1) गर्भिणीने अगदी गर्भ राहिल्या पासून शिंगाडा खावा. त्यापासून बनवलेले निरनिराळे पदार्थ खावे.
2) शिंगाडा ताजा, शिंगड्याचे पीठ असे दोन्ही उपयोगात आणावे
3) ताजा शिंगाडा उकळून खावा.बाजारात शिजवलेले शिंगाडे मिळतात ते खावे. मात्र प्रमाणात खावे. गर्भिणी ने रोज साधारणपणे 4ते 5शिंगाडे रोज खावे
4)रव्याची/शेवयांची खीर करताना त्यात ताजा शिंगाडा किसून टाकावा
5)शिंगाड्याच्या पिठाचे लाडू ,शिरा करता येतो.
6)शिंगड्याच्या पिठाचे लाडू करताना पीठ साजूक तुपात भाजून घ्यावे. त्यात
पिठात मावेल ऐवढे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालावे,त्यात पिठाच्या एक चतुर्थांश (¼) सुक्या नारळाचा किस मिसळावा. त्यात शेवटी मिक्सर मध्ये बारीक केलेले मनुके व साखर मिसळून लाडू करावे हे पौष्टिक लाडू गर्भिणी ने रोज 1 खावे. हे लाडू टिकतात.
1 लाडू साधारणपणे 20gm -30gm वजनाचे असावे
7) गर्भ पात होऊ नये म्हणून शिंगाडा खूप उपयोगी आहेत. गर्भिणी ने रोज दूधात 1चमचा शिंगाड्याचे भाजलेले पीठ व चवीनुसार साखर मिसळून प्यावे.
***शृंगाटकं बिसं द्राक्षा कशेरु मधुकं सिता l
यथासंख्य प्रयोक्तव्या: गर्भस्त्रावे पयोयुत ll सु.शा. 10
*शिंगाड्याचे पीठ खात्रीचे घ्यावे. भेसळयुक्त नको*.
वैद्या प्रतिभा भावे, पुणे 8766740253
No comments:
Post a Comment