Tuesday, 2 May 2023

आरोग्यासाठी

रुग्णांचा  नेहमीचा प्रश्न ,

'कुठलेही आजार होऊ नये म्हणून काय करावे '? 

ह्याचे #आयुर्वेदात आचार्य चरक यांनी अगदी सुटसुटीत संक्षेपात उत्तर दिलेले आहे. 

हे तंतोतंत पाळणे अवघड आहे पण आजारी पडल्यावर जो त्रास होतो त्यापेक्षा आजारी पडू नये म्हणून प्रयत्न करायला हवे.

1) कल्याणकारी,हितकर, स्वास्थ्यवर्धक असा आहार, विहार(lifestyle) करावा.

2) परीक्षण करून विचारपूर्वक कार्य करावे .

3) डोळे,कान इत्यादी 11इंद्रियांचा संतुलितपणे उपयोग करावा 

4) यथाशक्ती दान करावे 

5) सर्वांच्याप्रती समान बुद्धी ठेवावी 

6) सत्य बोलावे

7) क्षमावान, सहनशील गुण युक्त असावे 

8) गुरुजन, आप्तजन ह्यांचे अनुसरण करावे 

ह्याचे पालन केले तर मनुष्य आजारी पडत नाही.


**तसेच  शुद्ध बुद्धी, सुखदायक वाणी,सुखदायक आहारविहार, आज्ञाधारकपणा, ज्ञान, तप दृढ संकल्प,योग ह्यासाठी नेहमीच तप्तर असा व्यक्ती नेहमीच निरोगी राहतो.

संदर्भ च. शा.2/46-47

Vd Pratibha Bhave,Pune

उत्तम आरोग्यासाठी

*रोगप्रतिकारशक्ती

*आरोग्य

*आयुष्य

*प्राण

-हे चारही शरीरात असलेल्या  अग्नि वर अवलंबून आहेत  असे #आयुर्वेदाचे मत आहे.

-अग्नि म्हणजे पचनशक्ती. 

-अन्नपान हे पाचन करणाऱ्या अग्निचे इंधन आहे.

-हे इंधन योग्य रुपात मिळाले तर अग्नि उत्तम राहतो. इंधन योग्य नसेल तर अग्नि नष्ट होतो. म्हणून अन्न हे नियम पूर्वक घ्यावे. आपले प्राण अन्नावर अवलंबून आहे.

-अग्नि बिघडला की रोगप्रतिकार क्षमता कमी होते. आरोग्य बिघडते. आयुष्य कमी होते. प्राणज्योत नष्ट होते. 

म्हणूनच -

*अन्नाला' ब्रम्ह '

*शरीरातील अग्निला 'यज्ञ' 

*अन्न खाणे,जेवण करणे ह्याला 'यज्ञकर्म 'म्हटले आहे 

***********

'बलमारोग्यमायुश्च प्राणाश्चlग्नौ प्रतिष्टिता: l

अन्नपान इंधनैश्चlग्निर्ज्वलति व्येति चान्यथा ll 342ll '

च. सू.27


Vd Pratibha Bhave,Pune

मद्याचे दुष्परिणाम दूर करण्यासाठी (Healthy Juice to treat bad effects of #Alcohol)

मन्थ : खर्जूरमृद्वीकावृक्षाम्लाम्लीकदाडिमैं : l

परुषकै: सामलकैर्युक्तो मद्यविकारनूत् ll

संदर्भ- च. सूत्रस्थान 23/38

*सतत , अधिक प्रमाणात , नियम न पाळता  मद्य पिल्यामुळे अनेक शारीरिक व मानसिक आजार होतात. *अन्नाचे पचन बिघडते, रोगप्रतिकारशक्ती कमी होते, शरीराची कांती प्रभा नष्ट होते,शुक्र कमी होते,अंगावरील मांस कमी होऊ लागते, ताकद कमी होते, ओजक्षय होतो.उन्माद,प्रलाप, व्यर्थ बडबड करणे, अंगदुखी, छाती,पोट दुखणे, अंगावर सूज येणे,पोट फुगणे, मलमुत्र प्रवृत्ति का अडथळा येणे सांधेदुखी, हाडे दुखणे,वाताचे आजार अशा अनेक तक्रारी सूरू होतात.

*मद्याचा शरीरावर होणारा दुष्परिणाम दूर करण्यासाठी खजूर, मनुका, कोकम, चिंच,डाळिंब ,फालसा व आवळा ह्यापासून बनवलेला मंथ प्यावा असे #आयुर्वेदात सांगितले आहे.

**#मंथ म्हणजे सरबत /मिक्स फ्रूट ज्यूस म्हणता येईल.

***************.

कृती -

-ही सर्व फळे प्रत्येकी 5gm घ्यावी. 

-त्याच्या 14पट माठातील पाणी, म्हणजे साधारणपणे 500ml पाणी 

- खजूर,मनुका,  कोकम,  चिंच , फालसा, आवळा,डाळिंब दाणे सुकलेल हे सर्व अर्धा तास पाण्यात भिजत घालावे. त्यानंतर कुस्करून बिया काढून घ्याव्या. मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे. त्यात पाणी मिसळून पुन्हा मिक्सर मध्ये फिरवावे. छान गुलाबी लाल रंग आला की गाळून प्यावे.

- हा मंथ अतिशय पौष्टिक, ओज, बल कांती, मांस, रक्त वाढवणारा. तात्काळ वातपित्त कमी करणारा आहे. पचन सुधारते, मलमुत्र प्रवृत्ती योग्य प्रकारे होते. तात्काळ तरतरी येते. उन्हाळ्यात तर प्यायलाच हवा.

Vd. Pratibha Bhave,Pune

8766740253

आजारपण शरीराचे व मनाचे

-#आयुर्वेदानुसार  मनुष्यात कधी शरीराला तर कधी मनाला आजार होतात.

  •  वात, पित्त, कफ ह्यांचे संतुलन बिघडले की शरीराला आजार होतात. जसे सर्दी,खोकला, मलब्धता , उलटी,इत्यादी 
  • मनात रज व तम वाढल्यावर  मनाला आजार होतात. जसे उन्माद,अपस्मार,उदासीनता, इत्यादी 
  •  शारीरिक आजार मनाला दुःख देतात व मानसिक आजार सुद्धा शरीरावर परिणाम करतात. 
  • शारीरिक आजारासाठी वात पित्त कफ संतुलित करण्यासाठी उपाय केल्या जाते. मानसिक आजारात सत्व गुण वाढवण्याकरता उपाय केल्या जातात.
  • पंचकर्म उपचार हे शारीरिक व मानसिक दोन्ही आजारासाठी उपयुक्त आहेत. पंचकर्म केल्याने शरीर शुद्धी होते त्याचबरोबर #मानसिक शुद्धी होते.
  • - रोगाचे स्वरूप,,रोगाचे कारण, रोग्याचे बल,ऋतू, अशा अनेक कारणांचा विचार करून पंचकर्म,औषधे, पथ्यापथ्य, आहार,विहार,दिनचर्या ठरवली जाते.


Vd Pratibha Bhave,Pune

तारुण्यपण टिकवण्यासाठी - रसायन चिकित्सा


  • ह्यासाठी रसायन चिकित्सा  करावी
  • आयुर्वेदात  रसायन चिकित्सा ला खूप महत्व आहे.
  • जे औषध वृद्धावस्था व रोग नष्ट करतो त्याला रसायन म्हणतात.

यज्जराव्याधिविध्वंसि भेषजं तद्रसायनम् ll


रसायन चिकित्सा करण्याचे वय:-

  • तरुण  अवस्थेच्या प्रारंभी 
  •  तरुण अवस्थेच्या मध्यात 
  • म्हणजे वय 16 ते वय 45 ह्या कालावधीत रसायन चिकित्सा करावी


वमन, विरेचन, बस्ति इत्यादी पंचकर्मा ने शरीरशुद्ध झाल्यावर रसायन चिकित्सा करावी लागते.

ज्याप्रमणे मळलेलया कपड्याला रंग दिला तर तो नीट बसत नाही त्याचप्रमाणे शरीरशुद्धी केल्याशिवाय रसायन औषधी उपयोगी होत नाही.

***रसायन चिकित्सा केल्याने हल्ली खूप प्रमाणात आढळणारा # PCOD, fatigue #Abnormal Sperms,#Metabolic syndrome,#Psycological crises असे अनेक आजार नियंत्रणात येतात 


Vd. Pratibha Bhave ,Pune

बाळांच्या आरोग्यासाठी

  • बाळ पुर्ण 6महिन्याचे. बाळाला सुवर्ण बिंदू प्राशन करण्यासाठी आमच्या रुग्णालयात आली. बाळाचे वजन केले.4.5किलो होते. बाळाचे वजन कमी आहे असे मी सांगितल्यावर चिंतातुर झाली. 
  • त्याचे वजन कसे भरुन काढायचे ह्यासाठी अनेक प्रश्नांचा भडीमार सुरु झाला.
  • तिने सात दिवसापूर्वीच वरणाचे पाणी, भाताची पेज इत्यादी सुरू केले होते.ती बाळाला अंगावरचे  दूध पाजत होती.वरचे दूध सुरु केले होते . ती बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय प्रयत्नशील होती.
  • 2वर्षे अंगावर पाजायचे आहे व तिच्या आरोग्यावर बाळाचे आरोग्य अवलंबून आहे हे तिला माहितच नव्हते. तपासणी केल्यावर ,अंगावरील दुधाचे प्रमाण, घट्टपणा कमी झाला आहे हे लक्षात आले. त्यामुळे बाळाच्या वाढीवर परिणाम झाला असे आम्ही सांगितले.
  • आयुर्वेदात आई दूध वाढवण्यासाठी अनेक औषधी आहेत.
  • आयुर्वेदात 2वर्षांपर्यंतच्या व आई चे दूध पिणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी  बाळावर औषधांचा भडीमार करण्यापेक्षा दूध पाजणाऱ्या आईला औषध देण्यावर  भर दिलेला आहे. ह्या पद्धतीमुळे  बाळाला कुठलाही अपाय न होता आजारांचा निर्धोकपणे उपाय होतो.
  • वरील बाळाच्या  आईला विदारीकंद, अश्वगंधा व शतावरी ह्या औषधी दुधात शिजवून पिण्यासाठी दिले. 15दिवसात बाळाचे वजन 5.8 किलो झाले. 
  • आई चे दूध बाळाला मिळणे हा त्याचा नैसर्गिक हक्क आहे. तो त्याला मिळावा म्हणून मातेने नेहमीच प्रयत्नशील रहावे. हे प्रयत्नपूर्वक केल्यास बाळाचे शारीरिक व मानसिक आरोग्य अबाधित राहते.


Vd Pratibha Bhave,Pune

8766740253

डोळ्यांच्या आरोग्यासाठी

  1.  उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी विशेषतः घ्यावी लागते.
  2. आयुर्वेदानुसार डोळे हे आलोचक पित्ताचे स्थान आहे. 
  3. उन्हाळ्यात उष्ण, कोरडी,हवा असते . त्यामुळे डोळे कोरडे पडणे, आग होणे, खाजवणे, लाल होणे, पाणी येणे अशा अनेक तक्रारी निर्माण होतात.
  4. अशा तक्रारी निर्माण झाल्यावर औषध घेण्यापेक्षा डोळे थंड राहतील, कोरडेपणा निर्माण होणार नाही ह्यासाठी प्रयत्नशील असावे .
  5. तसेच शरीरातील साखर मीठ पाण्याचे संतुलन राखण्यासाठी सरबत,रस,पातळ पेय प्यावी. उन्हापासून संरक्षण करावे.
  6. आयुर्वेदिक वैद्यकीय सल्ल्याने डोळ्यांमध्ये नियमितपणे नेत्रबिंदू घालावे. 
  7. आम्ही लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत  सर्वांना उन्हाळयात हे नेत्राबिंदू देतो.
  8. ह्यामुळे डोळ्यांवर ताण येत नाही, कोरडेपणा लगेच कमी होतो,आग होणे, पाणी येणे, खाजवणे, ह्या तक्रारीं पासून सुटका होते.


Vd Pratibha Bhave, Pune

Sukhkarta Ayurvedic Panchkarma clinic,Pune

8766740253

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...