गर्भधारणा होत नसेल तर पुरुषांमध्ये वीर्य तपासणी(semen analysis) करतात.शुक्राणू कमी असतिल तर ती वाढविण्यासाठी,
शुक्रजनन करण्यासाठी आयुर्वेदिक औषधी देतात. शुक्र दूषित असेल (abnormal sperms) तर त्यानुसार औषधी दिली जातात.
1) शुक्रजनन औषधी शुक्राची प्रमाण वाढवतात
सहसा स्निग्ध, थंड, पचायला जड, पातळ, गोड अशी पदार्थ शुक्र वाढवतात. जसे दूध, तूप,
शुक्र वाढवणारी औषधी-अश्वगंधा, मुसळी, खडीसाखर, शतावरी
2) शुक्राला बाहेर काढणारे व वाढवणारे औषध- दूध, उडीद, भल्लातक फलमज्जा (गोळंबी)
3) शुक्राला बाहेर काढणारी औषधी-डोरलीफळ,
4) शुक्र स्राव थांबवणारे-जायफळ
5) शुक्र शोषून घेणारे औषध-हिरडा
********शुक्र दूषित असेल (abnormal sperms) तर
पंचकर्म करुन घेऊन मग जो दोष असेल त्याप्रमाणे औषधी दिल्या जातात
जसे-
1) वातामुळे असेल तर - विदारिकंद औषध दूधात उकळून पिणे
2) पित्तामुळे असल्यास-गोखरु, गुळवेल, उसाचा रस
3) कफामुळे असल्यास-पाषाणभेद, अश्मन्तक, पिंपळी
4) रक्तदुषित असल्यास - धातकीचे फुले, खदिर, डाळींब, अर्जुन साल
5) कफवातमिश्रित असल्यास- पलाशक्षार, पाषाणभेद,
6) शुक्र हे पूय युक्त असल्यास- चंदन, त्रिफळा, वडसाल, मनुका, परुषक ह्या औषधाने गुण येतो.
संदर्भ : गो. आ. फडके
******औषधी आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने च घ्यावी. *******
No comments:
Post a Comment