Friday, 9 February 2024

आरोग्यासाठी #आयुर्वेद

**वात पित्त कफ ह्यांना त्रिदोष म्हणतात.

आपल्या शरीरात वात पित्त व कफ योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात ,योग्य स्वरुपात असले की आरोग्य मिळते.हे बिघडले की आजार होतात. 

** त्रिदोष बिघडण्याची 3 कारणे आहेत:-

1) काळ -पाऊस, उष्णता, थंडी ह्या लक्षणाने युक्त काळ अनियमित होणे

2) इंद्रियांचा (ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिेय, मन) असंतुलित

उपयोग करणे. -

जसे श्रवणेंद्रिय च्या बाबतीत -

अतिशय कर्कश आवाज सतत ऐकणे, आवाज अजिबातच न ऐकणे, तिरस्कार युक्त भीतीदायक आवाज ऐकणे. असेच इतर इंद्रियांच्या बाबतीत करणे.

 3) प्रज्ञापराध - बुध्दी दोषयुक्त होणे. धी, धृती, स्मृति भ्रष्ट झाल्यामुळे मनुष्य जे अशुभ कर्म करतो त्याला प्रज्ञापराध म्हणतात.

.हे अशुभ कर्म शारीरिक , वाचिक, मानसिक अशा पद्धतीने घडतात.

*कायिक (शारीरिक)- चोरी,मारामारी करणे,वेडेवाकडे झोपणे,अधिक साहस करणे, मलमुत्र इत्यादी वेग धारण करणे किंवा मुद्दाम वेग प्रवृत्त करणे, इत्यादी 

*वाचिक - कलह,भांडण, असंबद्ध, अशिष्ट, कठोर वाणी इत्यादी

*मानसिक - विनय सदाचार हीनता, क्रूरकर्मा, दुष्टकर्मा, दुराचारी लोकांशी मित्रता करणे,दुसऱ्याचे वाईट चिंतने, इत्यादी.

ह्या कारणांनी वात पित्त कफ असंतुलित होतात,तसेच मनाचा सत्वगुण कमी होऊन रजो व ,तमोगुण वाढतो. त्यामुळे अनेक आजार होतात.

 ह्या तीन त्यापैकी 'काळ'  मनुष्याच्या हातात नाही. परंतु इतर दोन कारणे दूर करता येतात.

*इंद्रिये नियंत्रण करणे,प्रज्ञापराध न करणे, योग, स्वस्थ्यवृत्त,दिनचर्या, ऋतुचर्या ,आचार रसायन, असे आरोग्याचे नियम पाळले तर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकून राहते. 

आरोग्य मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असावे.


***************

Vd Pratibha Bhave pune

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...