सियाटिका वेदना/गृध्रसी (SCIATICA PAIN)
सियाटिका Sciatica ही शरिरातील सर्वात लांब अशी मज्जातंतू (nerve) आहे. कुठल्याही कारणाने त्याला इजा झाली किंवा दाब पडला तर कमरेपासून घोट्यापर्यंत वेदना होतात.वेदनेचे स्वरुप कधी कमी तर कधी फार तीव्र असते.
***ह्यालाच सियाटीका आजार म्हटले जाते.खरेतर हे एक लक्षण आहे.
सियाटिका मज्जातंतू चे शरिरातील स्थान:-
पाठीचा कणा हा गोलाकार हाडे एकावर एक रचून ठेवल्याप्रमाणे आहे.ती हाडे एकमेकांना घासू नयेत म्हणून त्यांच्या संधी च्या ठिकाणी कुशन प्रमाणे रचना आहे.पाठीचा कणा आतुन पोकळ आहे व ह्या पोकळीतून मज्जारज्जू (spinal cord)गेलेला आहे. दोन्ही बाजूने उजवीकडे व डावीकडे मज्जारज्जु पासून मज्जातंतू(nerves) बाहेर येऊन ते शरिरात पसरतात.
सियाटीका मज्जातंतू ही कमरेच्या मागून, दोन्ही पायाच्या मागच्या बाजूने पाउलापर्यंत जाते
सियाटिका वेदनेची कारणे:-
1)मज्जारज्जुचा खालचा शेवटचा भाग अरुंद झाल्यास
2) कुर्चा सरकल्यास
3)सियाटिका मज्जातंतू ज्या ठिकाणी असतो त्या जागी गाठ आल्यास,
4)आघात,अपघात,
5)जंतूसंसर्ग, इत्यादी कारणांमुळे हा त्रास निर्माण होतो.
6)कधी कधी मात्र कारण सुद्धा सापडत नाही
7)खुप काळ जड सामान उचलणे,एकाच जागी खूप वेळपर्यंत बसणे,
8)गर्भिणी , प्रसूति झाल्यावर स्त्रियांमध्ये आढळून येते.
गर्भिणी अवस्थेत relaxin नावाचे hormone मुळे पेशी बंध सैल झाल्याने ,तसेच पोटाच्या वाढत्या आकाराने सियाटिका मज्जातंतू वर दाब येण्याची शक्यता वाढते.
नॉर्मल डिलिव्हरी च्यावेळी सुद्धा सियाटिका मज्जातंतू ला इजा होऊन दुखणे चालु होते.
उपचार:
1)-बऱ्याच वेळा दुखण्याच्या गोळ्या घेतल्या,शेकले,पायाचे विशिष्ट पद्धतीने व्यायाम केले की हा आजार ६-८आठवड्यात बरा होतो.
2)त्यानंतर सुद्धा कमी असेल,वेदना तीव्र असेल तर x-ray, MRI करुन प्रत्यक्ष तपासणी केली जाते.आधुनीक शास्त्रात आवश्यकता वाटल्यास शस्त्रक्रिया करतात.
3) आयुर्वेद शास्त्रात ह्या आजाराला गृध्रसी म्हणतात. त्याचे दोन प्रकार आहे
अ)वाताने होणारा ब) वात कफाने होणारा
आयुर्वेदिक उपचारांनी हा आजार बरा होतो .
ह्यासाठी दीपन,पाचन,स्त्रोतोसशुद्धी,मलशोधन, वाताचे अनुलोमन, धातुपोषण केले जाते.
त्यासाठी वातकफ संतुलन करणारा आहार, शरीरक्रिया, मुखाद्वारेऔषधी, पिंडस्वेद,औषधी लेप कटीबस्ति,कटीतेलधारा,कांजीधारा,मात्राबस्ति,निरुह अनुवासन बस्ति , हे उपचार केले जातात.
****हा आजार होऊ नये म्हणून उपाय:-
नियमित व्यायाम, सूर्यनमस्कार.योग्य स्थितीत उठणे,बसणे,सामान उचलणे.झोपण्याची, बसण्याची जागा फार कठीण किंवा फार नरम नसावी.एकाच जागी खूप वेळपर्यंत बसू नये.पायात शुज किंवा चप्पल पावलांना सुखकर असावेत.शक्यतो उंच टाचांचे वापरु नये.
No comments:
Post a Comment