Tuesday, 27 August 2024

शरीरात वाताचे कार्य

वायु हा संपूर्ण शरीरात अखंडपणे फिरत असतो.

मोठे आतडे (पक्वाशय),कंबर, मांडया,कान,हाडे, त्वचा हे त्याचे ठिकाण आहेत 

त्यात सुद्धा त्याचे मुख्य ठिकाण मोठे आतडे (पक्वाशय) आहे.

*वायु ज्याठिकाणी जाईल त्यानुसार तेथे त्याचे नाव दिले जाते. प्राण,उदान,व्यान, समान,अपान असे 5प्रकार.

************

*प्राण वायु- हा वायु शिर/ डोके येथे असतो.

छाती व कंठ ह्या ठीकाणी फिरतो. बुद्धी,हृदय, इंद्रिय व मन ह्यांचे कार्य नियंत्रण करतो

*उदान वायु - हा छातीच्या ठिकाणी असतो. तो नाक,नाभी, गळा ह्याठीकाणी फिरतो.

बोलणे,उत्साह,ऊर्जा, ताकद, शरीराचा रंग,आणि स्मरण शक्ती ह्याचे नियंत्रण करतो

*व्यान वायु - मुख्यतः हृदयात असतो. तो संपूर्ण  शरीरात फिरतो. इतर वायूंच्या तुलनेने ह्याचा वेग अधिक असतो.

चालणे, हातापायांना वर खाली करणे, डोळे उघडणे बंद करणे साधारणपणे अवयवांच्या सर्व क्रिया हा वायुचे नियंत्रण करतो

*समान वायु-पचन करणाऱ्या अग्निजवळ,ग्रहणी मध्ये  असतो. संपूर्ण पचन संस्थेमध्ये (कोष्ठ) फिरतो.

अन्न ग्रहण करणे,पचवणे, सारभाग व मल मूत्र वेगळे करणे, व पचनसंस्थेतील पदार्थ खालच्या दिशेने ढकलणे हे कार्य नियंत्रित करतो

*अपान वायु - हा मुख्यतः गुदा (Anus) च्या ठिकाणी असतो .

हा श्रोणी  (pelvic including pelvic organs), बस्ती मेहन (bladder- urethra), मांडया, ह्या भागात फिरतो.

-शुक्र, आर्तव, मल,मूत्र, व गर्भ बाहेर काढण्याचे नियंत्रण तो करतो.

**************

संदर्भ - अष्टांग हृदय सुत्रस्थान 12/1,4-9

दूध, दूध, दूध रोज प्यावे दूध

 भेसळ नसलेले #दूध हे पृथ्वीतलावरील अमृत आहे.

विशेषतः आजारी व्यक्तीने, औषधी घेणारे,प्रवास करणारे ,भाषण देणारे, स्त्री सेवन करणारे, उन्हात काम करणारे,श्रमिक, कष्ट करुन थकलेले ,वृद्ध व बालक यांनी औषध ,अन्नपदार्थासोबत रोज दूध  प्यावे. 

दूध अनुपान म्हणून पिणे अमृतासमान आहे.

*************

***व्याध्यौषधाध्वभाष्यस्त्रीलंघनातपकमभि: l

क्षीणे वृद्धे च बाले च पय: पथ्यं यथा S मृतम् ll

संदर्भ:- अष्टांग हृदय सूत्रस्थान 8/50

****************

आयुर्वेद शास्त्रातील प्रत्येक सूत्र हे अनेक परीक्षणे करुन मांडलेली आहेत.

आयुर्वेदानुसार दूध हा प्राणिज पदार्थ आहे. त्यामुळे वनस्पती पासून तयार केलेले दूध येथे अपेक्षित नाही.

* त्या त्या प्रांतातील देशी गायीचे दूध अपेक्षित आहे. नसल्यास बकरीचे, म्हशीचे दूध उपयोगात आणावे.

*ज्यांना दूध प्याले असता त्रास होतो त्यांना क्रमाने थोडे दूध देऊन दूध पचण्यासाची तयारी करता येते.

*आहारात थोडा बदल केला तर

 #lactose intolerance कमी होतो हा आमचा अनुभव आहे.

*************

Vd Pratibha Bhave 

Ayurvedic Gynaecologist Pune 

8766740253

आजारपण टाळण्यासाठी योग्य आहार पदार्थ निवडावे

 *पनीर,दही, चीझ,

*सोडा, खार, 

*कोवळा मुळा, उडीद, वाल - पावटा ,

* शालूक - आलू सारखे कंद ,

* पिष्टमय पदार्थ, अंकुरीत धान्य, 

*सुकलेल्या भाज्या 

*, जव/यव पासून बनवलेले पदार्थ, 

*फाणित(राब) ,

* सुकलेले मास, सुकलेली माझे, बारीक असलेल्या पशुंचे मांस.

हे सर्व पदार्थ रोज खाऊ नये.

म्हणजे कधी कधी खाल्ले तर चालतात.

************

संदर्भ:- अष्टांग हृदय मात्राशितिय अध्याय/40-50

***********

Vd Pratibha Bhave 

Ayurvedic Gynaecologist Pune 

8766740253

कफ वाढवणारे पदार्थ

 साधारण पणे नेहमीच्या व्यवहारात असलेली ही पदार्थ कफ वाढवतात.

*पिकलेली केळी, केळफूल,

*आंब्याचे पन्हे, 

*दही, दूधाचे पदार्थ

*शहाळे, लौकी, 

*नविन धान्य, नविन मडक्यातील किंवा माठातील अतिशय गार पाणी

* नविन चिंचा, आंबट बोरं,करवंद, कच्चे पेरु

*तीळ तेल,कच्चे तूप - उत्तम प्रकारे न कढवलेले तूप 

****************

संदर्भ:- आयुर्वेद सारसंग्रह पान नं 54

*************

Vd Pratibha Bhave 

Ayurvedic Gynaecologist Pune 

8766740253

जेवण करतांना आहार पदार्थांचा क्रम कसा असायला हवा?

***************

*पचायला जड, तळलेले,गोड पदार्थ आधी खावे.

जसे :-लाडू, पुरणपोळी, अनारसे, रसगुल्ला, 

गुलाबजामुन,मोदक ,नारळ- आंबा फळ, केळ, कमळ कंद, रताळी, ऊस 

*पचायला हलके,तिखट,पातळ, चमचमीत, तीक्ष्ण पदार्थ शेवटी खावे.

 जसे :-पापड, चिप्स, फरसाण, चिवडा,शेव,भजी, इत्यादी 

*आंबट, खारट, पदार्थ जेवणाच्या मध्यात खावे.

जसे:- कढी, रायता,सूप ,ताक, लोणची 

***************

संदर्भ:- अष्टांग हृदय सूत्रस्थान 8/45

--------------------------------------

Vd Pratibha Bhave 

Ayurvedic Gynaecologist 

8766740253

गर्भ प्राप्ती साठी वाजीकरण आयुर्वेदीक उपचार

 *उत्तम संतती निर्माण व्हावी तसेच ज्यांना गर्भधारणा होत नाही, स्त्रीसंग करण्यास अडथळा येतो त्यांनी 

वाजीकरण उपचार करावे.

* रसायन चिकीत्सा केल्यानंतर च वाजीकरण चिकीत्सा करावी लागते

* वाजीकरण वारंवार करावे लागते. रसायन चिकित्सा मात्र वर्ष- दोन वर्षांतून तून एकदा केले तरी उपयोग होतो 

*वाजीकरण केल्याने मन प्रसन्न होते.

 शरीर पुष्टी होते, गुणवंत अपत्य प्राप्ती होते

अबाधित वंशपरंपरा सुरु होते( sex hormones normal होतात) व संप्रहर्षण, स्त्रीसंग प्रवृत्ती साठी इच्छा व शक्ती येते .

वाजीकरण उपचाराने शरीराला बल व तेज विशेष रुपात मिळते. त्यामुळे पुरुष आकर्षक होतो.

……..भवत्यतिप्रिय:  स्त्रीणाम् येन येनोपचीयते l

     तद्वाजीकरणं तद्धी देहस्योर्जस्करं परम् ll

          संदर्भ:-अष्टांग हृदय वाजीकरणविधि:

***************

Vd Pratibha Bhave 

Ayurvedic Gynaecologist 

MD Ayu obstetrics and gynaecology 

Pune.

8766740253

नस्य , वमन, विरेचन, बस्ती , रक्तमोक्षण हे पंचकर्म आहेत.

 निरोगी व्यक्तीला पंचकर्म करायचे झाल्यास

*नस्य 

*#वमन केल्यावर 15 दिवसाने विरेचन करावे.

*#विरेचन केल्यावर 15दिवसाने निरुहबस्ति(काढया चा) 

*निरुह बस्ति नंतर लगेच अनुवसान बस्ती(तेलाचा).

**************

मसाज करणे, स्टीम देणे हे पंचकर्माचे पूर्व तयारी आहे .

*नस्य म्हणजे नाकात औषध सोडणे.

*वमन म्हणजे उलट्या करवणे.

*विरेचन म्हणजे शौचास करवणे.

*बस्ती - औषधी गुद मार्गाने आत टाकणे 

*रक्तामोक्षण म्हणजे शरीरातील रक्त बाहेर काढणे.

पंचकर्म करताना  क्रम आवश्यक आहे.

 वमन केल्यावर ,विरेचन केल्यावर ,बस्ती केल्यावर लगेच नस्य करणे हा विरूद्ध उपक्रम आहे.तसेच बस्ती नंतर विरेचन ,वमन-विरेचानानंतर वमन करणे हा विरुद्ध उपक्रम आहे त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.

पंचकर्मचिकित्सा घेतांना क्रम आवश्यकच आहे.

**************

एका व्यक्तीला संपूर्ण पंचकर्म करायला कमीत कमी #दीड महिना तरी द्यावा लागतो. 

एक , दोन ,पाच दिवसात होणारे असे पंचकर्म नसते. तसेच ऋतु, वय,आजार हे बघून आवश्यकतेप्रमाणे नस्य,वमन,विरेचन,बस्ती यापैकी उपचार केले जातात.

***************

Vd Pratibha Bhave Pune 

Ayurvedic Gynaecologist 

8766740253

Regimen of diet according to Ayurveda (भोजन करण्याचे आयुर्वेदोक्त नियम)

1) काले – Food should be taken at the proper time, 2)   सात्म्ये-food should be familial, acceptable  3) शुचि – it should be clean 4) हितं -...