Saturday, 28 July 2018

रजोनिवृत्ती नंतरचा रक्तस्त्राव

रजोनिवृत्तिनंतरचा रक्तस्त्राव:-
  साधारणतः 45-50 वर्षे  हया वयात पाळी चे येणे पुर्णपणे थांबते.पाळी एक वर्ष पर्यंत आली नाही तर रजोनिवृत्ती (menopause) आहे असे समजावे.
****त्यानंतर मात्र अंगावर जाऊ लागले तर लगेच डॉक्टरांकडे दाखवावे.लपवू नये ,तसेच घरगुती उपाय करु .
रजोनिवृत्ती नंतर अंगावर लाल जाण्याची कारणे:-
1)Polyps/ग्रंथी: -गर्भाशयात , गर्भाशयाच्या मुखाशी  मृदु कोंबासारखी वाढ दिसून येते. 
हयामुळे कधी थेंब थेंब तर कधी भरपूर प्रमाणात रक्तस्त्राव होतो . मुख्यतः स्पर्श झाल्यास अधिक प्रमाणात होतो.
2)पाळी गेल्यावर  गर्भाशयाच्या संबंधीत हार्मोन्सची मात्रेत बदल होतो . गर्भाशयाच्या आतील थर जाड झाल्यामुळे  कधीकधी रक्तस्त्राव होतो.कधीकधी आतील थराच्या रचनेत विकृत बदल होऊन कॅन्सर ची शक्यता असते .
3)कधी कधी पाळी गेल्यावर गर्भाशयाच्या आतील थराचे पोषण होत नाही,ते खूपच पातळ होते, त्यामुळे सुद्धा रक्तस्त्राव होतो
3)पाळीच्या मार्गाचे (vagina)पोषण स्त्रीविशिष्ट हार्मोन्स ने होत असते.मेनोपॉज मुळे हा मार्ग रुक्ष होतो.तेथील त्वचा पातळ (Thin) होते त्यामुळे जंतुसंसर्गाने,स्पर्शाने, आघाताने रक्तस्त्राव होतो.
4)औषधी  -रक्त पातळकरणाऱ्या औषधीं, हार्मोन्स,टॅमोक्सिफेन,

*****रक्तस्त्राव कशामुळे होतो हे शोधण्यासाठी सोनोग्राफी, गर्भाशयाचा आतील स्तराची दुर्बिणीतून तसेच मायक्रोस्कोपखाली तपासणी करणे.याद्वारे रक्तस्त्रावाचे कारण समजते*****

***उपचार-आधुनीक शास्त्रानुसार***
 रक्तस्त्राव होण्याला जे कारण असेल त्याप्रमाणे उपचार केले जातात.जसे
-गर्भाशयाचा आतला थर जाड झाला असेल , ग्रंथी/polyps असतिल  तर  तो खरडून काढुन हार्मोन्स च्या गोळ्या देतात.तसेच रक्त स्त्राव थांबायचे औषध देतात.
-गर्भाशय आतिल अस्तर, (endometrium) पाळीच्यामार्गाची त्वचा  पातळ झाली असेल तर हार्मोन्स च्या गोळ्या देतात . जंतुसंसर्ग असल्यास तशी औषध देतात
-कॅन्सर असल्यास शस्त्र क्रिया, केमोथेरपी,रेडियेशन आवश्यकता असेल त्याप्रमाणे केले जाते.

आयुर्वेदिक उपचार:-
1) जंतुसंसर्ग असल्यास आयुर्वेदिक औषधी पोटातून घेणे तसेच बाहरुन लावणे
2) योनीधावन,धुपन
3) अवगाह,निरुह व उत्तरबस्ति
4) औषधी पिचू (Tampon )
5) कॅन्सर असल्यास आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया

“वारंवार मुत्रप्रवृत्ति”

“वारंवार मुत्रप्रवृत्ति”

-साधारणत: सर्वांना 2लिटर पाणी पिल्यावर सरासरी 24 तासात 6-7वेळा मुत्रप्रवृत्तिसाठी जावे लागते.
-खरेतर व्यक्तिपरत्वे पाणी पिण्याचे प्रमाण कमी जास्त असते, त्यामुळे मुत्रप्रवृत्ति कमी-अधिक प्रमाणात होते.
-परंतु एखाद्या  व्यक्तित मुत्रप्रवृत्ती वाढुन  दैनंदिन कामात अडथळा निर्माण होतो असेल ,रात्री झोपेतुन उठून जावे लागत असेल ,तर ते शरिरातील बिघाड झाल्याचे दर्शवते.
**लहान मुलांच्या मुत्राशयाचा आकार छोटा असल्याने ,तसेच मुत्राशयाच्या मांसपेशी कमजोर असल्याने वारंवार मुत्रप्रवृत्ति होते,ती त्यांच्या साठी  स्वाभाविक आहे,तो आजार नव्हे.

****वारंवार मुत्रप्रवृत्ति ची कारणे*****
1) प्रमाणापेक्षा अधिक पाणी पिणे, म्हणजेच तहान लागली नसतांनाही पाणी पिणे
2) चहा,कॉफी,कॅफिनयुक्त द्रवपदार्थांचे अधिक सेवन करणे 
3) अल्कोहलयुक्त पेय
4) मधुमेह,किडनिचे आजार,मुत्राशयाचे आजार
5) मुत्रवह संस्थानात जंतूसंसर्ग होणे
6) गर्भिणी अवस्था
7) चिंता,भीती
8) योनीमार्गात जंतुसंसर्ग
9) मुत्राशयाच्या पेशीं ची संवेदनशीलता वाढणे
10) मुत्रमार्ग अरुंद होते
11) मुत्राशयाजवळ किंवा मुत्राशयात अर्बुद/गाठी निर्माण होणे
12) मुत्राशयाचा कॅन्सर
13) मेंदूचे आजार 
14) मुत्र बाहेर काढून टाकणाऱ्या औषधी घेणे
15) पचनसंस्थान चे आजार
इत्यादी  कारणांमुळे वारंवार मुत्रप्रवृत्ती होते

***उपाय/उपचार***
1)वारंवार मुत्रप्रवृत्ति असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करावी
2) लॅबमध्ये urine test, blood sonography तपासणी ने वारंवार मुत्रप्रवृत्ति चे कारण शोधले जाते.जे कारण असेल त्याप्रमाणे औषध दिल्या जाते.

***वारंवार मुत्रप्रवृत्ति होऊ नये म्हणून उपाय****
1) संतुलित आहार घ्यावा
2) तहान लागली तरच पाणी प्यावे
3) दिनचर्या चांगली ठेवावी
4) व्यसनाधीनता नसावी
5) अति प्रमाणात गोड खाऊ नये
6) रोजच्या रोज पोट साफ होईल याकडे लक्ष द्यावे
7) नियमित सूर्यनमस्कार करावा
8) वारंवार मुत्रप्रवृत्ति बरोबर मुत्रप्रवृत्तिच्यावेळी जळजळ होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

वाताचे आजार (Diseases due to imbalance in Vata)

वाताचे आजार
1-आपल्या शरिरातील सर्व क्रिया वात,पित्त व कफ यांच्यामुळे घडतात
2-वात हा क्रियाशील आहे.पित्त व कफाच्या क्रिया वातावर अवलंबून आहेत.
3-शरिररुपी मशिन वात चालवतो.मनाचे,ज्ञानेंद्रिय,कर्मेन्द्रियांचे कार्य वातामुळेच घडून येतात. 
4-परंतु वात बिघडला कि शरिराचे सर्व तंत्रच बिघडते व निरनिराळे आजार निर्माण होतात.

*******वात बिघडण्याची कारणे:-
1) थंड,रुक्ष,सूकलेले पदार्थ खाणे
2) कडु, तिखट,तुरट पदार्थ अधिक खाणे.ठेचा,खर्डा खाणे

3) कमीखाणे, वारंवार उपवास करणे
4) नेहमीच रात्री जागरण करणे
5) चिंता,शोक, भीती वाटणे
6) खुप धावपळ, अतिप्रमाणात व्यायाम करणे
7)  पंचकर्माचा अतिरेक करणे 
8) खूप प्रमाणात वाहन चालवणे, ,वाहनांवरुन पडणे , रक्तस्त्राव होणे
9) नैसर्गिकरीत्या निर्माण होणाऱ्या वेगांना अडवणे/धरुन ठेवणे. जसे शिंका,मुत्र 

10) न पचू शकणारे पदार्थ रक्तात मिसळले जाणे
11) मर्माघात होणे
12) ढगाळ व पावसाळ्यातील वातावरण

*विकृतपणे वाढलेला वात ज्याठिकाणी रिकामी जागा आहे तेथे जाऊन निरनिराळी लक्षणे/विकार/व्याधी निर्माण करतो.
लक्षणे
1)हातपाय,इतर सांधे दुखणे,आखडणे.सांध्यांचा घासण्याचा आवाज येणे.
2) रोमांच उभे राहणे
3) डोकं भणभणने,जड पडणे
4)बडबड वाढणे
5)लंगडत चालणे,हातापायाला मुंग्या येणे,सुज येणे 
6) पायाला गोळे येणे, हातापायांची आग होणे,
7)पाय,कंबर,पाठ,मान आखडपणे,दुखणे
8) पायांच्या शिरा ओढल्याप्रमाणे दुखणे.गृध्रसी/sciatica
9)अंगात ताकद नसल्यासारखे वाटणे
10) पक्षाघात(paralysis)
11) पाळीच्या तक्रारी, वारंवार गर्भपात,गर्भाची वाढ खुंटणे,गर्भ न राहणे, योग्य वयाच्या  आधीच मेनोपॉझ येणे
12)हिस्टेरीया/योषापस्मार
13) पोटात वात धरल्यासारखे वाटते
अशी अनेक लक्षणे निर्माण होतात.
 संपूर्ण शरीरात अव्यहातपणे वाहणाऱ्या वायुचा  मार्ग कधीकधी शरिरातील घनरुप व द्रवरुप घटकांमुळे अडतो.जसे कफ, पित्त, रक्त,मांस,मेद,अस्थि,मज्जा,शुक्र,मल,मुत्र,उदक,लसिका इत्यादी.अशावेळी वातासोबत जो शरीरघटक असेल व ज्याठिकाणी असेल ती लक्षणे निर्माण होतात.

****उपचार/उपाय****
1)उष्ण,स्निग्ध ,गोड,आंबट,सैंधव मीठ युक्त पदार्थ खावे
2)मांस सूप, उडीदडाळीचे वडे,कढण तूप घालून प्यावे
3)अश्वगंधा घृत घ्यावे
4) बलातेल,महानारायण तेल,प्रसारणीतेल, इत्यादी ने  मालिश करावी,शेक घ्यावा
5) दशमुळ ,बला मुळ दुधात शिजवून प्यावे
6)तेलाचे बस्ति घ्यावे(enema with oil)
7)पोटात वात असल्यास नाभीला एरंडेल लावावे.हिंग्वाष्टक चुर्ण जेवताना घ्यावे
8)पोट रोज साफ राहिल असे बघावे
9) पावसाळ्यात उकळून कोमट पाणी प्यावे
10) पावसापासून व थंडी पासून शरिराचे रक्षण करावे.

पित्ताचे आजार (Imbalance of Pitta and it's diseases)

पित्ताचे आजार:-

प्राकृत(normal) पित्ताचे कार्य पचनक्रिया करणे आहे.शरिरातील उष्णता पित्तामुळे च असते.अन्नाचे पचन, त्वचेचा प्रभा, शौर्य बुद्धी,उर्जा , प्रसन्नता, दृष्टी,क्रोध,मोह,हर्ष,सुख,दु:ख, इच्छा,द्वेष हे सर्व पित्तावर अवलंबून असतात.
पित्त बिघडले कि वरिल कार्य बिघडतात.जसे पचनाच्या तक्रारी,स्वभावात बदल, दृष्टी दोष, नैराश्य,उत्साह न वाटणे, चेहऱ्यावर वांग येणे,विचारांची गुंतागुंत वाढते, निर्णय न घेता येणे, बुद्धीचा तल्लखपणा कमी होणे इत्यादी.

पित्त बिघडण्याची कारणे:-
1)तिखट, आंबट, खारट, उष्ण, जळजळ निर्माण करणारे व तीक्ष्ण पदार्थ खाणे
2)मद्य का सेवन
3) क्रोध, ताप, अग्नि, भय, श्रम करणे 
4)विषम भोजन करणे म्हणजे जेवणाचे नियम आयुर्वेदात सांगितले आहेत ते न पाळणे
 4)उन्हात/उष्णते जवळ बराच वेळ काम करणे
पित्ताच्या आजाराची लक्षणे:-
1गरम वाटणे,आग होणे,उकळल्यासारखे,अंगातून वाफा निघणे ,शरिरात आतून दाह होणे, खूप घाम येणे,वास येणे
2)आंबट ढेकर येणे,छातीत जळजळ होणे, खुप तहान लागणे
3)रक्त मांस चिकट होणे
4)त्वचेला खाज येणे,भेगा पडणे,
5)नाक,गुद,गर्भमार्ग ,मुख इत्यादी बाह्य मार्गाद्वारे रक्त पडणे
6)शरिरावर गांधी उठणे,त्वचेचा वर्ण बदलणे
7) शरिरावर व आतील मार्गात फोड,पुरळ येणे
8) डोळ्यापुढे अंधारी येणे इत्यादी

उपचार/उपाय
1)गोड,कडु,तुरटी,थंड अश्या औषधींचा वापर केला जातो.जसे अडुळसा,निंब, गुळवेल, शतावरी, नागरमोथा,चंदन,भोपळा, जेष्ठमध
2) थंड गुणांच्या तेलाने चोळणे ,जसे चंदनादीतेल, चंदन बलालाक्षादीतेल
3)कामदुधा,सूतशेखर,चंदनासव,भूनिम्बादी काढा,महासुदर्शन काढा 
3) विरेचन ह्या पंचकर्माने मुळातून विकृत पित्त बाहेर काढून टाकले जाते त्यामुळे लवकर फायदा होतो व आजार मुळातून जातो

वजन वाढु नये म्हणून

वजन कमी करण्यासाठी -
1)भूक लागल्याशिवाय काही खाऊ नये
2) तहान लागल्याशिवाय पाणी पिऊ नये
3) आहारात साखर,मैदा,चीज,बटर ,तळलेले पदार्थ खाऊ नये
4)दिवसा झोपू नये
5)रोज नियमीतपणे सोसेल एवढा व्यायाम/सुर्यनमस्कार  करावा
6)रोज नियमीतपणे मलमुत्रप्रवृत्ति होईल याकडे लक्ष द्यावे
7) मनःस्वास्थ्यासाठी योग,प्राणायाम करावा

औषध:-
1)हिरडा चुर्ण मधातून  
2) त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यात 
3) औषधी युक्त सूप
4)आमपाचक वटी
5)मेदोहर गुग्गुळ,कांचनार गुग्गुळ,
 6)उद्वर्तन- औषधी चुर्ण संपुर्ण शरिरावर चोळणे 
7) पंचकर्म,वमन,लेखन बस्ति 
******डॉ. च्या सल्ल्या ने घ्यावे******

Thursday, 12 July 2018

दाडिमाद्य घृत - आयुर्वेदिक औषधी तूप

दाडिमाद्य घृत -  आयुर्वेदिक औषधी तूप

1) पंचकर्म करण्यापूर्वी 3-5-7 दिवस हे तूप पिण्यासाठी देऊन त्यानंतर वमन/विरेचन केले जाते.
2) हृदयाचे आजार,मुळव्याध ह्यात उपयोगी आहे.
3) रक्तवाढवणाऱ्या औषधां सोबत घेतल्यास त्या औषधांचे वाईट परिणाम जसे अॅसिडिटी, मलबद्धता अशा तक्रारी ह्या तूपाने कमी होतात.
4) प्लिहा (spleen)वाढली असल्यास ,त्याचबरोबर रक्त कमी झाले असेल तर अधिकच उपयोगी आहे.
5) खोकला,दमा ह्या आजारात उपयोग होतो.
6) गर्भ राहत नसेल तर राहण्यासाठी वापरतात.
7) गर्भिणी अवस्थेत रोज 10मिली घेतल्यास सुखाने प्रसूति होते व प्रसूतिनंतर चे आजार निर्माण होत नाही.
8) गर्भिणी मध्ये मुळव्याध, मुतखडा चा त्रास होत असल्यास अवश्य खावे.

******आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे******

सौभाग्य शुण्ठीपाक

सौभाग्य शुण्ठीपाक

1)-प्रसूति झाल्यावर स्त्रियांनी घ्यायचे अतिशय महत्त्वाचे औषध आहे.
2)प्रसूति झाल्यावर स्त्रियांच्या शरिरातील झीज भरुन येण्यासाठी, दुध सुधारण्यासाठी खूप उपयोगी आहे.
3)प्रसूतिनंतर काही दिवसांनी   थकवा जाणवत असल्यास ,केश गळत असल्यास अवश्य घ्यावे.
4)  विवाहित स्त्रियांमध्ये   श्वेतप्रदर-,रक्तप्रदर, पाळीच्या वेळी पोटात दुखणे अश्या तक्रारींसाठी खुप चांगले आहे.
5) हे औषध गर्भाशयाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
6 )ह्या औषधाने बीजोत्पादन व बीजोत्सर्ग (development of follicles and ovulation) ही क्रिया सुधारते, त्यामुळे  अपत्यप्राप्ती साठी वापर केला जातो.
7)हे औषध रस,रक्त शुद्ध करते.शरिरातील कृमी ,अतिरीक्त कफ,मल बाहेर काढुन टाकते.त्यामुळे उत्तम शरिरातील घटक उत्तमरीत्या  तयार होतात. हया सर्वांच्या परिणामाने शरिराचा, चेहऱ्याच्या वर्ण सुधारतो.
8) हे औषध वांग,अकाली सुरकुत्या पडणे,केश पांढरे होणे ह्या तक्रारींसाठी उपयुक्त आहे.

******आयुर्वेदिक औषधी घेतांना प्रकृति, दोष, बल, पचनशक्ती इत्यादींचा विचार महत्त्वाचा आहे.
त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर च्या सल्ल्यानेच औषधी घ्यावीत*********

शंख वटी

“शंख वटी”

1)हे पाचन कार्य सुधारण्यासाठी अतिशय उत्तम आयुर्वेदिक औषध आहे.
2)पोटात गॅसेस झाले असतिल, पोट दुखत
 असेल,त्यावेळी अतिशय उपयुक्त आहे.
3)अधिक प्रमाणात भोजन केल्याने पोट जड झाले असेल,   चालणेसुद्धा अवघड झाले असेल, श्र्वास घ्यायला सुद्धा त्रास होत असेल, पोट    दुखत असल्यास अवश्य घ्यावे.
4)ह्या औषधाने पचनवह संस्थान(digestive system)
मधिल अवयवांना उत्तेजना मिळते व आहार लवकर पुढे ढकलल्या जातो.
5) अजीर्ण झाल्याने पोट दुखायला लागले तर हे औषध खुप चांगले काम करते.
6)दुषित पाण्यामुळे,अन्न पदार्थ खाऊन द्रवमलप्रवृत्ति होऊन, पोट दुखायला लागते.पावसाळ्यात ह्या तक्रारी अधिकच आढळतात. अश्यावेळी हे औषध अगदी रामबाण आहे.
 7)  छातीत जळजळ होत असल्यास उपयोगी आहे
8)भूक लागत नसल्यास,पाचन शक्ती कमी झाल्यास उपयोगी आहे.
9)मलावष्टंभ झाल्याने (constipation) पोट दुखायला लागले तर ह्या औषधाने फायदा होतो.
10)हे औषध लिव्हर,स्प्लीन, ग्रहणी,छोटेआतडे,मोठे आतडे ह्यावर विशेषतः काम करते
11)मासिकपाळी च्यावेळी पोटाच्या तक्रारी असतील तर घ्यावे. ह्या औषधाने वात खाली सरतो व पोटाला हलकेपणा येतो.
12)हे औषध पोटाच्या  तक्रारींसाठी सर्वांच्या घरी असावे असे आहे.

प्रसूतिनंतर स्त्रियांसाठी - शेक, शेगडी, मालिश, आहार -

प्रसूतिनंतर स्त्रियांसाठी - शेक, शेगडी, मालिश, आहार -

1)आपल्याकडे प्रसूति झाल्यावर स्त्रियांना शेक शेगडी देण्याची पद्धत फार जुनी आहे.आयुर्वेदात
ह्याला खूप महत्त्व आहे. 
2)हल्ली दवाखान्यात प्रसूति होत असल्यामुळे घरी आल्यावर म्हणजे 3-5दिवसांनी पोटपट्टा बांधणे,शेक, शेगडी, मालिश केल्या जाते.  
3)सगळीकडे असे केल्या जाते असे नाही कारण सोय नसल्याने शक्य होत नाही किंवा त्याविषयी गैरसमज आहेत.
फायदे-
1)पोटपट्टा बांधल्यास पोटाच्या स्नायु, पेशी, अवयवांना आधार मिळतो.त्यामुळे पोटाचे स्नायु बळकट होतात.गर्भधारणेपुर्वी जसा शरिराचा आकार असेल तसा पुर्ववत येण्यास मदत होते.
2)-मालिश केल्याने प्रसवामुळे वाढलेला वात कमी होतो,ताण,वेदना कमी होतात. स्नायु बळकट होतात,भुक तहान निद्रा , मुत्रमलप्रवृत्ति योग्य होते.वाढलेले गर्भाशय  आपल्याजागी लवकर जाण्यास मदत होते.
4) प्रसूति नंतर आहार हा पंचकोल (आयुर्वेद औषधी)युक्त, पचायला हलके,गरम,ताजे,व पचेल असे, तूपयुक्त असावे.आयुर्वेदानुसार मांसाहारी व्यक्ति ने  प्रसूतिच्या दहा दिवसांच्या नंतर , म्हणजे पचनशक्ती नुसार मांस रस,सूप  घ्यावे.
5)ह्या सर्वांचा परिणामाने उत्तम दुधाची निर्मिती
होते.
6)शेक देणे, धुरी देणे -ह्यात हळद,राळ,अगरु गुग्गुळ,कोष्ठ,वचा, जटामांसी , तूप इत्यादी औषधांचा वापर केला जातो
ह्यामुळे प्रसूतिच्यावेळी टाके पडले असतिल किंवा जखम झाली असले तर त्यामुळे होणाऱ्या वेदना कमी होतात,तसेच जंतूसंसर्ग होण्यापासून आळा बसतो.
7)सिझेरियन पद्धतीने प्रसूति झाल्यावर शेक शेगडी देण्याची गरज नाही;परंतु पोटाला आधार मिळेल अश्या पद्धतीने पोटपट्टा बांधता येतो.
टाक्यांना ताण पडणार नाही ,फार गच्च नाही असे व डॉक्टरांच्या सल्ल्याने बांधावे. पोट सोडून इतर संपूर्ण शरिराला तेलाने(बलातेल) मालीश करावी .

कोरफड (Aloe vera)

कोरफड (Aloe vera)

1)कोरफड चवीला  कडु व गुणाने थंड आहे.प्रमाणात घेतल्यास पोटातील वात,पित्त,कफ अधोमार्गाने काढुन टाकते.
अधिक प्रमाणात घेतल्यास द्रवमलप्रवृत्ति होते.
2)यकृतातील (liver) पित्त आमाशयात (stomach) आणते.  पक्वाशयातील साठलेला कफ मलप्रवृत्तीसोबत बाहेर काढुन टाकते.
3)तापासाठी कोरफडीच्या रसात 10ml , पिंपळी 1gm मिसळून दिवसातून 2वेळा घ्यावे .
4) यकृता च्या व्याधींमध्ये कुमारी आसव चांगले उपयोगी पडते
5)प्रसवानंतर गर्भाशयात रक्त साठल्याने पोट दुखू लागते त्यासाठी कोरफडीच्या रसात पिंपळीचुर्ण, तूप घालून प्यावे.गर्भाशयातील रक्त बाहेर पडून पोटाचे दुखणे थांबते.
6) नियमाने पाळी येत नसल्यास, उशिराउशीराने पाळी येत असल्यास कुमारी आसव घेतल्याने पाळी सुधारते.
7)कोरफड रक्त दोष,त्वचा विकारात (skin disease) उपयोगी आहे .
8)गुणाने थंड असल्याने त्वचेवर भाजले,फोड उठले,आग होत असल्यास कोरफडीचा रस लावावा
9) व्रण,विद्रधि (ulcer/absess)असल्यास रस हळद मिसळून लावावे
10)मार लागून सूज आल्यास हळद,रक्तचंदन,तुरटी,रोहितक, कोरफडीच्यारसात मिसळून लेप करावा
11) डोळ्यांची आग,लाल होत असल्यास कोरफडीचा लेप लावावा
12) शरिरातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास, यकृत,प्लिहा वृद्धी  झाल्यास लोहकल्पांसह कोरफडीचा रस घ्यावा.

******वरिल  उपचार आयुर्वेद तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करावे.

सियाटिका वेदना/गृध्रसी (SCIATICA PAIN)

सियाटिका वेदना/गृध्रसी (SCIATICA PAIN)

सियाटिका  Sciatica     ही शरिरातील सर्वात लांब अशी मज्जातंतू (nerve) आहे. कुठल्याही कारणाने त्याला इजा झाली किंवा दाब पडला तर कमरेपासून घोट्यापर्यंत वेदना होतात.वेदनेचे स्वरुप कधी कमी तर कधी फार तीव्र असते.

***ह्यालाच सियाटीका आजार म्हटले जाते.खरेतर हे एक लक्षण आहे. 
 
सियाटिका मज्जातंतू चे शरिरातील स्थान:-
पाठीचा कणा हा गोलाकार हाडे एकावर एक रचून ठेवल्याप्रमाणे आहे.ती हाडे एकमेकांना घासू नयेत म्हणून त्यांच्या संधी च्या ठिकाणी कुशन प्रमाणे रचना आहे.पाठीचा कणा आतुन पोकळ आहे व ह्या पोकळीतून  मज्जारज्जू (spinal cord)गेलेला आहे.  दोन्ही बाजूने उजवीकडे व डावीकडे मज्जारज्जु पासून मज्जातंतू(nerves) बाहेर येऊन ते शरिरात पसरतात.
सियाटीका मज्जातंतू ही कमरेच्या मागून, दोन्ही पायाच्या मागच्या बाजूने पाउलापर्यंत जाते 

सियाटिका वेदनेची कारणे:-
1)मज्जारज्जुचा खालचा शेवटचा भाग अरुंद झाल्यास
2) कुर्चा सरकल्यास
3)सियाटिका मज्जातंतू ज्या ठिकाणी असतो त्या जागी गाठ आल्यास,
4)आघात,अपघात, 
5)जंतूसंसर्ग, इत्यादी कारणांमुळे हा त्रास निर्माण होतो.
6)कधी कधी मात्र कारण सुद्धा सापडत नाही
7)खुप काळ जड सामान उचलणे,एकाच जागी खूप वेळपर्यंत बसणे, 
8)गर्भिणी  , प्रसूति झाल्यावर स्त्रियांमध्ये आढळून येते.
गर्भिणी अवस्थेत relaxin नावाचे hormone मुळे पेशी बंध सैल झाल्याने ,तसेच पोटाच्या वाढत्या आकाराने सियाटिका मज्जातंतू वर दाब येण्याची शक्यता वाढते.
नॉर्मल डिलिव्हरी च्यावेळी सुद्धा सियाटिका मज्जातंतू ला इजा होऊन दुखणे चालु होते.

उपचार:
1)-बऱ्याच वेळा दुखण्याच्या गोळ्या घेतल्या,शेकले,पायाचे विशिष्ट पद्धतीने व्यायाम केले की हा आजार ६-८आठवड्यात बरा होतो.
2)त्यानंतर सुद्धा कमी असेल,वेदना  तीव्र असेल तर x-ray, MRI करुन प्रत्यक्ष तपासणी केली जाते.आधुनीक शास्त्रात आवश्यकता वाटल्यास शस्त्रक्रिया करतात.
3) आयुर्वेद शास्त्रात ह्या आजाराला गृध्रसी म्हणतात. त्याचे दोन प्रकार आहे
अ)वाताने होणारा ब) वात कफाने होणारा
आयुर्वेदिक उपचारांनी हा आजार बरा होतो .
ह्यासाठी दीपन,पाचन,स्त्रोतोसशुद्धी,मलशोधन, वाताचे अनुलोमन, धातुपोषण केले जाते.
त्यासाठी वातकफ संतुलन करणारा आहार, शरीरक्रिया, मुखाद्वारेऔषधी, पिंडस्वेद,औषधी लेप कटीबस्ति,कटीतेलधारा,कांजीधारा,मात्राबस्ति,निरुह अनुवासन बस्ति , हे उपचार केले जातात.

****हा आजार होऊ नये म्हणून उपाय:-
नियमित व्यायाम, सूर्यनमस्कार.योग्य स्थितीत उठणे,बसणे,सामान उचलणे.झोपण्याची, बसण्याची जागा फार कठीण किंवा फार नरम नसावी.एकाच जागी खूप वेळपर्यंत बसू नये.पायात शुज किंवा चप्पल पावलांना सुखकर असावेत.शक्यतो उंच टाचांचे वापरु नये.


Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...