Friday, 9 February 2024

आंबट पदार्थ

  • साधारणपणे आंबट पदार्थ पचायला हलके, उष्ण गुणाचे व स्निग्ध असतात.
  • आंबट पदार्थाने भोजनाला रुची येते
  • आंबट पदार्थ मनाला तृप्त करतात, 
  • अन्नाचे पचन करतात, अधोमार्गाने वात बाहेर काढतात.
  • शरीर शक्ती वाढवतात , इंद्रिय दृढ करतात, ह्रदयाला तृप्त करतात
  • मुखात लालास्त्राव वाढवतात, भोजनाला ओलसरपणा आणतात,तसेच अन्नाचे पचन होताना आतड्याची गती वाढवतात

****

परंतु अत्याधिक प्रमाणात खाल्ले 

  • तर दात शिवशिवतात, आंबतात 
  • पित्त वाढते,खूप तहान लागते, रक्त दूषित होते, अंगाला सूज येऊ लागते(inflammatory)
  • अंगावर किंवा शरीरात जखम असेल, हाड मोडले असेल, अंगावर सूज असेल अशा व्यक्तीने आंबट पदार्थ खाल्ले तर पूय (pus formation) निर्मिती होते
  • कंठ, छाती व हृदयाच्या ठिकाणी जळजळ होते.

आंबट पदार्थ - दही, व्हिनेगर,  चिंचा, कैरी, डोंगरी आवळा, न पिकलेली द्राक्षे, करवंद,आंबट बोरे संत्री इत्यादि 

 

सन्दर्भ - चरक सूत्रस्थान 26/43

Vd Pratibha Bhave,Pune 8766740253

No comments:

Post a Comment

अगदी 15 दिवसात 40% टक्के #गुडघेदुखी थांबली डॉक्टर

 दिनांक 04/04/2025 ला त्या माझ्या क्लिनिक ला आल्या. माझ्या पेशंट च्या सासुबाई आहेत  पुण्यात विमाननगर येथे राहतात वय 65वर्षे वजन 74kg *******...