प्रसूतिनंतर स्त्रियांसाठी - शेक, शेगडी, मालिश, आहार -
1)आपल्याकडे प्रसूति झाल्यावर स्त्रियांना शेक शेगडी देण्याची पद्धत फार जुनी आहे.आयुर्वेदात
ह्याला खूप महत्त्व आहे.
2)हल्ली दवाखान्यात प्रसूति होत असल्यामुळे घरी आल्यावर म्हणजे 3-5दिवसांनी पोटपट्टा बांधणे,शेक, शेगडी, मालिश केल्या जाते.
3)सगळीकडे असे केल्या जाते असे नाही कारण सोय नसल्याने शक्य होत नाही किंवा त्याविषयी गैरसमज आहेत.
फायदे-
1)पोटपट्टा बांधल्यास पोटाच्या स्नायु, पेशी, अवयवांना आधार मिळतो.त्यामुळे पोटाचे स्नायु बळकट होतात.गर्भधारणेपुर्वी जसा शरिराचा आकार असेल तसा पुर्ववत येण्यास मदत होते.
2)-मालिश केल्याने प्रसवामुळे वाढलेला वात कमी होतो,ताण,वेदना कमी होतात. स्नायु बळकट होतात,भुक तहान निद्रा , मुत्रमलप्रवृत्ति योग्य होते.वाढलेले गर्भाशय आपल्याजागी लवकर जाण्यास मदत होते.
4) प्रसूति नंतर आहार हा पंचकोल (आयुर्वेद औषधी)युक्त, पचायला हलके,गरम,ताजे,व पचेल असे, तूपयुक्त असावे.आयुर्वेदानुसार मांसाहारी व्यक्ति ने प्रसूतिच्या दहा दिवसांच्या नंतर , म्हणजे पचनशक्ती नुसार मांस रस,सूप घ्यावे.
5)ह्या सर्वांचा परिणामाने उत्तम दुधाची निर्मिती
होते.
6)शेक देणे, धुरी देणे -ह्यात हळद,राळ,अगरु गुग्गुळ,कोष्ठ,वचा, जटामांसी , तूप इत्यादी औषधांचा वापर केला जातो
ह्यामुळे प्रसूतिच्यावेळी टाके पडले असतिल किंवा जखम झाली असले तर त्यामुळे होणाऱ्या वेदना कमी होतात,तसेच जंतूसंसर्ग होण्यापासून आळा बसतो.
7)सिझेरियन पद्धतीने प्रसूति झाल्यावर शेक शेगडी देण्याची गरज नाही;परंतु पोटाला आधार मिळेल अश्या पद्धतीने पोटपट्टा बांधता येतो.
टाक्यांना ताण पडणार नाही ,फार गच्च नाही असे व डॉक्टरांच्या सल्ल्याने बांधावे. पोट सोडून इतर संपूर्ण शरिराला तेलाने(बलातेल) मालीश करावी .
No comments:
Post a Comment