1) पित्ताचे आजार जसे अंगावर पुरळ फोड उठणे, अंगावर पित्त उठणे, चेहऱ्यावर वांग येणे, चेहऱ्याच्या त्वचेचा वर्ण बिघडणे, रक्त कमी होणे, अॅसिडीटी होणे, वारंवार मलप्रवृत्ति होणे, तोंडाला वारंवार फोड येणे, डोळ्यांची आग होणे,डोके दुखणे,
2) पाळी महिन्याच्या आत येणे, पाळीत रक्तस्रावावाचे प्रमाण अधिक असणे, वारंवार गर्भपात होणे ,शुक्र बीज विकार, अशा अनेक तक्रारी पित्त अधिक प्रमाणात शरीरात वाढले म्हणजे दिसून येतात.
3) वर्षाऋतु संपत आला आहे व शरदऋतुची चाहुल लागली म्हणजे कित्येक लोकांना पित्ताचे आजार सुरु होतात. #शरद ऋतुंमध्ये नैसर्गिक पणे, तसेच वातावरणाचा, आहारीय पदार्थांचा परीणामानने शरीरातील अतिरिक्त दूषित पित्त पातळ होते.
4) हे पातळ झालेले #पित्त जवळच्या मार्गाने शरीरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. अशावेळी विरेचन हे पंचकर्मापैकी एक कर्म केल्याने उत्तमरीत्या पित्ताचे संतुलन साधल्या जाते.
5) ज्यांना पित्ताचे आजार आहेत, किंवा ते आजार होऊ नये म्हणून आयुर्वेदाने सांगितलेले #विरेचन तसेच #रक्तमोक्षण कर्म (blood letting therapy ) शरदऋतुत नक्की करावे.
Vd Pratibha Bhave
BAMS MD Ayu
Obstetrics and gynecology
8766740253
No comments:
Post a Comment