“शंख वटी”
1)हे पाचन कार्य सुधारण्यासाठी अतिशय उत्तम आयुर्वेदिक औषध आहे.
2)पोटात गॅसेस झाले असतिल, पोट दुखत
असेल,त्यावेळी अतिशय उपयुक्त आहे.
3)अधिक प्रमाणात भोजन केल्याने पोट जड झाले असेल, चालणेसुद्धा अवघड झाले असेल, श्र्वास घ्यायला सुद्धा त्रास होत असेल, पोट दुखत असल्यास अवश्य घ्यावे.
4)ह्या औषधाने पचनवह संस्थान(digestive system)
मधिल अवयवांना उत्तेजना मिळते व आहार लवकर पुढे ढकलल्या जातो.
5) अजीर्ण झाल्याने पोट दुखायला लागले तर हे औषध खुप चांगले काम करते.
6)दुषित पाण्यामुळे,अन्न पदार्थ खाऊन द्रवमलप्रवृत्ति होऊन, पोट दुखायला लागते.पावसाळ्यात ह्या तक्रारी अधिकच आढळतात. अश्यावेळी हे औषध अगदी रामबाण आहे.
7) छातीत जळजळ होत असल्यास उपयोगी आहे
8)भूक लागत नसल्यास,पाचन शक्ती कमी झाल्यास उपयोगी आहे.
9)मलावष्टंभ झाल्याने (constipation) पोट दुखायला लागले तर ह्या औषधाने फायदा होतो.
10)हे औषध लिव्हर,स्प्लीन, ग्रहणी,छोटेआतडे,मोठे आतडे ह्यावर विशेषतः काम करते
11)मासिकपाळी च्यावेळी पोटाच्या तक्रारी असतील तर घ्यावे. ह्या औषधाने वात खाली सरतो व पोटाला हलकेपणा येतो.
12)हे औषध पोटाच्या तक्रारींसाठी सर्वांच्या घरी असावे असे आहे.
No comments:
Post a Comment