1) पंचकर्म झाल्यावर वैद्याच्या सल्ल्यानुसार पथ्यापथ्यानुसार वागावे.
2) विशेषतः आठ प्रकारचे पथ्य कसोशीने पाळावे. हे जर पाळले नाही तर आजार होण्याची शक्यता असतेच. ह्यांना "अष्टमहादोषकर" म्हणतात.
******************************
अष्टमहादोषकर भाव पुढिल प्रमाणे
1) जोरात ओरडून बोलू नये.
2) खडबडीत रस्त्यावरुन वाहन चालवणे किंवा वाहनात बसून फिरु नये.
3) अधिक प्रमाणात पायी चालू नये.
4) कष्ट देणाऱ्या, टोचणाऱ्या आसनावर अधिक काळापर्यंत बसू नये.
5) अजीर्ण झाले असतानाच पुन्हा खाऊ नये
6) अपथ्य व शरीराला अयोग्य असा आहार घेऊ नये.
7) दिवसा झोपू नये.
8) स्रीसंग, व्यायाम करु नये.
**********************************
अशाप्रकारे आरोग्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तिंनी पंचकर्म झाल्यावर जोपर्यंत स्वस्थ अवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत वरिल नियम पाळावे.
No comments:
Post a Comment