Wednesday, 2 August 2023

प्रसन्न मनाने भोजन करण्याचे फायदे


1) नेहमीच शरीराचे हित करणारा आहार करावा.
2) हा आहार प्रसन्न मनाने घ्यावा. 
3) हितकर आहार प्रसन्न मनाने घेतला तर मन संतुष्ट होते.
4) मन संतुष्ट झाल्यास शरीराला उर्जा मिळते.
5) शारीरिक व मानसिक बळ वाढते.
6) सुख समाधान मिळते
7) व्याधी,आजार,दुर्बलता नष्ट होतात

संदर्भ - चरक चिकित्सा 30/329

**प्रसन्न मनाने भोजन केले की त्याचे पचन योग्य प्रकारे होते. शुध्द मनाच्या स्थितित प्राणवायु चा संचार योग्य रुपाने होतो. त्यामुळे अन्नाचे पचन योग्य प्रकारे होऊन आजार बरे होतात.

संदर्भ - योग वशिष्ठ–
आनंदो वर्धते देहे शुद्धे चेतसि राघव l
         सत्व शुद्धया वहन्त्येते क्रमेण प्राणवायव: ll
जीर्यन्ति तथान्नानि व्याधिस्तेन विनश्यति l 

***म्हणून रोगी - निरोगी अशा कुठल्याही अवस्थेत, योग्य आहार प्रसन्न मनाने घ्यावा व शरीराचे , मनाचे स्वास्थ्य टिकवावे.

Vd Pratibha Bhave Pune
8766740253

पोटात औषध न देता आयुर्वेदिक चिकित्सा

- #आयुर्वेदात औषधी,वमन,विरेचन, ह्याने रुग्ण बरा करणे  ह्याला द्रव्यभूत चिकित्सा म्हटले आहे.

-ह्याशिवाय औषध न देता चिकित्सा करणे ह्याला अद्रव्यभूत चिकित्सा म्हटले आहे.

****अद्रव्यभूत चिकित्सा–  संदर्भ च. वि.8********

1) भय दर्शन- भीती दाखवणे
2) विस्मापन - आश्चर्य उत्पन्न करणे
3) विस्मारण - स्मरण होऊ न देणे
4) क्षोभण - क्षोभ निर्माण करणे
5) हर्षण - हर्ष उत्पन्न करणे
6)  भर्त्सन - निंदा करणे, निर्भात्सना करणे
7) वध - धमकी देणे
8) बंधन - बांधणे
9) स्वप्न - झोपवणे
10) संवाहन - शरीराला हाताने दाबणे

-आवश्यतेनुसार आजाराचे स्वरूप, रुग्णाची अवस्था यानुसार वरील उपाय केले जातात.
- ह्या सर्व क्रिया करताना औषध,शस्त्र, यंत्र न वापरता करायची आहेत . ह्या उपायांना अमूर्तक्रिया म्हणतात व चिकित्सेला #अद्रव्यभूत चिकित्सा म्हणतात.
-उन्माद,अपस्मार,ज्वर इत्यादी अनेक आजारात ह्याचा उपयोग आहे.

Vd Pratibha Bhave ,Pune

केसांचे स्वास्थ्य


लांबसडक, घनदाट,चमकदार, केस असले की आपण तिला सुकेशिनी म्हणतो.
सुकेशिनी असणे हे उत्तम शारीरिक व मानसिक आरोग्याचे लक्षण आहे.
आयुर्वेदात केसांच्या आरोग्यासाठी केशसंजनन, केशवर्धन,केशरंजन अशा औषधांचा उपयोग केला जातो.
केशसंजनन:- ह्या  औषधाने शरीरात हाडे, नख, केश मजबूत होतात
केश वर्धन - ह्या औषधाने केश वाढवतात, पोत सुधारतो व केश जाड होतात.
केश रंजन - ही औषधे केसांचे रंग सुधारण्यासाठी होतो.
आयुर्वेदात केसांच्या आरोग्यासाठी अनेक औषधी आहेत.

*****केसांचे आजार:-**********
*खालित्य (केश गळणे) 
 *पलित्य (अकाली केश पिकने)
* इंद्र लुप्त (चाई) 
ह्यासाठी विशेषतः औषधी उपचार सांगितले आहेत.

***केश का गळतात?
केसांच्या मुळाशी असलेले वात, पित्त कफ व रक्त ह्यात असंतुलन निर्माण होऊन केसांच्या मुळाशी  पोषक तत्वे पोहचू शकत नाही त्यामुळे  केश गळू लागतात.

-आधुनिक शास्त्रानुसार तरुणांमध्ये केश गळण्याचे मुख्य कारण
*हॉर्मोन्स मध्ये बदल, उदा.-PCOS, Thyroid 
*केसांची वेगवेगळी style सारखी बदलणे
*केमिकल्स चा अधिक वापर
*काही औषधी सतत घेणे
*पोषक तत्वांची कमतरता
*आजापणामुळे 
**Delivery झाल्यावर हॉर्मोन्स मध्ये अचानक बदल झाल्यामुळे खूप केश गळतात. पण 6महिन्याने पुन्हा छान केश येतात.

****केश का पिकतात?
जेव्हा कुठल्याही कारणाने पित्त बिघडले की ते उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म ह्या गुणामुळे केसांच्या मुळाशी जाऊन केसांना अकाली पांढरे करतो. अशा प्रकारे केश पिकतात, पांढरी होतात.

*आधुनिक शास्त्रा च्या मते -शरीरात protein ची कमतरता,copper,Iron ची कमतरता असेल तर केश अकाली पांढरी होतात.ही कमतरता कमी झाली की पुन्हा केसांचा रंग काळा होतो. 
-काही medicines, 
-जुनाट आजार ह्यामुळे सुद्धा केश पांढरे होतात.
- लवकर केश पिकणे हे वंशपरंरागत सुद्धा असू शकते.
ह्यासाठी आयुर्वेदात नस्य,बस्ति,औषधी ,शिरोधारा अशा उपचाराने खूप सुधारणा होते.

*****चाई  पडणे हे सुद्धा दिसून येते.आयुर्वेद मते हे विशिष्ट हे कृमी मुळे घडते , त्यानुसार उपचार केले की 7 दिवसात त्या ठिकाणी केश येऊ लागतात.

*****ह्याशिवाय केसात कोंडा होणे ही तक्रार असते. त्यासाठी केश धुण्यासाठी, केसांना लावण्यासाठी औषधं दिली की 15दिवसात पूर्ण कोंडा जातो.

***केसांच्या अशा अनेक समस्या आयुर्वेदाने बऱ्या होतात.******************

Vd Pratibha Bhave Pune 8766740253

आरोग्यासाठी


#अपान वायु ही शरीरात वरुन खाली ह्या दिशेने काम करणारी शक्ती आहे.

ह्याचे स्थान नाभीच्या खाली असलेले अवयव, #गर्भाशय, मुत्राशय, मोठे आतडे, मलाशय,बीज ग्रंथी, वृषण testis , कंबर, मांड्या हे आहे.
मल,मुत्र विसर्जन करणे,बीज बीजाशयातून बाहेर येणे,पाळी येणे, गर्भ राहणे, गर्भाला बाहेर काढणे ह्या क्रिया अपान वायु नियंत्रित करतो
जर अपान वायु संतुलित असेल तर सर्व क्रिया सुरळीतपणे होतात.

****अपान वायु बिघडला तर अनेक आजार होतात जसे:--------
 मलमुत्रा विसर्जनाला अडथळा येणे,
पुरुषांमध्ये #बीजदोष येणे,
#पाळी अनियमित होणे, गर्भ न राहणे, वारंवार #गर्भपात होणे, गर्भामध्ये दोष असणे,
 प्रसूति साठी अडथळा येणे, प्रसूति नंतर वात होणे, रोग प्रतिकारशक्ती कमी होणे
गुडघे दुखणे, कंबर मांड्या दुखणे 

****उपाय*******
अपान बिघडला असेल तर अनुलोम करणारी औषधे , ऋतुनुसार आहार विहार करणे असे उपायांनी तात्पुरते बरे वाटते. मात्र अपान वायु साठी #बस्ति ही उत्तम चिकित्सा आहे .
रुग्णाच्या प्रकृतिनुसार सोसवेल असे औषध द्यावी लागतात.

Vd Pratibha Bhave #Pune
8766740253

गुडघे दुखणे (Pain in knee joint)

  • आमवात , संधिवात,वातरक्त, अस्थिभंग, आघात अश्या अनेक कारणाने गुडघे दुखतात. 
  • परीक्षण करून त्यानुसार औषधी ,स्थानिक उपचार केल्या जातात .
  • स्थानिक उपचारात जलौका अवचरण
  •  (leech application), जानू बस्ति , उपनाह,प्रलेप,प्रदेह, पिंड स्वेद असे उपचार केल्या जातात.
  • यासोबत विरेचन,बस्ती(औषधी काढे शौचाच्या मार्गाने देणे) हे पंचकर्म केले तर गुडघे दुखणे लवकर आराम मिळतो 


Vd Pratibha Bhave Pune

पोटाचे आरोग्य (#Gut Health)


  1. आपल्या शरीरातील आतड्यांमध्ये अनेक प्रकारचे शरीराला उपयोगी सूक्ष्म जीव जंतू (Healthy Gut bacteria)असतात. 
  2. हे जीवजंतू  शरीरातील सर्व क्रिया योग्य ठेवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात
  3. खाल्लेल्या आहाराचे पचन करणे, व्हिटॅमिन तयार करणे, हॉर्मोन्स चे संतुलन राखणे,वजन संतुलित ठेवणे, भूक वेळेत लागणे,मल प्रवृत्ति नियंत्रण 
  4. ह्याशिवाय मनाचा उत्साह असणे नसणे, डिप्रेशन ह्याचा सुद्धा आतड्यातील जीवजंतू शी संबंध असतो
  5. आतड्यात असलेल्या अनेक जीवजंतां चे संतुलन आपली दिनचर्या,आहार, वातावरण ह्यावर अवलंबून असते.
  6. खूप साखर खाणे, जंक फूड,acidic food, Antibiotics चा अतिरेक, alcohol drinks, ,pesticides , दातांचे आजार, मानसीक तणाव ह्या कारणाने हे जीवजंतू असंतुलित होतात व अनेक प्रकारचे आजार होतात.
  7. ह्या जीवजंतां च्या असंतुलनामुळे लठ्ठपणा,PCOD,PCOS, diabetes, skin disease, सांधे दुखणे, शरीरातील रक्त कमी होणे, acidity, IBS, हृदयाचे आजार, उदासिनता असे अनेक आजार होतात.
  8. पोटाचे, आतड्याचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून शरीराची नियमीतपणे सर्व्हिसिंग करावी.ज्याप्रमाणे गाडीची नियमितपणे सर्व्हिसिंग केली तर ती बरेच दिवस छान चालते,तसेच शरीराचे आहे.
  9. नियमितपणे #पंचकर्म करणे म्हणजे शरीराची सर्व्हिसिंग करणे होय. तसेच आहार ,विहार, दिनचर्या, ऋतुचर्या , योगासन,व्यायाम ह्याचे नियम पाळावे.
  10. अनावश्यक विषारी औषधे घेऊ नये. जंक फूडच्या आहारी जाऊ नये. 

Vd Pratibha Bhave pune
8766740253

गर्भिणी साठी NONGANADI GHRUTHAM (#नोंगणादि घृत)

  1. गर्भिणी अवस्थेत हे आयुर्वेदिक औषध खूप गुणकारी आहे.
  2.  गर्भिणी अवस्थेत गॅसेस होणे, कठीण मलप्रवृत्ती होणे, मुळव्याध, अशा पचनाच्या अनेक तक्रारी ह्या औषधाने दूर होतात.
  3. ह्या औषधात बला, लक्ष्मणा,सुपारीचे फुल,नारळाचे फुल,हळद, भूई आवळा अशी गर्भाचे पोषण करणारे औषधी आहेत.
  4. हे औषध गर्भाची चांगली वाढ होण्यासाठी उत्तम आहे.
  5. गर्भ व गर्भिणी दोघांना आरोग्य देणारे आहे.
  6. चव सुद्धा छान आहे , त्यामुळे वरण भातावर ,पोळीवर,खीर ,शिरा अश्या अनेक अन्नपदार्था सोबत सहज खाता येते 
  7. गर्भिणी अवस्थेत(during #pregnancy) हे औषध नियमितपणे घेतल्यास सुखपूर्वक प्रसूति होते.
******आयुर्वेद तज्ञा च्या मार्गदर्शनानुसार घ्यावे. स्वतः प्रयोग करु नये.****************

संदर्भ:- सहस्त्रयोगम् 
Vd.Pratibha Bhave

कामदुधा (साधा)

 पित्तासाठी स्वस्त व बिनविषारी आयुर्वेदिक गोळया.

******************************************

ह्या आयुर्वेदिक गोळ्यांमध्ये गुळवेल सत्त्व, सुवर्ण गैरिक, अभ्रक भस्म आहे . हे सर्व बिनविषारी आहेत. 

# ह्या गोळ्या गर्भिणी मध्ये सुद्धा देता येतात.
  • पित्ता चा त्रास होत असेल ,शरीरात उष्णता वाढली अम्लपित्त, चक्कर येणे अशा तक्रारीत अतिशय उपयोगी आहे,प्रमेह,डायबिटीस
  • उष्मा वाढल्या मुळे नाकातून रक्त पडणे 
  • उष्णतेमुळे मल मुत्र च्या मार्गातून  रक्त पडणे 
  • अंगात ताप मुरणे, नेहमी ताप असल्याप्रमाणे वाटणे ह्यात उपयोगी आहे.
  • स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात श्र्वेतस्त्राव, पाळीच्या वेळी अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होणे 
  • मानसीक अस्वस्थता,पित्तज उन्माद, चिडचिड पणा ह्यासाठी  उपयोगी आहे.

संदर्भ:- आयुर्वेद सार संग्रह
Vd pratibha Bhave Pune

बाळाची आंघोळ

  1.  डिलिव्हरी नंतर बाळ घरी आल्यावर काळजी कशी घ्यायची हा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यात बाळाला आंघोळ कशी घालायची त्याबद्दल महिती सर्वात महत्वाची. 
  2. बाळाला  दिड महिन्यापर्यंत रोज आंघोळ न घालता आठवड्यातून 2 ते 3 वेळा घालावी.
  3. आंघोळीला नेण्याच्या आधी त्याचे कपडे टॉवेल नॅपकिन, जमिनीवर त्याला ठेवायची कोरडे करण्यासाठी छोटे अंथरूण जागा, कपडे घालण्यासाठी ची सगळी तयारी करुन घ्यावी.  
  4. दूध पाजल्यावर लगेच किंवा उपाशी असताना आंघोळ घालू नये. सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी केव्हाही केली तरी चालेल.
  5. अंघोळीला बाथरूम मध्ये नेण्यापेक्षा उबदार खोलीत, अंगावर वारा येणार नाही अशा ठिकाणी टब मध्ये करावी.आंघोळीचे पाणी अगदी कोमट हवे. डाव्या हाताने डोके व मानेला सतत आधार द्यावा.डोके मान शरीरापेक्षा नेहमी थोडे उंच राहील, नाका,तोंडात ,कानात पाणी जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
  6. बाळाचे कपडे काढण्याच्या  आधी डोळे स्वच्छ ओल्या कापसाच्या बोळ्याने किंवा मऊ कापडाने आतल्या कोपऱ्यातून बाहेरच्या कोपऱ्याकडे असे हळूवारपणे पुसावे.
  7. त्यानंतर चेहरा,कानाच्या मागे, ओल्या मऊ कापडाने पुसून काढावा. दूध,चिकटपणा स्वच्छ करावा .
  8. मान,छाती ,पाठ,पोट स्वच्छ करण्यासाठी वरचे कपडे काढावे .ते सुद्धा कोमट पाण्याने मऊ कपड्याने स्वच्छ करावे . त्यानंतर पोटाखालचा शी, सू , ची जागा स्वच्छ धुवून घ्यावी. त्वचेला खूप घासू नये नाहीतर खाज, eczema होण्याची शक्यता असते.
  9. शेवटी डोक्यावर पाणी ओतून स्वच्छ करावे .हे सर्व करण्यासाठी 5-7 मिनिटे पुरेशी असावी.
  10. अंघोळीसाठी साबण न वापरलेली बरी. पीठ लावून करायची असेल तर खूप चोळू नये  हलकेच लावून सर्व पीठ निघून जाईल ह्याची दक्षता घ्यावी.
  11. आंघोळी च्या आधी थोडे खोबरेल तेल हलक्या हाताने लावले तरी चालेल.तेल लावून अंघोळ केली तर त्वचा ड्राय पडत नाही .
  12. आंघोळ झाली की लगेच बाळाला उबदार टॉवेल मध्ये माथ्या पासून पायाच्या नखापर्यंत  गुंडाळून जमिनीवर छोटे अंथरुणावर आणावे. सर्वप्रथम केस, माथा पुर्णपणे कोरडा करावा . स्वच्छ कपडे घालावे. दूध पाजावे. आंघोळ झाल्यावर बाळ झोपून जातो. बाळाला अंगावर कपडे न घालता, वारे सरळ अंगावर येईल अशा ठिकाणी, उंच जागेवर,तसेच एकटे ठेवू नये.
  13. अंघोळ घालताना बाळाच्या शरीरातील ऊष्णता कमी होते,  त्यामुळे वजन कमी होणे,सर्दी, जंतुससर्ग होणे ,ताप येणे , असे घडण्याची शक्यता असते म्हणून रोज अंघोळ घालू नये . 

Vd pratibha Bhave Pune

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...