- #आयुर्वेदात औषधी,वमन,विरेचन, ह्याने रुग्ण बरा करणे ह्याला द्रव्यभूत चिकित्सा म्हटले आहे.
-ह्याशिवाय औषध न देता चिकित्सा करणे ह्याला अद्रव्यभूत चिकित्सा म्हटले आहे.
****अद्रव्यभूत चिकित्सा– संदर्भ च. वि.8********
1) भय दर्शन- भीती दाखवणे
2) विस्मापन - आश्चर्य उत्पन्न करणे
3) विस्मारण - स्मरण होऊ न देणे
4) क्षोभण - क्षोभ निर्माण करणे
5) हर्षण - हर्ष उत्पन्न करणे
6) भर्त्सन - निंदा करणे, निर्भात्सना करणे
7) वध - धमकी देणे
8) बंधन - बांधणे
9) स्वप्न - झोपवणे
10) संवाहन - शरीराला हाताने दाबणे
-आवश्यतेनुसार आजाराचे स्वरूप, रुग्णाची अवस्था यानुसार वरील उपाय केले जातात.
- ह्या सर्व क्रिया करताना औषध,शस्त्र, यंत्र न वापरता करायची आहेत . ह्या उपायांना अमूर्तक्रिया म्हणतात व चिकित्सेला #अद्रव्यभूत चिकित्सा म्हणतात.
-उन्माद,अपस्मार,ज्वर इत्यादी अनेक आजारात ह्याचा उपयोग आहे.
Vd Pratibha Bhave ,Pune
No comments:
Post a Comment