Tuesday, 27 August 2024

नस्य , वमन, विरेचन, बस्ती , रक्तमोक्षण हे पंचकर्म आहेत.

 निरोगी व्यक्तीला पंचकर्म करायचे झाल्यास

*नस्य 

*#वमन केल्यावर 15 दिवसाने विरेचन करावे.

*#विरेचन केल्यावर 15दिवसाने निरुहबस्ति(काढया चा) 

*निरुह बस्ति नंतर लगेच अनुवसान बस्ती(तेलाचा).

**************

मसाज करणे, स्टीम देणे हे पंचकर्माचे पूर्व तयारी आहे .

*नस्य म्हणजे नाकात औषध सोडणे.

*वमन म्हणजे उलट्या करवणे.

*विरेचन म्हणजे शौचास करवणे.

*बस्ती - औषधी गुद मार्गाने आत टाकणे 

*रक्तामोक्षण म्हणजे शरीरातील रक्त बाहेर काढणे.

पंचकर्म करताना  क्रम आवश्यक आहे.

 वमन केल्यावर ,विरेचन केल्यावर ,बस्ती केल्यावर लगेच नस्य करणे हा विरूद्ध उपक्रम आहे.तसेच बस्ती नंतर विरेचन ,वमन-विरेचानानंतर वमन करणे हा विरुद्ध उपक्रम आहे त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.

पंचकर्मचिकित्सा घेतांना क्रम आवश्यकच आहे.

**************

एका व्यक्तीला संपूर्ण पंचकर्म करायला कमीत कमी #दीड महिना तरी द्यावा लागतो. 

एक , दोन ,पाच दिवसात होणारे असे पंचकर्म नसते. तसेच ऋतु, वय,आजार हे बघून आवश्यकतेप्रमाणे नस्य,वमन,विरेचन,बस्ती यापैकी उपचार केले जातात.

***************

Vd Pratibha Bhave Pune 

Ayurvedic Gynaecologist 

8766740253

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...