Saturday, 28 July 2018

पित्ताचे आजार (Imbalance of Pitta and it's diseases)

पित्ताचे आजार:-

प्राकृत(normal) पित्ताचे कार्य पचनक्रिया करणे आहे.शरिरातील उष्णता पित्तामुळे च असते.अन्नाचे पचन, त्वचेचा प्रभा, शौर्य बुद्धी,उर्जा , प्रसन्नता, दृष्टी,क्रोध,मोह,हर्ष,सुख,दु:ख, इच्छा,द्वेष हे सर्व पित्तावर अवलंबून असतात.
पित्त बिघडले कि वरिल कार्य बिघडतात.जसे पचनाच्या तक्रारी,स्वभावात बदल, दृष्टी दोष, नैराश्य,उत्साह न वाटणे, चेहऱ्यावर वांग येणे,विचारांची गुंतागुंत वाढते, निर्णय न घेता येणे, बुद्धीचा तल्लखपणा कमी होणे इत्यादी.

पित्त बिघडण्याची कारणे:-
1)तिखट, आंबट, खारट, उष्ण, जळजळ निर्माण करणारे व तीक्ष्ण पदार्थ खाणे
2)मद्य का सेवन
3) क्रोध, ताप, अग्नि, भय, श्रम करणे 
4)विषम भोजन करणे म्हणजे जेवणाचे नियम आयुर्वेदात सांगितले आहेत ते न पाळणे
 4)उन्हात/उष्णते जवळ बराच वेळ काम करणे
पित्ताच्या आजाराची लक्षणे:-
1गरम वाटणे,आग होणे,उकळल्यासारखे,अंगातून वाफा निघणे ,शरिरात आतून दाह होणे, खूप घाम येणे,वास येणे
2)आंबट ढेकर येणे,छातीत जळजळ होणे, खुप तहान लागणे
3)रक्त मांस चिकट होणे
4)त्वचेला खाज येणे,भेगा पडणे,
5)नाक,गुद,गर्भमार्ग ,मुख इत्यादी बाह्य मार्गाद्वारे रक्त पडणे
6)शरिरावर गांधी उठणे,त्वचेचा वर्ण बदलणे
7) शरिरावर व आतील मार्गात फोड,पुरळ येणे
8) डोळ्यापुढे अंधारी येणे इत्यादी

उपचार/उपाय
1)गोड,कडु,तुरटी,थंड अश्या औषधींचा वापर केला जातो.जसे अडुळसा,निंब, गुळवेल, शतावरी, नागरमोथा,चंदन,भोपळा, जेष्ठमध
2) थंड गुणांच्या तेलाने चोळणे ,जसे चंदनादीतेल, चंदन बलालाक्षादीतेल
3)कामदुधा,सूतशेखर,चंदनासव,भूनिम्बादी काढा,महासुदर्शन काढा 
3) विरेचन ह्या पंचकर्माने मुळातून विकृत पित्त बाहेर काढून टाकले जाते त्यामुळे लवकर फायदा होतो व आजार मुळातून जातो

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...