Friday, 9 February 2024

गर्भाशय व मानसिक स्वास्थ

1) गर्भाशयाचा व मानसिक भावनांचा अतिशय जवळचा संबंध आहे. 

2) अत्याधिक मानसिक ताण व चिंता ह्यांचा गर्भाशय व हृदय ह्या दोन्ही अवयवांवर परीणाम होतो .

हृदयातील भावना गर्भाशयात पोहचत असतात.

 3) आयुर्वेदात चिंता, भय ह्यामुळे रसदुष्टी होते असे म्हटले आहे . रसदुष्टि हे हृदयाचे आजार  गर्भाशयाचे, पाळीच्या आजारांचे कारण आहे.

4) Chinese internal medicine मध्ये ह्यालाच  'Bao Mai' म्हणतात .

5) स्त्री ची मानसिक अवस्था ठीक नसेल तर पाळीमध्ये अनेक तक्रारी निर्माण होतात, गर्भाशयात गाठी तयार होतात,गर्भ धारणा होत नाही, वारंवार गर्भपात होतो.

6) मानसिक स्वास्थ उत्तम असेल तर मासिक पाळी नियमित होते व गर्भ राहण्यासाठी अडचण येत नाही.

7) सद्ध्या लोकांना मनाने मोकळे होता येत नाही. सतत तणावाखाली वावरतात असतात. अल्कोहोल, स्मोकिंग, इतर व्यसने वाढली आहेत.ताण कमी करण्यासाठी पाळीव प्राणी सुद्धा घरात ठेवतात. परंतु ह्या कशाचाही उपयोग होत नाही.

 8) गर्भाशयाचे तसेच हृदयाचे काम व्यवस्थितपणे होण्यासाठी नियमीतपणे व्यायाम, योग, प्राणायाम ,समाजात वावरणे, सणासुदीला मनोरंजनासाठी एकत्र येणे, दिनचर्या, आहाराचे नियम पाळणे, गरजेनुसार औषधे,पंचकर्म, acupuncture करणे आवश्यक आहे 

* मानसिक आरोग्य मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असावे.***


Vd Pratibha Bhave ,Pune

8766740253

तुरट चवीचे पदार्थ

  • साधारणपणे तुरट चवीचे पदार्थ थंड , पचायला थोडे हलके, कोरडेपणा आणणारे, रुक्ष गुणाचे असतात
  • जखमांना वरुन लावले तर त्या लवकर भरुन येतात
  • कफ शोषून घेतात, रक्तस्त्राव थांबवतात


***तुरट पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ल्यास

  • हृदयात जडपणा येतो
  • पोटात वायू साठतो. बद्धकोष्ठता होते .
  • वात, मूत्र , शुक्र प्रवृत्ती ला अडथळा येतो
  • शरीरातील रस रक्तादी वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो
  • शरीराला काळपटपणा  येतो, तहान लागते 
  • शरीराचे वजन कमी होऊन कृशता येते
  • * प्रजनन क्षमता कमी होते
  • * पक्षवध (paralysis), अर्दित (facial palsy) , इत्यादी वातरोग होतात.


संदर्भ - च.सू.26

तुरट पदार्थ :- जसे सुपारी, काथ, कच्ची फळे जसे केळी, कच्चा पेरू, कच्ची जांभूळ, हिरवी भोकर इत्यादी


Vd Pratibha Bhave Pune

8766740253

आंबट पदार्थ

  • साधारणपणे आंबट पदार्थ पचायला हलके, उष्ण गुणाचे व स्निग्ध असतात.
  • आंबट पदार्थाने भोजनाला रुची येते
  • आंबट पदार्थ मनाला तृप्त करतात, 
  • अन्नाचे पचन करतात, अधोमार्गाने वात बाहेर काढतात.
  • शरीर शक्ती वाढवतात , इंद्रिय दृढ करतात, ह्रदयाला तृप्त करतात
  • मुखात लालास्त्राव वाढवतात, भोजनाला ओलसरपणा आणतात,तसेच अन्नाचे पचन होताना आतड्याची गती वाढवतात

****

परंतु अत्याधिक प्रमाणात खाल्ले 

  • तर दात शिवशिवतात, आंबतात 
  • पित्त वाढते,खूप तहान लागते, रक्त दूषित होते, अंगाला सूज येऊ लागते(inflammatory)
  • अंगावर किंवा शरीरात जखम असेल, हाड मोडले असेल, अंगावर सूज असेल अशा व्यक्तीने आंबट पदार्थ खाल्ले तर पूय (pus formation) निर्मिती होते
  • कंठ, छाती व हृदयाच्या ठिकाणी जळजळ होते.

आंबट पदार्थ - दही, व्हिनेगर,  चिंचा, कैरी, डोंगरी आवळा, न पिकलेली द्राक्षे, करवंद,आंबट बोरे संत्री इत्यादि 

 

सन्दर्भ - चरक सूत्रस्थान 26/43

Vd Pratibha Bhave,Pune 8766740253

खारट पदार्थ

खारट पदार्थ शरीरात ओलसरपणा निर्माण करतात. अवयव मृदु करतात .तीक्ष्ण गुणाचे असतात. आहाराला रुची आणतात.गुणाने जरा स्निग्ध, थोडे उष्ण, व पचायला थोडे जड असतात.

1) योग्य प्रमाणात व योग्य स्वरूप घेतले तर भूक वाढवतात, 

2) शरीरात साठलेले दोष ,मल  पातळ करुन , मार्ग मोकळा करून बाहेर काढतात.

3) वात कमी करतात, आखडलेले अवयव मोकळे करतात

4) खारट पदार्थ हे सर्व चवींच्या विरुद्ध आहे

**अत्याधिक प्रमाणात खारट पदार्थ खाल्ल्यास पित्त वाढते,रक्त पातळ होते, तहान लागते,शरीरातील उष्णता वाढते, मांस दूषित होते,शरीरातील विष वाढतात,

**प्रजनन शक्ती कमी होते, ज्ञानेंद्रिय- कर्मेंद्रिये - मन ह्यांची विषय ग्रहणशक्ती मध्ये अडथळा येतो

**दात लवकर पडतात, टक्कल पडते,केश गळतात, ,पिकतात .शरीरावर सुरकुत्या पडतात.

**याशिवाय

- रक्तपित्त (bleeding  tendencies)

-अम्लपित्त(acidity), 

-विसर्प(fast spreading inflammatory diseases)  

-वातरक्त (Gout) 

-विचर्चिका (eczema)

इत्यादी अआजार होतात.


संदर्भ:-चरक सूत्रस्थान 26/43

खारट पदार्थ :- जसे वरुन  किंवा अधिक प्रमाणात मीठ खाणे, खारवलेले पदार्थ,खारट केलेले काजू बदाम इत्यादी, चायनीज पदार्थ-ओजिनोमोटो , निरनिराळे सॉस,चिप्स, फ्रेंच फ्राईज,लोणची,पापड, ठेचा इत्यादी.

Vd Pratibha Bhave, Pune 

8766740253

कडू पदार्थांचा शरीरावर परिणाम

1) कडू चवीचे पदार्थ आपल्याला खायला आवडत नाही.परंतु जीभेला चव नसेल तर कडू पदार्थ खाल्ल्याने चव पूर्ववत होते.जसे कारले, 

2) कडू पदार्थ शरीर निर्विष करतात.

3) कृमी,खाज, आग होणे, त्वचेचे रोग, वारंवार तहान लागणे, ताप येणे, ह्यासाठी कडू पदार्थाचा उपयोग होतो.

4) कडू पदार्थ भूक वाढवतात तसेच अन्नाचे पचन करतात. तसेच स्तनपान करणाऱ्या स्त्री च्या दुधामध्ये असलेले दोष दूर करुन दूध शुध्द करतात.

5) कडू पदार्थ शरीरातील, रक्तातील चिकटपणा,मेद , फॅट,स्त्राव, पू,घाम,मुत्र,मल,पित्त,कफ शोषून घेतात.

6) साधारणपणें कडू चवीचे पदार्थ पचायला हलके, गुणाने थंड व शरीरात कोरडेपणा निर्माण करणारे असतात.

7) अधिक प्रमाणात,सतत कडू पदार्थ घेतली तर शरीरात कोरडेपणा ,कडकपणा येतो. वजन कमी होते,शरीर बारीक होते, मनाची प्रसन्नता कमी होते.

चक्कर येणे, तोंड कोरडे पडणे, हाडे ठिसूळ होणे, सांधे झिजणे,तसेच इतर अनेक वाताचे आजार होतात.

संदर्भ:- चरक सूत्रस्थान 26/43-45

Vd Pratibha Bhave Pune

8766740253

गर्भिणीसाठी शिंगाडा (Water Chestnut)

1) गर्भिणीने अगदी गर्भ राहिल्या पासून  शिंगाडा खावा. त्यापासून बनवलेले निरनिराळे पदार्थ खावे.

2) शिंगाडा ताजा, शिंगड्याचे पीठ असे दोन्ही उपयोगात आणावे

3) ताजा शिंगाडा उकळून खावा.बाजारात शिजवलेले शिंगाडे मिळतात ते खावे.  मात्र प्रमाणात खावे. गर्भिणी ने रोज साधारणपणे 4ते 5शिंगाडे रोज खावे 

4)रव्याची/शेवयांची खीर करताना त्यात ताजा शिंगाडा किसून टाकावा

5)शिंगाड्याच्या पिठाचे लाडू ,शिरा करता येतो.

6)शिंगड्याच्या पिठाचे लाडू करताना पीठ साजूक तुपात भाजून घ्यावे. त्यात 

 पिठात मावेल ऐवढे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालावे,त्यात पिठाच्या एक चतुर्थांश (¼) सुक्या नारळाचा किस मिसळावा. त्यात शेवटी मिक्सर मध्ये बारीक केलेले मनुके व साखर मिसळून लाडू करावे हे पौष्टिक लाडू गर्भिणी ने रोज 1 खावे. हे लाडू टिकतात.

1 लाडू  साधारणपणे 20gm -30gm वजनाचे असावे 

7) गर्भ पात होऊ नये म्हणून शिंगाडा खूप उपयोगी आहेत. गर्भिणी ने रोज दूधात 1चमचा  शिंगाड्याचे भाजलेले पीठ व चवीनुसार साखर मिसळून प्यावे.

***शृंगाटकं बिसं द्राक्षा कशेरु मधुकं सिता l

यथासंख्य प्रयोक्तव्या: गर्भस्त्रावे पयोयुत ll सु.शा. 10


*शिंगाड्याचे पीठ खात्रीचे घ्यावे. भेसळयुक्त नको*.


वैद्या प्रतिभा भावे, पुणे 8766740253

आरोग्यासाठी #आयुर्वेद

**वात पित्त कफ ह्यांना त्रिदोष म्हणतात.

आपल्या शरीरात वात पित्त व कफ योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात ,योग्य स्वरुपात असले की आरोग्य मिळते.हे बिघडले की आजार होतात. 

** त्रिदोष बिघडण्याची 3 कारणे आहेत:-

1) काळ -पाऊस, उष्णता, थंडी ह्या लक्षणाने युक्त काळ अनियमित होणे

2) इंद्रियांचा (ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिेय, मन) असंतुलित

उपयोग करणे. -

जसे श्रवणेंद्रिय च्या बाबतीत -

अतिशय कर्कश आवाज सतत ऐकणे, आवाज अजिबातच न ऐकणे, तिरस्कार युक्त भीतीदायक आवाज ऐकणे. असेच इतर इंद्रियांच्या बाबतीत करणे.

 3) प्रज्ञापराध - बुध्दी दोषयुक्त होणे. धी, धृती, स्मृति भ्रष्ट झाल्यामुळे मनुष्य जे अशुभ कर्म करतो त्याला प्रज्ञापराध म्हणतात.

.हे अशुभ कर्म शारीरिक , वाचिक, मानसिक अशा पद्धतीने घडतात.

*कायिक (शारीरिक)- चोरी,मारामारी करणे,वेडेवाकडे झोपणे,अधिक साहस करणे, मलमुत्र इत्यादी वेग धारण करणे किंवा मुद्दाम वेग प्रवृत्त करणे, इत्यादी 

*वाचिक - कलह,भांडण, असंबद्ध, अशिष्ट, कठोर वाणी इत्यादी

*मानसिक - विनय सदाचार हीनता, क्रूरकर्मा, दुष्टकर्मा, दुराचारी लोकांशी मित्रता करणे,दुसऱ्याचे वाईट चिंतने, इत्यादी.

ह्या कारणांनी वात पित्त कफ असंतुलित होतात,तसेच मनाचा सत्वगुण कमी होऊन रजो व ,तमोगुण वाढतो. त्यामुळे अनेक आजार होतात.

 ह्या तीन त्यापैकी 'काळ'  मनुष्याच्या हातात नाही. परंतु इतर दोन कारणे दूर करता येतात.

*इंद्रिये नियंत्रण करणे,प्रज्ञापराध न करणे, योग, स्वस्थ्यवृत्त,दिनचर्या, ऋतुचर्या ,आचार रसायन, असे आरोग्याचे नियम पाळले तर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकून राहते. 

आरोग्य मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असावे.


***************

Vd Pratibha Bhave pune

Regimen of diet according to Ayurveda (भोजन करण्याचे आयुर्वेदोक्त नियम)

1) काले – Food should be taken at the proper time, 2)   सात्म्ये-food should be familial, acceptable  3) शुचि – it should be clean 4) हितं -...