Thursday, 22 September 2022

सुदृढ अपत्यप्राप्ती साठी

 स्रीयांमध्ये मानसिक आजार होण्याची शक्यता पुरुषांपेक्षा अधिक असते

कारण - 

-1) दुय्यम वागणूक मिळणे

-2) मनाने अतिशय संवेदनशील असणे

-3) शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक छळ होणे 

-4) अतिशय मानसिक व शारीरिक परीश्रम करणे

-5) गरीबी,पौष्टिक अन्न न मिळणे, कुपोषित असणे

-6) वयानुसार हार्मोन्स मध्ये होणारा बदल

-7) वंशपरंपरागत 


मानसिक रोग असतांना गर्भधारणा झाली तर गर्भपात होणे, रक्त दाब वाढणे, पूर्ण दिवस भरण्याआधी प्रसूति होणे अशा घटना घडतात. तसेच कधीकधी बाळाच्या मानसिक स्वास्थ्यावर परीणाम होतो.. 

**  सुदृढ अपत्यप्राप्तीसाठी स्रीचे स्वास्थ्य उत्तम राहील ह्याकडे लक्ष द्यावे. **


Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 

8766740253

पित्ताच्या आजारांसाठी

 1) पित्ताचे आजार जसे अंगावर पुरळ फोड उठणे, अंगावर पित्त उठणे, चेहऱ्यावर वांग येणे, चेहऱ्याच्या त्वचेचा वर्ण बिघडणे, रक्त कमी होणे, अॅसिडीटी होणे, वारंवार मलप्रवृत्ति होणे, तोंडाला वारंवार फोड येणे, डोळ्यांची आग होणे,डोके दुखणे, 

2) पाळी महिन्याच्या आत येणे, पाळीत रक्तस्रावावाचे प्रमाण अधिक असणे, वारंवार गर्भपात होणे ,शुक्र बीज विकार, अशा  अनेक तक्रारी पित्त अधिक प्रमाणात शरीरात वाढले म्हणजे दिसून येतात. 

3) वर्षाऋतु संपत आला आहे व शरदऋतुची चाहुल लागली म्हणजे कित्येक लोकांना पित्ताचे आजार  सुरु होतात. #शरद ऋतुंमध्ये नैसर्गिक पणे, तसेच वातावरणाचा, आहारीय पदार्थांचा परीणामानने शरीरातील अतिरिक्त दूषित पित्त पातळ होते. 

4) हे पातळ झालेले #पित्त जवळच्या मार्गाने शरीरातून बाहेर पडण्याचा  प्रयत्न करतो.  अशावेळी विरेचन हे पंचकर्मापैकी एक कर्म केल्याने उत्तमरीत्या पित्ताचे संतुलन साधल्या जाते. 

5) ज्यांना पित्ताचे आजार आहेत, किंवा ते आजार होऊ नये म्हणून आयुर्वेदाने सांगितलेले #विरेचन तसेच #रक्तमोक्षण कर्म (blood letting therapy ) शरदऋतुत नक्की करावे.


Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 

8766740253

पुष्यानुग चुर्ण स्रियांसाठी वरदान

 1) ह्यात जांभूळ बीज, आंबाबिज, नागरमोथा, सुंठ, लोध्र, अर्जुन, जेष्ठमध, मंजिष्ठा अशी अनेक आयुर्वेदिक वनस्पती आहेत 

2) हे चविला तुरट व थंड गुणाचे आहे 

3) आयुर्वेदात, स्री प्रजनन अवयवांच्या आजारासाठी बनवलेले हे खास चुर्ण आहे. हल्ली ह्याच्या गोळ्या सुद्धा मिळतात 

4) प्रजनन अंगांना सुज येणे, लाल, पिवळा, पांढरा, दह्याप्रमाणे, दुर्गंधी, खाज, अशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या निरनिराळ्या स्त्रावांमध्ये उपयोग होतो.तांदळाच्या धुवन मधून दिले जाते. 

Endometriosis मध्ये पाळीच्या वेळी दुखणे हे लक्षण ह्या चुर्णाने कमी होते. 

5) ह्याशिवाय मुळव्याधीत रक्त पडणे, जंत, द्रवमलप्रवृत्ती, आव युक्त मलप्रवृत्ति मध्ये गुणकारी आहे 

**गर्भिणी ला हे चुर्ण देउ नये**


*************Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 8766740253

गर्भिणी अवस्था ही नियोजनबद्ध असावी (Pre Planned Pregnancy )

 #गर्भ राहण्याआधी स्री व पुरुषाने संतुलित आहार करावा. 

*आहारात बदाम, अक्रोड, पिस्ता, खारीक, ताज्या फळभाज्या, शेंगा, पालेभाज्या, दूध, तूप, मूग, 6महिने जुने तांदुळ , ज्वारी, नाचणी, ऋतु नुसार मिळणारी ताजी फळे ह्याचा समावेश करावा. 

*डब्बा बंद खाद्यपदार्थ, शिळे, आंबवलेले पदार्थ, बेकरी, मैदा, सोडा घालून केलेले  तेलकट, अतिशय तिखट, आंबट, खारट चवीचे पदार्थ खाऊ नये. दही रोज खाऊ नये. अर्ध कच्चे व स्वच्छ न धुतलेले अन्नपदार्थ टाळावे. 

*नेहमी आनंदी, उत्साहात असावे. प्राणायाम व योगासने करावी. चित्त शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. रोज  शांत झोप घ्यावी. 

*जागरण करु नये. वादविवाद टाळावे. 

*गर्भ धारणा करण्याआधी दोघांनीही पंचकर्म, #उत्तरबस्ति ने शरीरशुद्धी करुन घ्यावी. 

*आहारशुद्धी, मन शुद्धी व शरीरशुद्धी झाली तर  उत्तम बीजे तयार होते. उत्तम बीजापासून सुदृढ अपत्यप्राप्ती होते 

**सुदृढ अपत्यप्राप्ती साठी नियोजनपूर्वक गर्भधारणा असावी असे आयुर्वेदाचे ठाम मत आहे. त्यासाठी आयुर्वेदात #'गर्भाधानविधी 'सांगितला आहे. ***


Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 

8766740253

नेहमीच दुर्लक्षित असलेल्या व 24 तास काम करत असणाऱ्या मांसपेशी :- `पेल्विक फ्लोर मसल्स '- (#Pelvic floor muscles ) - च्या स्वास्थ्यासाठी

 ह्या मांसपेशी मुत्राशय,मुत्रमार्ग, आतडे, मलाशय, गुदद्वार, जननेंद्रिय, ह्या अवयवांना आपल्याला हवे संकुचित करणे व विस्तारीत करणे ह्या कार्यात भाग घेतात.    **ह्या मांसपेशी सैल झाल्यास- किंवा काही कारणाने क्षतिग्रस्त झाल्या तर आपोआप मुत्र गळणे, एकाएकी मल बाहेर येणे,मांसपेशी च्या वर असलेले अवयव खाली सरकणे (#rectocele,enterocele cystocele,urethrocele, uterine prolapse etc,) अशा तक्रारी निर्माण होतात. 

****ह्या पेशी खूप घट्ट झाल्यास त्यांना स्वतःच्या हालचाली साठी अडथळा येतो. त्यामुळे मलबद्धता होते, मुत्र  पुर्णपणे एकावेळी बाहेर येत नाही, मुत्र प्रवृत्ती च्या वेळी आग होणे दुखणे, जननेंद्रिय ला वेदना होणे ही लक्षणे निर्माण

*हया मांसपेशी घट्ट कींवा सैल होण्याची कारणे :-

-असे कोणतेही कारण ज्यामुळे ह्या पेशींवर सतत व खूप दिवसा पर्यंत ताण पडणे

1) जसे गर्भधारणा, डेलिव्हेरी 

2) जुना खोकला 

3) जुनी मलबद्धता 

4) मलप्रवृत्ति च्या वेळी जोर देणे

5) आजारामुळे, आॅपरेशन मुळे तेथे आज्ञा पोहोचवणाऱ्या नाडी क्षतिग्रस्त होणे, 

6) मेनोपॉज मध्ये ह्या मांसपेशी सैल होण्याच्या आजाराचे प्रमाण प्रत्येक 4 स्रियांपैकी 1स्री असे आहे.

#Endometriosis मध्ये ह्या मांसपेशी घट्ट होतात. 

7) अतिस्थौल्य

8) पुरुषांमध्ये अपघात, प्रोस्टेटग्रंथी वाढणे, त्या भागात आॅपरेशनस्, पॅरॅलिसिस सारखे आजार, जंतूसंसर्ग, कॅन्सर नंतर रेडियेशन उपचार  

वयानुसार हे आजार होतातच असे धरुन चालू नये. मांसपेशींचे स्वास्थ्य उपचारांना सुधारते 


-ह्या मांसपेशी च्या स्वास्थ्यासाठी - 

-दिनचर्या नेहमीच व सर्व आजारात महत्त्वाची आहे. आहार विहाराचे नियम पाळावे. चहा, कॉफी, अल्कोहोलयुक्त पदार्थ, स्मोकिंग टाळावे. 

-नियमितपणे व्यायाम करावा. वजन संतुलित राहण्यासाठी प्रयत्न करावे. 

- नियमीत पणे मलप्रवृत्ति ला जावे. मलप्रवृत्ति चांगली होण्यासाठी आहारात फळे, भाजीपाला, 10ml रोज साजूक तूप, असावे. 

-वैद्या च्या सल्ल्याने मात्राबस्ति, विरेचन पिचू, #उत्तरबस्ति, अवगाह हे उपचार करुन घ्यावे. ह्यामुळे त्या पेशी दृढ होतात. 

-ज्यांच्या अनेक डेलिव्हेरी झाल्या कींवा पाळी गेल्यावर ह्या मांसपेशींचे आरोग्य बिघडले असेल तर लवकरात लवकर उपचार घ्यावे.

-#कॅन्सर रुग्णांमध्ये रेडियेशन नंतर ही अवस्था निर्माण झाल्यास प्रतिसारण, अवगाह, पिचूधारण ह्या उपचाराने अवस्था सुखकर होते. 


***-ह्या आजारात लवकर उपचार करणे गरजेचे असते.


Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 

8766740253

अंगावर पित्त उठत असेल तर अ‍ॅलर्जी च्या गोळ्या खाण्यापेक्षा आहारात बदल करावा.

आहारात- जुन्या तांदुळा चा भात, मूग कुळीथाचे कढण, कारले, कर्कोटक, काटवल, शेवग्याच्या शेंगा, मूळा, घोळभाजी, डाळिंब, त्रिफळा, मध, 

जंगली पशु-पक्षांचेसूप, कडू,तिखट व तुरट चवीचे पदार्थ खावे. 

**********

आहारात-दुधाचे पदार्थ, गुळ साखरेचे पदार्थ, मासे, समूद्रातील जीव(Sea food), दलदलीच्या प्रदेशातील प्राण्यांचे मांस,गार हवा, दिवसा झोपणे,उलटी रोकून धरणे, थंड पाण्याने आंघोळ, खूप वेळ उन्हात बसणे, विरुद्ध आहार, तेलकट आंबट गोड पदार्थ, पचायला जड अन्नपान हे करु नये. 

*******

उपचार - वमन, विरेचन, लेप, रक्तमोक्षण हे आयुर्वेदिक उपचार व वर दिलेल्या आहार विहार पाळले तर हा आजार पूर्णपणे कायमचा बरा होतो. 

**********


संदर्भ :भै. र. 55/45-55

Vd Pratibha Bhave 

8766740253

रक्तप्रदर (Abnormal Uterine Bleeding ) आयुर्वेदाने पुर्णपणे बरा होणारा आजार आहे

 आयुर्वेद शास्त्रानुसार रक्तप्रदर ह्या आजाराची अनेक कारणे आहेत 

1) आंबट,खारट,उष्ण, पचायला जड व तेलकट असे पदार्थ नेहमी, अधिक प्रमाणात व  खाणे.   अशा पदार्थांमध्ये दही, लोणची, पिझ्झा, चायनीज पदार्थ, भेळ, वडापाव, समोसे, कचोरी, मद्य, जलचर प्राण्यांचे, स्थूल प्राण्यांचे मांस अशा पदार्थांचा समावेश करता येईल. 

अशा पदार्थांनी शरीरातील रक्त अशुद्ध होते, त्यामध्ये पित्त अधिक वाढते. ह्या वाढलेल्या पित्ताचे गर्भाशयाच्या  ठिकाणी असलेल्या वातावर(अपान वायु) आवरण चढते(पित्तावृत्त अपान) व रक्तप्रदर हा आजार होतो. संदर्भ :-च. सं. चि. 28/230 सु.सं.नि.1/37

2) स्री मध्ये आधीच वात वाढलेला असेल व ती स्त्री वर नमूद केलेली पदार्थ अधिक प्रमाणात व वारंवार खात असेल तर रक्त दूषित होते. वाढलेला वात दूषित रक्ताला गर्भाशयाकडे नेतो. गर्भाशयातील रजःमध्ये  मिसळतो व अत्याधिक प्रमाणात  बाहेर येतो.  संदर्भ :च. सं. चि. 30/204-209

3) विरुद्ध आहार, वारंवार अजीर्ण, दिवसा झोपणे, अतिप्रवास,नेहमी अधिक चालणे, अधिक वजन उचलण्याची कामे करणे, गर्भपात, शोक करणे, अतिशय कृश होणे, गर्भाशयाला आघात, ह्या मुळे रक्तप्रदर होतो

 संदर्भ - माधवनिदान61/1,योगरत्नाकर स्रीरोग

4) रक्त अधिक प्रमाणात वाढणे ह्यामुळे सुद्धा प्रदर होतो. संदर्भ - अ. सं. सू. 19/7,भा.प्र.पू.7/61,63,

5) योनी रोगाच्या उपद्रव रूपात हा व्याधी होऊ शकतो. संदर्भ च. सं.चि. 30/39! अ. हृ. उ. 33/52


उपाय -

-रुग्णाची अवस्था, रोगाची अवस्था, वय ह्याचा विचार करुन विरेचन, बस्ति करावे

-बस्तिव विरेचनाने बरा होणारा हा आजार आहे. संदर्भ - अ. सं. चि. 3/78,79

-उत्तर बस्ति सर्व कारणाने होण्याऱ्या रक्तप्रदरा मध्ये फार उपयोगी आहे. 

संदर्भ :-च.सं.सि.9/62-65,अ.हृ.सू.19/70,77,78

-अशोकक्षीरपाक, जिरकावलेह, बोलपर्पटी, बोलबद्ध रस, चंद्रप्रभा, चंद्रकला, वसंतकुसूमाकर, पुष्यानुग चुर्ण, पत्रांगासव, अशोकारीष्ट अशी अवस्थेनुसार निरनिराळी औषधे दिली असता फायदा होतो. 

-पथ्यापथ्य सांभाळून औषध उपचार करावेत व आरोग्यासाठी प्रयत्नशील रहावे. 


Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 

8766740253

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...