रुग्णांचा नेहमीचा प्रश्न ,
'कुठलेही आजार होऊ नये म्हणून काय करावे '?
ह्याचे #आयुर्वेदात आचार्य चरक यांनी अगदी सुटसुटीत संक्षेपात उत्तर दिलेले आहे.
हे तंतोतंत पाळणे अवघड आहे पण आजारी पडल्यावर जो त्रास होतो त्यापेक्षा आजारी पडू नये म्हणून प्रयत्न करायला हवे.
1) कल्याणकारी,हितकर, स्वास्थ्यवर्धक असा आहार, विहार(lifestyle) करावा.
2) परीक्षण करून विचारपूर्वक कार्य करावे .
3) डोळे,कान इत्यादी 11इंद्रियांचा संतुलितपणे उपयोग करावा
4) यथाशक्ती दान करावे
5) सर्वांच्याप्रती समान बुद्धी ठेवावी
6) सत्य बोलावे
7) क्षमावान, सहनशील गुण युक्त असावे
8) गुरुजन, आप्तजन ह्यांचे अनुसरण करावे
ह्याचे पालन केले तर मनुष्य आजारी पडत नाही.
**तसेच शुद्ध बुद्धी, सुखदायक वाणी,सुखदायक आहारविहार, आज्ञाधारकपणा, ज्ञान, तप दृढ संकल्प,योग ह्यासाठी नेहमीच तप्तर असा व्यक्ती नेहमीच निरोगी राहतो.
संदर्भ च. शा.2/46-47
Vd Pratibha Bhave,Pune
No comments:
Post a Comment