- आपल्या शरीरातील आतड्यांमध्ये अनेक प्रकारचे शरीराला उपयोगी सूक्ष्म जीव जंतू (Healthy Gut bacteria)असतात.
- हे जीवजंतू शरीरातील सर्व क्रिया योग्य ठेवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात
- खाल्लेल्या आहाराचे पचन करणे, व्हिटॅमिन तयार करणे, हॉर्मोन्स चे संतुलन राखणे,वजन संतुलित ठेवणे, भूक वेळेत लागणे,मल प्रवृत्ति नियंत्रण
- ह्याशिवाय मनाचा उत्साह असणे नसणे, डिप्रेशन ह्याचा सुद्धा आतड्यातील जीवजंतू शी संबंध असतो
- आतड्यात असलेल्या अनेक जीवजंतां चे संतुलन आपली दिनचर्या,आहार, वातावरण ह्यावर अवलंबून असते.
- खूप साखर खाणे, जंक फूड,acidic food, Antibiotics चा अतिरेक, alcohol drinks, ,pesticides , दातांचे आजार, मानसीक तणाव ह्या कारणाने हे जीवजंतू असंतुलित होतात व अनेक प्रकारचे आजार होतात.
- ह्या जीवजंतां च्या असंतुलनामुळे लठ्ठपणा,PCOD,PCOS, diabetes, skin disease, सांधे दुखणे, शरीरातील रक्त कमी होणे, acidity, IBS, हृदयाचे आजार, उदासिनता असे अनेक आजार होतात.
- पोटाचे, आतड्याचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून शरीराची नियमीतपणे सर्व्हिसिंग करावी.ज्याप्रमाणे गाडीची नियमितपणे सर्व्हिसिंग केली तर ती बरेच दिवस छान चालते,तसेच शरीराचे आहे.
- नियमितपणे #पंचकर्म करणे म्हणजे शरीराची सर्व्हिसिंग करणे होय. तसेच आहार ,विहार, दिनचर्या, ऋतुचर्या , योगासन,व्यायाम ह्याचे नियम पाळावे.
- अनावश्यक विषारी औषधे घेऊ नये. जंक फूडच्या आहारी जाऊ नये.
Vd Pratibha Bhave pune
8766740253
No comments:
Post a Comment