वाताचे आजार
1-आपल्या शरिरातील सर्व क्रिया वात,पित्त व कफ यांच्यामुळे घडतात
2-वात हा क्रियाशील आहे.पित्त व कफाच्या क्रिया वातावर अवलंबून आहेत.
3-शरिररुपी मशिन वात चालवतो.मनाचे,ज्ञानेंद्रिय,कर्मेन्द्रियांचे कार्य वातामुळेच घडून येतात.
4-परंतु वात बिघडला कि शरिराचे सर्व तंत्रच बिघडते व निरनिराळे आजार निर्माण होतात.
*******वात बिघडण्याची कारणे:-
1) थंड,रुक्ष,सूकलेले पदार्थ खाणे
2) कडु, तिखट,तुरट पदार्थ अधिक खाणे.ठेचा,खर्डा खाणे
3) कमीखाणे, वारंवार उपवास करणे
4) नेहमीच रात्री जागरण करणे
5) चिंता,शोक, भीती वाटणे
6) खुप धावपळ, अतिप्रमाणात व्यायाम करणे
7) पंचकर्माचा अतिरेक करणे
8) खूप प्रमाणात वाहन चालवणे, ,वाहनांवरुन पडणे , रक्तस्त्राव होणे
9) नैसर्गिकरीत्या निर्माण होणाऱ्या वेगांना अडवणे/धरुन ठेवणे. जसे शिंका,मुत्र
10) न पचू शकणारे पदार्थ रक्तात मिसळले जाणे
11) मर्माघात होणे
12) ढगाळ व पावसाळ्यातील वातावरण
*विकृतपणे वाढलेला वात ज्याठिकाणी रिकामी जागा आहे तेथे जाऊन निरनिराळी लक्षणे/विकार/व्याधी निर्माण करतो.
लक्षणे
1)हातपाय,इतर सांधे दुखणे,आखडणे.सांध्यांचा घासण्याचा आवाज येणे.
2) रोमांच उभे राहणे
3) डोकं भणभणने,जड पडणे
4)बडबड वाढणे
5)लंगडत चालणे,हातापायाला मुंग्या येणे,सुज येणे
6) पायाला गोळे येणे, हातापायांची आग होणे,
7)पाय,कंबर,पाठ,मान आखडपणे,दुखणे
8) पायांच्या शिरा ओढल्याप्रमाणे दुखणे.गृध्रसी/sciatica
9)अंगात ताकद नसल्यासारखे वाटणे
10) पक्षाघात(paralysis)
11) पाळीच्या तक्रारी, वारंवार गर्भपात,गर्भाची वाढ खुंटणे,गर्भ न राहणे, योग्य वयाच्या आधीच मेनोपॉझ येणे
12)हिस्टेरीया/योषापस्मार
13) पोटात वात धरल्यासारखे वाटते
अशी अनेक लक्षणे निर्माण होतात.
संपूर्ण शरीरात अव्यहातपणे वाहणाऱ्या वायुचा मार्ग कधीकधी शरिरातील घनरुप व द्रवरुप घटकांमुळे अडतो.जसे कफ, पित्त, रक्त,मांस,मेद,अस्थि,मज्जा,शुक्र,मल,मुत्र,उदक,लसिका इत्यादी.अशावेळी वातासोबत जो शरीरघटक असेल व ज्याठिकाणी असेल ती लक्षणे निर्माण होतात.
****उपचार/उपाय****
1)उष्ण,स्निग्ध ,गोड,आंबट,सैंधव मीठ युक्त पदार्थ खावे
2)मांस सूप, उडीदडाळीचे वडे,कढण तूप घालून प्यावे
3)अश्वगंधा घृत घ्यावे
4) बलातेल,महानारायण तेल,प्रसारणीतेल, इत्यादी ने मालिश करावी,शेक घ्यावा
5) दशमुळ ,बला मुळ दुधात शिजवून प्यावे
6)तेलाचे बस्ति घ्यावे(enema with oil)
7)पोटात वात असल्यास नाभीला एरंडेल लावावे.हिंग्वाष्टक चुर्ण जेवताना घ्यावे
8)पोट रोज साफ राहिल असे बघावे
9) पावसाळ्यात उकळून कोमट पाणी प्यावे
10) पावसापासून व थंडी पासून शरिराचे रक्षण करावे.
No comments:
Post a Comment