Tuesday, 27 August 2024

शरीरात वाताचे कार्य

वायु हा संपूर्ण शरीरात अखंडपणे फिरत असतो.

मोठे आतडे (पक्वाशय),कंबर, मांडया,कान,हाडे, त्वचा हे त्याचे ठिकाण आहेत 

त्यात सुद्धा त्याचे मुख्य ठिकाण मोठे आतडे (पक्वाशय) आहे.

*वायु ज्याठिकाणी जाईल त्यानुसार तेथे त्याचे नाव दिले जाते. प्राण,उदान,व्यान, समान,अपान असे 5प्रकार.

************

*प्राण वायु- हा वायु शिर/ डोके येथे असतो.

छाती व कंठ ह्या ठीकाणी फिरतो. बुद्धी,हृदय, इंद्रिय व मन ह्यांचे कार्य नियंत्रण करतो

*उदान वायु - हा छातीच्या ठिकाणी असतो. तो नाक,नाभी, गळा ह्याठीकाणी फिरतो.

बोलणे,उत्साह,ऊर्जा, ताकद, शरीराचा रंग,आणि स्मरण शक्ती ह्याचे नियंत्रण करतो

*व्यान वायु - मुख्यतः हृदयात असतो. तो संपूर्ण  शरीरात फिरतो. इतर वायूंच्या तुलनेने ह्याचा वेग अधिक असतो.

चालणे, हातापायांना वर खाली करणे, डोळे उघडणे बंद करणे साधारणपणे अवयवांच्या सर्व क्रिया हा वायुचे नियंत्रण करतो

*समान वायु-पचन करणाऱ्या अग्निजवळ,ग्रहणी मध्ये  असतो. संपूर्ण पचन संस्थेमध्ये (कोष्ठ) फिरतो.

अन्न ग्रहण करणे,पचवणे, सारभाग व मल मूत्र वेगळे करणे, व पचनसंस्थेतील पदार्थ खालच्या दिशेने ढकलणे हे कार्य नियंत्रित करतो

*अपान वायु - हा मुख्यतः गुदा (Anus) च्या ठिकाणी असतो .

हा श्रोणी  (pelvic including pelvic organs), बस्ती मेहन (bladder- urethra), मांडया, ह्या भागात फिरतो.

-शुक्र, आर्तव, मल,मूत्र, व गर्भ बाहेर काढण्याचे नियंत्रण तो करतो.

**************

संदर्भ - अष्टांग हृदय सुत्रस्थान 12/1,4-9

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...