आयुर्वेद शास्त्रानुसार रक्तप्रदर ह्या आजाराची अनेक कारणे आहेत
1) आंबट,खारट,उष्ण, पचायला जड व तेलकट असे पदार्थ नेहमी, अधिक प्रमाणात व खाणे. अशा पदार्थांमध्ये दही, लोणची, पिझ्झा, चायनीज पदार्थ, भेळ, वडापाव, समोसे, कचोरी, मद्य, जलचर प्राण्यांचे, स्थूल प्राण्यांचे मांस अशा पदार्थांचा समावेश करता येईल.
अशा पदार्थांनी शरीरातील रक्त अशुद्ध होते, त्यामध्ये पित्त अधिक वाढते. ह्या वाढलेल्या पित्ताचे गर्भाशयाच्या ठिकाणी असलेल्या वातावर(अपान वायु) आवरण चढते(पित्तावृत्त अपान) व रक्तप्रदर हा आजार होतो. संदर्भ :-च. सं. चि. 28/230 सु.सं.नि.1/37
2) स्री मध्ये आधीच वात वाढलेला असेल व ती स्त्री वर नमूद केलेली पदार्थ अधिक प्रमाणात व वारंवार खात असेल तर रक्त दूषित होते. वाढलेला वात दूषित रक्ताला गर्भाशयाकडे नेतो. गर्भाशयातील रजःमध्ये मिसळतो व अत्याधिक प्रमाणात बाहेर येतो. संदर्भ :च. सं. चि. 30/204-209
3) विरुद्ध आहार, वारंवार अजीर्ण, दिवसा झोपणे, अतिप्रवास,नेहमी अधिक चालणे, अधिक वजन उचलण्याची कामे करणे, गर्भपात, शोक करणे, अतिशय कृश होणे, गर्भाशयाला आघात, ह्या मुळे रक्तप्रदर होतो
संदर्भ - माधवनिदान61/1,योगरत्नाकर स्रीरोग
4) रक्त अधिक प्रमाणात वाढणे ह्यामुळे सुद्धा प्रदर होतो. संदर्भ - अ. सं. सू. 19/7,भा.प्र.पू.7/61,63,
5) योनी रोगाच्या उपद्रव रूपात हा व्याधी होऊ शकतो. संदर्भ च. सं.चि. 30/39! अ. हृ. उ. 33/52
उपाय -
-रुग्णाची अवस्था, रोगाची अवस्था, वय ह्याचा विचार करुन विरेचन, बस्ति करावे
-बस्तिव विरेचनाने बरा होणारा हा आजार आहे. संदर्भ - अ. सं. चि. 3/78,79
-उत्तर बस्ति सर्व कारणाने होण्याऱ्या रक्तप्रदरा मध्ये फार उपयोगी आहे.
संदर्भ :-च.सं.सि.9/62-65,अ.हृ.सू.19/70,77,78
-अशोकक्षीरपाक, जिरकावलेह, बोलपर्पटी, बोलबद्ध रस, चंद्रप्रभा, चंद्रकला, वसंतकुसूमाकर, पुष्यानुग चुर्ण, पत्रांगासव, अशोकारीष्ट अशी अवस्थेनुसार निरनिराळी औषधे दिली असता फायदा होतो.
-पथ्यापथ्य सांभाळून औषध उपचार करावेत व आरोग्यासाठी प्रयत्नशील रहावे.
Vd Pratibha Bhave
BAMS MD Ayu
Obstetrics and gynecology
8766740253
No comments:
Post a Comment