-#आयुर्वेदानुसार मनुष्यात कधी शरीराला तर कधी मनाला आजार होतात.
- वात, पित्त, कफ ह्यांचे संतुलन बिघडले की शरीराला आजार होतात. जसे सर्दी,खोकला, मलब्धता , उलटी,इत्यादी
- मनात रज व तम वाढल्यावर मनाला आजार होतात. जसे उन्माद,अपस्मार,उदासीनता, इत्यादी
- शारीरिक आजार मनाला दुःख देतात व मानसिक आजार सुद्धा शरीरावर परिणाम करतात.
- शारीरिक आजारासाठी वात पित्त कफ संतुलित करण्यासाठी उपाय केल्या जाते. मानसिक आजारात सत्व गुण वाढवण्याकरता उपाय केल्या जातात.
- पंचकर्म उपचार हे शारीरिक व मानसिक दोन्ही आजारासाठी उपयुक्त आहेत. पंचकर्म केल्याने शरीर शुद्धी होते त्याचबरोबर #मानसिक शुद्धी होते.
- - रोगाचे स्वरूप,,रोगाचे कारण, रोग्याचे बल,ऋतू, अशा अनेक कारणांचा विचार करून पंचकर्म,औषधे, पथ्यापथ्य, आहार,विहार,दिनचर्या ठरवली जाते.
Vd Pratibha Bhave,Pune
No comments:
Post a Comment