कोरफड (Aloe vera)
1)कोरफड चवीला कडु व गुणाने थंड आहे.प्रमाणात घेतल्यास पोटातील वात,पित्त,कफ अधोमार्गाने काढुन टाकते.
अधिक प्रमाणात घेतल्यास द्रवमलप्रवृत्ति होते.
2)यकृतातील (liver) पित्त आमाशयात (stomach) आणते. पक्वाशयातील साठलेला कफ मलप्रवृत्तीसोबत बाहेर काढुन टाकते.
3)तापासाठी कोरफडीच्या रसात 10ml , पिंपळी 1gm मिसळून दिवसातून 2वेळा घ्यावे .
4) यकृता च्या व्याधींमध्ये कुमारी आसव चांगले उपयोगी पडते
5)प्रसवानंतर गर्भाशयात रक्त साठल्याने पोट दुखू लागते त्यासाठी कोरफडीच्या रसात पिंपळीचुर्ण, तूप घालून प्यावे.गर्भाशयातील रक्त बाहेर पडून पोटाचे दुखणे थांबते.
6) नियमाने पाळी येत नसल्यास, उशिराउशीराने पाळी येत असल्यास कुमारी आसव घेतल्याने पाळी सुधारते.
7)कोरफड रक्त दोष,त्वचा विकारात (skin disease) उपयोगी आहे .
8)गुणाने थंड असल्याने त्वचेवर भाजले,फोड उठले,आग होत असल्यास कोरफडीचा रस लावावा
9) व्रण,विद्रधि (ulcer/absess)असल्यास रस हळद मिसळून लावावे
10)मार लागून सूज आल्यास हळद,रक्तचंदन,तुरटी,रोहितक, कोरफडीच्यारसात मिसळून लेप करावा
11) डोळ्यांची आग,लाल होत असल्यास कोरफडीचा लेप लावावा
12) शरिरातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास, यकृत,प्लिहा वृद्धी झाल्यास लोहकल्पांसह कोरफडीचा रस घ्यावा.
******वरिल उपचार आयुर्वेद तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करावे.
No comments:
Post a Comment