- बाळ पुर्ण 6महिन्याचे. बाळाला सुवर्ण बिंदू प्राशन करण्यासाठी आमच्या रुग्णालयात आली. बाळाचे वजन केले.4.5किलो होते. बाळाचे वजन कमी आहे असे मी सांगितल्यावर चिंतातुर झाली.
- त्याचे वजन कसे भरुन काढायचे ह्यासाठी अनेक प्रश्नांचा भडीमार सुरु झाला.
- तिने सात दिवसापूर्वीच वरणाचे पाणी, भाताची पेज इत्यादी सुरू केले होते.ती बाळाला अंगावरचे दूध पाजत होती.वरचे दूध सुरु केले होते . ती बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय प्रयत्नशील होती.
- 2वर्षे अंगावर पाजायचे आहे व तिच्या आरोग्यावर बाळाचे आरोग्य अवलंबून आहे हे तिला माहितच नव्हते. तपासणी केल्यावर ,अंगावरील दुधाचे प्रमाण, घट्टपणा कमी झाला आहे हे लक्षात आले. त्यामुळे बाळाच्या वाढीवर परिणाम झाला असे आम्ही सांगितले.
- आयुर्वेदात आई दूध वाढवण्यासाठी अनेक औषधी आहेत.
- आयुर्वेदात 2वर्षांपर्यंतच्या व आई चे दूध पिणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी बाळावर औषधांचा भडीमार करण्यापेक्षा दूध पाजणाऱ्या आईला औषध देण्यावर भर दिलेला आहे. ह्या पद्धतीमुळे बाळाला कुठलाही अपाय न होता आजारांचा निर्धोकपणे उपाय होतो.
- वरील बाळाच्या आईला विदारीकंद, अश्वगंधा व शतावरी ह्या औषधी दुधात शिजवून पिण्यासाठी दिले. 15दिवसात बाळाचे वजन 5.8 किलो झाले.
- आई चे दूध बाळाला मिळणे हा त्याचा नैसर्गिक हक्क आहे. तो त्याला मिळावा म्हणून मातेने नेहमीच प्रयत्नशील रहावे. हे प्रयत्नपूर्वक केल्यास बाळाचे शारीरिक व मानसिक आरोग्य अबाधित राहते.
Vd Pratibha Bhave,Pune
8766740253
No comments:
Post a Comment