मन्थ : खर्जूरमृद्वीकावृक्षाम्लाम्लीकदाडिमैं : l
परुषकै: सामलकैर्युक्तो मद्यविकारनूत् ll
संदर्भ- च. सूत्रस्थान 23/38
*सतत , अधिक प्रमाणात , नियम न पाळता मद्य पिल्यामुळे अनेक शारीरिक व मानसिक आजार होतात. *अन्नाचे पचन बिघडते, रोगप्रतिकारशक्ती कमी होते, शरीराची कांती प्रभा नष्ट होते,शुक्र कमी होते,अंगावरील मांस कमी होऊ लागते, ताकद कमी होते, ओजक्षय होतो.उन्माद,प्रलाप, व्यर्थ बडबड करणे, अंगदुखी, छाती,पोट दुखणे, अंगावर सूज येणे,पोट फुगणे, मलमुत्र प्रवृत्ति का अडथळा येणे सांधेदुखी, हाडे दुखणे,वाताचे आजार अशा अनेक तक्रारी सूरू होतात.
*मद्याचा शरीरावर होणारा दुष्परिणाम दूर करण्यासाठी खजूर, मनुका, कोकम, चिंच,डाळिंब ,फालसा व आवळा ह्यापासून बनवलेला मंथ प्यावा असे #आयुर्वेदात सांगितले आहे.
**#मंथ म्हणजे सरबत /मिक्स फ्रूट ज्यूस म्हणता येईल.
***************.
कृती -
-ही सर्व फळे प्रत्येकी 5gm घ्यावी.
-त्याच्या 14पट माठातील पाणी, म्हणजे साधारणपणे 500ml पाणी
- खजूर,मनुका, कोकम, चिंच , फालसा, आवळा,डाळिंब दाणे सुकलेल हे सर्व अर्धा तास पाण्यात भिजत घालावे. त्यानंतर कुस्करून बिया काढून घ्याव्या. मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे. त्यात पाणी मिसळून पुन्हा मिक्सर मध्ये फिरवावे. छान गुलाबी लाल रंग आला की गाळून प्यावे.
- हा मंथ अतिशय पौष्टिक, ओज, बल कांती, मांस, रक्त वाढवणारा. तात्काळ वातपित्त कमी करणारा आहे. पचन सुधारते, मलमुत्र प्रवृत्ती योग्य प्रकारे होते. तात्काळ तरतरी येते. उन्हाळ्यात तर प्यायलाच हवा.
Vd. Pratibha Bhave,Pune
8766740253
No comments:
Post a Comment