भेसळ नसलेले #दूध हे पृथ्वीतलावरील अमृत आहे.
विशेषतः आजारी व्यक्तीने, औषधी घेणारे,प्रवास करणारे ,भाषण देणारे, स्त्री सेवन करणारे, उन्हात काम करणारे,श्रमिक, कष्ट करुन थकलेले ,वृद्ध व बालक यांनी औषध ,अन्नपदार्थासोबत रोज दूध प्यावे.
दूध अनुपान म्हणून पिणे अमृतासमान आहे.
*************
***व्याध्यौषधाध्वभाष्यस्त्रीलंघनातपकमभि: l
क्षीणे वृद्धे च बाले च पय: पथ्यं यथा S मृतम् ll
संदर्भ:- अष्टांग हृदय सूत्रस्थान 8/50
****************
आयुर्वेद शास्त्रातील प्रत्येक सूत्र हे अनेक परीक्षणे करुन मांडलेली आहेत.
आयुर्वेदानुसार दूध हा प्राणिज पदार्थ आहे. त्यामुळे वनस्पती पासून तयार केलेले दूध येथे अपेक्षित नाही.
* त्या त्या प्रांतातील देशी गायीचे दूध अपेक्षित आहे. नसल्यास बकरीचे, म्हशीचे दूध उपयोगात आणावे.
*ज्यांना दूध प्याले असता त्रास होतो त्यांना क्रमाने थोडे दूध देऊन दूध पचण्यासाची तयारी करता येते.
*आहारात थोडा बदल केला तर
#lactose intolerance कमी होतो हा आमचा अनुभव आहे.
*************
Vd Pratibha Bhave
Ayurvedic Gynaecologist Pune
8766740253
No comments:
Post a Comment