Monday, 16 May 2022

प्रमेह / मधुमेह / Prediabetes / Diabetes

1) डायबेटिस साठी असलेल्या औषधांनी फक्त साखर वाढणे मर्यादित करणे हे अगदी वरवरची ट्रिटमेंट आहे. कारण रक्तातील साखर नियंत्रणात येण्यासाठी औषधाचे प्रमाण वाढत जाते व आतून ह्रदय, किडनी, डोळे, रक्तवाहिन्या ह्यांचे स्वास्थ्य बिघडत जाते. 

2) सर्व प्रकारच्या Pre diabetes ,Diabetes  रुग्णांनी दिनचर्या, पथ्यकर आहार विहार करावा. तसेच बस्ति, वमन, विरेचन, रक्तमोक्षण अशा अनेक आयुर्वेदिक उपचार पद्धती ने आरोग्य टिकवावे. 

***रक्तातील साखर नियंत्रणात असणे महत्वाचे आहेच पण त्याचबरोबर  अवयवांचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रयत्न करणे अतिशय आवश्यक आहे. 

Vd Pratibha Bhave 

8766740253

लहान मुलांमधिल #मानसिक आजार व त्यावर आयुर्वेदिक उपचार

सद्ध्या लहानमुलांना मध्ये मानसिक आजाराचे  प्रमाण वाढले आहे.  #AttentionDeficitHyperactivityDisorder(ADHD) ह्या मानसिक आजार चे प्रमाण सर्वाधिक आहे.  

**#ADHD ची साधारणपणे आढळणारी लक्षणे:-

  • ही मुले स्वतः च्याच विश्वात असतात. दुसऱ्यांच्या भावना समजू शकत नाही 
  • भावना फक्त स्वतः पूरत्याच मर्यादित असल्याने मनासारखे झाले नाही तर तांडव करतात. समजावून सांगणे अवघड असते
  • दुसऱ्यांच्या कामात मुद्दाम व्यत्यय आणतात 
  • विनाकारण खूप चिडणे, रागाने अंगावर धावून येणे,वस्तू फेकणे, मारणे अशी लक्षणे दिसतात 
  • ही मुले एका जागेवर स्थिर राहत नाही. सारखे फिरत राहतात, पळतात. जबरदस्तीने खुर्चीत बसवले तर चुळबुळ करतात, मान, डोळे, हातपाय हलवतात. 
  • अशा मुलांना व्यवस्थितपणे खेळणे अवघड जाते. चित्र काढणे, पेंटिंग करणे संगित शिकणे,अशा इतर कला शिकण्यासाठी  एकाग्रता नसते. 
  • अनेक काम करण्यासाठी ही मुले इच्छा आहे असे दाखवू शकतात पण ते पूर्ण करु शकत नाही. एक काम अर्धवट सोडून दुसरे करायला लागतात.
  • एकाग्रता नसल्याने आपण जे बोललो तेच परत सांगायला लावले तर ते जमत नाही. 
  • बुद्धी चे काम करतांना ताण पडतो म्हणून ते करायला टाळाटाळ करतात. बराचवेळ कामे विसरून जातात. ही मुले शाळेत मागे पडतात 
  • सांगितलेल्या गोष्टी पार पाडणे त्यांना कठीण जाते त्यामुळे खुप चुका होतात. ह्याचा अर्थ ते बुद्धी ने मंद असतात किंवा आळशी असतात असे नव्हे. 
  • काही मुलांमध्ये स्वप्नाळूपणा दिसून येतो .ही शांत बसून राहतात व इतर मुलांशी अजिबात मिसळत नाही. बाहेर काय चालले आहे  ह्याचे भान नसते
  • जर व्यवस्थित उपाय केले नाही तर ही मुले मोठी झाल्यावर इतर त्याच्या वयाच्या मुलाप्रमाणे वैचारिक प्रगल्भता नसते. Driving skill, निर्णय क्षमतेची कमतरता आढळते.म्हणून अशा मुलांसाठी बाल्यावस्थेपासूनच मानसिक स्वास्थ्यासाठी प्रयत्नशील असायला  हवे

************

आजार दूर करण्यासाठी उपाययोजना :-

************

मनोविकार तज्ञ केमिकल औषधांनी हा आजार 80%नियंत्रणात आणतात, परंतु त्या औषधांचे ह्या लहान मुलांवर खुप वाईट परिणाम होतात. 

-आयुर्वेदिक उपचार - 

*********

*आयुर्वेदीक पद्धती ने हा आजार खूप चांगल्या प्रकारे नियंत्रणात आणला जातो. तसेच औषधे बिनविषारी आहेत. जसे

*ब्राम्ही, शंखपुष्पी, अश्वगंधा, जेष्ठमध, जटामांसी वेखंड, पिंपळी, कुमारकल्याणघृत इत्यादी औषधे योग्य प्रमाणात दिली जातात 

 *तसेच षष्ठीशाली पिंडाने/औषधीयुक्त तेलाने संपूर्ण शरीराची मालिश केली जाते 

*दुधाची धार, विशिष्ट अंतरावर, 30ते 45 मिनिटे सतत कपाळावर विशिष्ट पद्धतीने सोडणे. असे दर महिन्याला 14 दिवस 

*श्लोक पाठांतर करुन घेणे 

*व्यायाम करवून घेणे

*आहार व दिनचर्या ठरवून देणे. 

ह्या सारख्या आयुर्वेदिक उपायांनी मानसिक आजार बरा होतो. 


Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 

8766740253

PCOS / PCOD



ज्या स्त्रियांना /मुलींना 

PCOS /PCOD असेल तर  त्यांना पाळीच्या तक्रारी असतातच त्याशिवाय इतर अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात. 

जसे-

1) गर्भ न राहणे 

2) गर्भ राहिला तरी तो न टिकणे

3) प्रमेह ,मधुमेह (Diabetes) 

4) गर्भाशयाचा कॅन्सर 

5) रक्तात lipid चे असंतुलन होणे

6) हृदयाच्या कार्यात अडथळा येणे

7) घोरण्याचे प्रमाण वाढणे, 

8) झोपेत श्वास घेण्यास अडथळा येणे(Obstructive sleep apnea) 

*म्हणून वेळेत pcod/pcos नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. 

त्यासाठी स्रीरोग तज्ञाकडून तपासणी करुन आहार, विहार, व्यायाम व औषधाने आरोग्यासाठी प्रयत्न करावा. 


Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 

8766740253

द्राक्षा/मनुका उन्हाळ्यात सर्वांनीच खावे

1) ताजे व सूकलेले असे दोन्ही प्रकारे द्राक्षांचा औषधात उपयोग केला जातो. ते थकवा घालवणारे, कंठ शुद्धी करणारे,शुक्र वाढवणारे, डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे फळ आहे. 

2) हे फळ शरीरात थंड व स्निग्ध गुण निर्माण करणारे आहे त्यामुळे पित्त व वात कमी करतो. 

3) रक्त शुद्ध करतो, मांस व शुक्र वाढवतो 

4) मल व मुत्रप्रवृत्ती करण्यासाठी मदत करतो

5) उन्हाळ्यात उन लागल्यामुळे ताप आला असेल, तहान, उलट्या होणे, ही लक्षणे असल्यास  गरमपाण्यात मनुका टाकून थंड झाल्यावर कुस्करून गाळून प्यावे,आराम पडतो.

6) काविळमध्ये मनुकयांचा काढा मुख्य औषधासोबत देतात 

7) जुना खोकला, T. B., ह्यामध्ये मनुका पिंपळी, साखर व मध एकत्र दिल्याने आराम मिळतो 

8) अम्लपित्त, Acidity, छातीत जळजळ होणे, घश्यात आंबट पाणी येणे अशा तक्रारी असल्यास  मनुका, हिरडा व खडीसाखर एकत्र करुन खावे. 

9) डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी  मनुका खाव्या. 

10) गर्भिणी ने आरोग्यासाठी रोजच गोड द्राक्षे, मनुका खावे. 


Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 

8766740253

गर्भिणी अवस्थेत मोत्यांचा वापर:-

1) गर्भिणी अवस्थेत मळमळणे, उलटय़ा होणे, ह्या तक्रारींसाठी मोत्याची पिष्टी अतिशय उपयोगी आहे. 

2) वारंवार गर्भपात होणे, गर्भ असतांना गर्भाशयात रक्तस्राव होणे, गर्भाशयात रक्तस्राव झाल्यामुळे गर्भ बाहेर पडणे, गर्भाची वाढ खुंटणे, गर्भ योग्य प्रकारे न वाढणे ह्यासाठी आयुर्वेदात मोती पिष्टी चा खुप उपयोग होतो

3) गर्भाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येणे अशा तक्रारी निर्माण झाल्यास मोती पिष्टी दिल्याने ह्या तक्रारी दूर होतात 

4) गर्भाची त्वचा तजेलदार होण्यासाठी तसेच गर्भ पुष्ट होण्यासाठी सर्वच गर्भिणींना मोती पिष्टी च्यवनप्राश मधुन द्यावे. 

5) आधुनिक शास्त्राने सुद्धा हे सिद्ध झाले आहे कि asprin, heparin ह्या विषारी औषधांपेक्षा गर्भिणी अवस्थेत मोती पिष्टी वापरले तर अधिक चांगले. 


Ref-Pearls in clinical obstetrics: challenges in anticoagulation in pregnancy

Micaela DELLA TORRE ✉, Monique B. SUTHERLAND, Laura M. DIGIOVANNI

Division of Maternal Fetal Medicine, Department of Obstetrics and Gynecology, University of Illinois at Chicago, Chicago, IL, USA


Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 

8766740253

बडिशेप/सौंप लहान मुलांसाठी उत्तम औषध

1) बडिशेप गोड, कडवट चवीला आहे व किंचित उष्ण गुणाची आहे. 

2) बालकांना वारंवार पोटदुखी,पोटात  गॅस साठणे, पोट कडक होणे  अशा तक्रारींसाठी 1चमचा बडीशेप 40ml उकळत्या पाण्यात टाकून पाणी गार झाल्यावर दिवसातून 3 ते 4वेळा द्यावे. असे आठवडाभर केल्यास तक्रारी दूर होतात.

3) लहान मुलांना भूक न लागणे, खोकला येणे, दम लागणे, अजीर्ण, द्रवमलप्रवृत्ती होणे अशा तक्रारींसाठी पाव चमचा बडिशेप चूर्ण मध व तूपात मिसळून द्यावे. 

4) सुंठ, लवंग, ओवा, दालचिनी, हिंग व बडीशेप एकत्र करुन पाव चमचा (1gm) घेतल्यास अजीर्ण झाल्यामुळे होणारी पोटदुखी थांबते.


Ref- वैद्य गो. आ. फडके 

Vd Pratibha Bhave 

8766740253

लहान मुलांना उन्हाळ्यात होणाऱ्या उष्णतेचा त्रास टाळण्यासाठी

1) दिवसातून 2वेळा थंड पाण्याने आंघोळ करावी. 

2) रात्री झोपण्याआधी अर्धा तास डोळ्यांवर थंड दुधाच्या पट्टया ठेवाव्या 

3) उसाचा रस, फळे, ताजे लिंबु सरबत, कोकम सरबत, आंब्याचे पन्हे, गार बासुंदी, गार दूध, गुलकंद, मोरावळा, बोरकुटे, बोराचे गोड सूप, शेवयाची खीर असे पदार्थ खावे

4) पाण्यात सुगंधी वाळ्याची छोटिशी पुरचुंडी टाकावी. 

5) उन्हाळ्यात सर्व लहान मुलांना  रोज दूधात शतावरी कल्प व प्रवाळयुक्त गुलकंद घालून प्यावे. ह्यामुळे नाकातून रक्त पडणे, डोळे दुखणे, लघविला जळजळ होणे, मळमळणे, अॅसिडीटी होणे, ताप येणे अशा तक्रारी निर्माण होत नाही. 


टीप - 

1) लहान मुलांना अजिबात उन्हात फिरायला नेऊ नये

2) दुपारी विश्रांती घ्यायला सांगावे

3) दही ग्रीष्म ऋतुंमध्ये कधीच खाऊ नये. दही अतिशय उष्ण गुणाचे असते. 


 Vd Pratibha Bhave

Regimen of diet according to Ayurveda (भोजन करण्याचे आयुर्वेदोक्त नियम)

1) काले – Food should be taken at the proper time, 2)   सात्म्ये-food should be familial, acceptable  3) शुचि – it should be clean 4) हितं -...