयोगी आहे
12) पाण्डु (anaemia ), अम्लपित्त, गुल्म (fibroids), उदर रोग (ascitis ),ह्या आजारात उपयोगी आहे
13) शरीरातील उष्णता कमी करत असल्याने दाह, आग होणे ही लक्षणे कमी करतो. शरीरावरील सूज कमी करतो.
14) गर्भाशयासंबंधीत आजार, शुक्राणू (sperms) विषयी आजार, मुत्रादींच्या तक्रारी, बद्धकोष्ठता, वातरोग व पित्तरोग ह्यासाठी दूध अतिशय उपयोगी आहे.
15) आयुर्वेदात दुधाचा उपयोग द्रोणी अवगाह(दूधात संपूर्ण शरीर बुडवणे), नाकात थेंब सोडणे, अंगाला जिरवणे, वमन, विरेचन, बस्ती व स्नेहन ह्या वेगवेगळया पंचकर्माच्यांसाठी केला जातो.
च. सू. 1/108-114
***************************
टीप:-दूध नेहमी देशी गायीचे च असावे. ते न मिळाल्यास म्हशीचे प्यावे. जर्सी गायी हायब्रिड असल्याने वरील गुण नसतात.
No comments:
Post a Comment