- डिलिव्हरी नंतर बाळ घरी आल्यावर काळजी कशी घ्यायची हा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यात बाळाला आंघोळ कशी घालायची त्याबद्दल महिती सर्वात महत्वाची.
- बाळाला दिड महिन्यापर्यंत रोज आंघोळ न घालता आठवड्यातून 2 ते 3 वेळा घालावी.
- आंघोळीला नेण्याच्या आधी त्याचे कपडे टॉवेल नॅपकिन, जमिनीवर त्याला ठेवायची कोरडे करण्यासाठी छोटे अंथरूण जागा, कपडे घालण्यासाठी ची सगळी तयारी करुन घ्यावी.
- दूध पाजल्यावर लगेच किंवा उपाशी असताना आंघोळ घालू नये. सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी केव्हाही केली तरी चालेल.
- अंघोळीला बाथरूम मध्ये नेण्यापेक्षा उबदार खोलीत, अंगावर वारा येणार नाही अशा ठिकाणी टब मध्ये करावी.आंघोळीचे पाणी अगदी कोमट हवे. डाव्या हाताने डोके व मानेला सतत आधार द्यावा.डोके मान शरीरापेक्षा नेहमी थोडे उंच राहील, नाका,तोंडात ,कानात पाणी जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
- बाळाचे कपडे काढण्याच्या आधी डोळे स्वच्छ ओल्या कापसाच्या बोळ्याने किंवा मऊ कापडाने आतल्या कोपऱ्यातून बाहेरच्या कोपऱ्याकडे असे हळूवारपणे पुसावे.
- त्यानंतर चेहरा,कानाच्या मागे, ओल्या मऊ कापडाने पुसून काढावा. दूध,चिकटपणा स्वच्छ करावा .
- मान,छाती ,पाठ,पोट स्वच्छ करण्यासाठी वरचे कपडे काढावे .ते सुद्धा कोमट पाण्याने मऊ कपड्याने स्वच्छ करावे . त्यानंतर पोटाखालचा शी, सू , ची जागा स्वच्छ धुवून घ्यावी. त्वचेला खूप घासू नये नाहीतर खाज, eczema होण्याची शक्यता असते.
- शेवटी डोक्यावर पाणी ओतून स्वच्छ करावे .हे सर्व करण्यासाठी 5-7 मिनिटे पुरेशी असावी.
- अंघोळीसाठी साबण न वापरलेली बरी. पीठ लावून करायची असेल तर खूप चोळू नये हलकेच लावून सर्व पीठ निघून जाईल ह्याची दक्षता घ्यावी.
- आंघोळी च्या आधी थोडे खोबरेल तेल हलक्या हाताने लावले तरी चालेल.तेल लावून अंघोळ केली तर त्वचा ड्राय पडत नाही .
- आंघोळ झाली की लगेच बाळाला उबदार टॉवेल मध्ये माथ्या पासून पायाच्या नखापर्यंत गुंडाळून जमिनीवर छोटे अंथरुणावर आणावे. सर्वप्रथम केस, माथा पुर्णपणे कोरडा करावा . स्वच्छ कपडे घालावे. दूध पाजावे. आंघोळ झाल्यावर बाळ झोपून जातो. बाळाला अंगावर कपडे न घालता, वारे सरळ अंगावर येईल अशा ठिकाणी, उंच जागेवर,तसेच एकटे ठेवू नये.
- अंघोळ घालताना बाळाच्या शरीरातील ऊष्णता कमी होते, त्यामुळे वजन कमी होणे,सर्दी, जंतुससर्ग होणे ,ताप येणे , असे घडण्याची शक्यता असते म्हणून रोज अंघोळ घालू नये .
Vd pratibha Bhave Pune
No comments:
Post a Comment