Thursday, 22 September 2022

नेहमीच दुर्लक्षित असलेल्या व 24 तास काम करत असणाऱ्या मांसपेशी :- `पेल्विक फ्लोर मसल्स '- (#Pelvic floor muscles ) - च्या स्वास्थ्यासाठी

 ह्या मांसपेशी मुत्राशय,मुत्रमार्ग, आतडे, मलाशय, गुदद्वार, जननेंद्रिय, ह्या अवयवांना आपल्याला हवे संकुचित करणे व विस्तारीत करणे ह्या कार्यात भाग घेतात.    **ह्या मांसपेशी सैल झाल्यास- किंवा काही कारणाने क्षतिग्रस्त झाल्या तर आपोआप मुत्र गळणे, एकाएकी मल बाहेर येणे,मांसपेशी च्या वर असलेले अवयव खाली सरकणे (#rectocele,enterocele cystocele,urethrocele, uterine prolapse etc,) अशा तक्रारी निर्माण होतात. 

****ह्या पेशी खूप घट्ट झाल्यास त्यांना स्वतःच्या हालचाली साठी अडथळा येतो. त्यामुळे मलबद्धता होते, मुत्र  पुर्णपणे एकावेळी बाहेर येत नाही, मुत्र प्रवृत्ती च्या वेळी आग होणे दुखणे, जननेंद्रिय ला वेदना होणे ही लक्षणे निर्माण

*हया मांसपेशी घट्ट कींवा सैल होण्याची कारणे :-

-असे कोणतेही कारण ज्यामुळे ह्या पेशींवर सतत व खूप दिवसा पर्यंत ताण पडणे

1) जसे गर्भधारणा, डेलिव्हेरी 

2) जुना खोकला 

3) जुनी मलबद्धता 

4) मलप्रवृत्ति च्या वेळी जोर देणे

5) आजारामुळे, आॅपरेशन मुळे तेथे आज्ञा पोहोचवणाऱ्या नाडी क्षतिग्रस्त होणे, 

6) मेनोपॉज मध्ये ह्या मांसपेशी सैल होण्याच्या आजाराचे प्रमाण प्रत्येक 4 स्रियांपैकी 1स्री असे आहे.

#Endometriosis मध्ये ह्या मांसपेशी घट्ट होतात. 

7) अतिस्थौल्य

8) पुरुषांमध्ये अपघात, प्रोस्टेटग्रंथी वाढणे, त्या भागात आॅपरेशनस्, पॅरॅलिसिस सारखे आजार, जंतूसंसर्ग, कॅन्सर नंतर रेडियेशन उपचार  

वयानुसार हे आजार होतातच असे धरुन चालू नये. मांसपेशींचे स्वास्थ्य उपचारांना सुधारते 


-ह्या मांसपेशी च्या स्वास्थ्यासाठी - 

-दिनचर्या नेहमीच व सर्व आजारात महत्त्वाची आहे. आहार विहाराचे नियम पाळावे. चहा, कॉफी, अल्कोहोलयुक्त पदार्थ, स्मोकिंग टाळावे. 

-नियमितपणे व्यायाम करावा. वजन संतुलित राहण्यासाठी प्रयत्न करावे. 

- नियमीत पणे मलप्रवृत्ति ला जावे. मलप्रवृत्ति चांगली होण्यासाठी आहारात फळे, भाजीपाला, 10ml रोज साजूक तूप, असावे. 

-वैद्या च्या सल्ल्याने मात्राबस्ति, विरेचन पिचू, #उत्तरबस्ति, अवगाह हे उपचार करुन घ्यावे. ह्यामुळे त्या पेशी दृढ होतात. 

-ज्यांच्या अनेक डेलिव्हेरी झाल्या कींवा पाळी गेल्यावर ह्या मांसपेशींचे आरोग्य बिघडले असेल तर लवकरात लवकर उपचार घ्यावे.

-#कॅन्सर रुग्णांमध्ये रेडियेशन नंतर ही अवस्था निर्माण झाल्यास प्रतिसारण, अवगाह, पिचूधारण ह्या उपचाराने अवस्था सुखकर होते. 


***-ह्या आजारात लवकर उपचार करणे गरजेचे असते.


Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 

8766740253

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...