Saturday, 28 July 2018

“वारंवार मुत्रप्रवृत्ति”

“वारंवार मुत्रप्रवृत्ति”

-साधारणत: सर्वांना 2लिटर पाणी पिल्यावर सरासरी 24 तासात 6-7वेळा मुत्रप्रवृत्तिसाठी जावे लागते.
-खरेतर व्यक्तिपरत्वे पाणी पिण्याचे प्रमाण कमी जास्त असते, त्यामुळे मुत्रप्रवृत्ति कमी-अधिक प्रमाणात होते.
-परंतु एखाद्या  व्यक्तित मुत्रप्रवृत्ती वाढुन  दैनंदिन कामात अडथळा निर्माण होतो असेल ,रात्री झोपेतुन उठून जावे लागत असेल ,तर ते शरिरातील बिघाड झाल्याचे दर्शवते.
**लहान मुलांच्या मुत्राशयाचा आकार छोटा असल्याने ,तसेच मुत्राशयाच्या मांसपेशी कमजोर असल्याने वारंवार मुत्रप्रवृत्ति होते,ती त्यांच्या साठी  स्वाभाविक आहे,तो आजार नव्हे.

****वारंवार मुत्रप्रवृत्ति ची कारणे*****
1) प्रमाणापेक्षा अधिक पाणी पिणे, म्हणजेच तहान लागली नसतांनाही पाणी पिणे
2) चहा,कॉफी,कॅफिनयुक्त द्रवपदार्थांचे अधिक सेवन करणे 
3) अल्कोहलयुक्त पेय
4) मधुमेह,किडनिचे आजार,मुत्राशयाचे आजार
5) मुत्रवह संस्थानात जंतूसंसर्ग होणे
6) गर्भिणी अवस्था
7) चिंता,भीती
8) योनीमार्गात जंतुसंसर्ग
9) मुत्राशयाच्या पेशीं ची संवेदनशीलता वाढणे
10) मुत्रमार्ग अरुंद होते
11) मुत्राशयाजवळ किंवा मुत्राशयात अर्बुद/गाठी निर्माण होणे
12) मुत्राशयाचा कॅन्सर
13) मेंदूचे आजार 
14) मुत्र बाहेर काढून टाकणाऱ्या औषधी घेणे
15) पचनसंस्थान चे आजार
इत्यादी  कारणांमुळे वारंवार मुत्रप्रवृत्ती होते

***उपाय/उपचार***
1)वारंवार मुत्रप्रवृत्ति असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करावी
2) लॅबमध्ये urine test, blood sonography तपासणी ने वारंवार मुत्रप्रवृत्ति चे कारण शोधले जाते.जे कारण असेल त्याप्रमाणे औषध दिल्या जाते.

***वारंवार मुत्रप्रवृत्ति होऊ नये म्हणून उपाय****
1) संतुलित आहार घ्यावा
2) तहान लागली तरच पाणी प्यावे
3) दिनचर्या चांगली ठेवावी
4) व्यसनाधीनता नसावी
5) अति प्रमाणात गोड खाऊ नये
6) रोजच्या रोज पोट साफ होईल याकडे लक्ष द्यावे
7) नियमित सूर्यनमस्कार करावा
8) वारंवार मुत्रप्रवृत्ति बरोबर मुत्रप्रवृत्तिच्यावेळी जळजळ होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...