Wednesday, 5 February 2020

महिलांनो, तुमच्या चेहऱ्यावर वांग आहेत काय? ते का येतात? जाणून घ्या

  1. चेहऱ्यावर तांब्याच्या रंगाचे, लालसर, काळपट डाग उठतात त्याला वांग/व्यंग/chloasma/Melasma असे म्हणतात. 
  2. हे डाग melanin नावाच्या पदार्थांच्या आधिक्याने येतात. साधारणपणे स्त्रियांमध्ये वय 18 वर्षे - 50 वर्षे या काळात कधीही येऊ शकतात.
  3. ज्या स्त्रिया गर्भ निरोधनासाठी गोळया  केमिकल्स, इंजक्शन घेतात त्यांच्यामध्ये हे अधिक प्रमाणात दिसून येतात. हार्मोन्स च्या असंतुलनामुळे,  तसेच काहिंना गर्भिणी अवस्थेत दिसण्यास सुरवात होते.
  4. वांग येणे हे वंशपरंपरागने देखील दिसून येते. 
  5. ऊन्हात फिरल्याने, शरिरातील उष्णता वाढल्याने, चेहऱ्यावर केमिकल्स युक्त पदार्थांचा वापर, औषधाची अ‍ॅलर्जी ह्यामुळे सुध्दा वांग येतात. 
  6. हे डाग साधारणपणे गाल, वरच्या ओठाच्या वरच्या भागावरील त्वचा, मान, नाक, कपाळ ह्यावर येतात


वांग येऊ नये म्हणून 
  1. ऊन्हात जातांना सूर्यकिरण, सूर्यप्रकाश ह्यापासून त्वचेचे रक्षण करा. त्यासाठी स्कार्फ, छत्री, मोठ्या घेराची कॅप वापरा.   
  2. चेहऱ्यावर केमिकल्स युक्त क्लिनझर, साबणाचा वापर करु नका.  
  3. तिखट, चमचमीत, मिरचीचा ठेचा, लोणचे, फास्टफूड असे पदार्थ खाऊ नये. स्वास्थ्यासाठी उत्तम असा आहार विहार करावा. ऋतु नुसार आहार फळे भाजीपाला खावा. मानसिक स्वास्थ्य टिकेल असे बघावे. 


वांग निघून जाण्यासाठी  उपाय 
  1. प्रवाळ युक्त गुलकंद खावे
  2. दुधात शतावरी व अनंता उकळून घ्यावे
  3. अर्जून साल चुर्ण किंवा मंजिष्ठा चुर्ण लोण्यातून चेहऱ्याला लावावा
  4. ताप्यादी लोह घ्यावे
  5. पंचतिक्त क्षीरबस्ति घ्याव्या 
  6. जलोका रक्तमोक्षण (Leech Therapy) हे पंचकर्म करुन घ्यावे 

टीप :- वरिल सर्व उपचार वैद्यकीय सल्ल्याने करावे. 

मासिक पाळी नियमीतपणे यावी म्हणून

  1. नियमीतपणे सूर्यनमस्कार, योगासने करा.दिवसातून कमीत कमी दोन वेळा घाम काढा. 
  2. लवकर उठा व लवकर झोपा. जागरण करु नका. 
  3. शरिराचे वजन योग्य व नियंत्रणात ठेवा. 
  4. भारतीय अन्नपद्धती आचरणात आणा. 
  5. मानसिक तणाव टाळा,आनंदी रहा. 
  6. दिवसा झोपू नका. 
  7. भूक लागल्याशिवाय खाऊ नका व तहान लागल्याशिवाय पाणी पिऊ नका. 
  8. केमिकल्स हार्मोन्स युक्त पदार्थांचा वापर करु नका
  9. तिळ,जवस,उडीद, साजूक तूप, देशी गायीचे दूध, शतावरी ह्या पदार्थांचा आहारात समावेश करा. 
  10. पाळीच्या तक्रारी निर्माण झाल्यावर स्वतःच्या मनाने उपचार न करता स्त्रीरोगतज्ज्ञाचा सल्ला घ्या. 

केसांच्या आरोग्यासाठी

  1. बाहेर जातांना केसांमध्ये धुळ जाणार नाही ह्याची काळजी घ्या 
  2. रोज पोट चांगले साफ होऊन चांगली भूक लागल्यावर जेवण करा
  3. पोटाच्या तक्रारी असतील तर वैद्यांच्या सल्ल्यानुसार औषध घ्या पथ्यापथ्यानुसार वागा
  4. केस फार घासून धुऊ नका. धुण्यासाठी शिकेकाई किंवा आयुर्वेदिक औषधांचा वापर करा
  5. कोंढा होत असेल कापूर खोबरेल तेलात मिसळून केसांना लावा व त्यानंतर स्वच्छ धुवा. 
  6. केसांना नियमीत तेल लावा
  7. खोबरे,दूध,तूप,शतावरी,फळे, गुलकंद, प्रवाळपिष्टी असे पदार्थ नियमितपणे घ्या.

Monday, 27 January 2020

महिलांनो केस गळतात? केस पातळ झालेत? वय 40-50वर्षे आहे?

  1. वयाच्या ह्या कालावधीत शरीरातील हार्मोन्स मध्ये खूप बदल होतो त्यामुळे अनेक शारीरिक रचनात्मक व क्रियात्मक बदल होतो. पाळी जातांना केसांचा पोत बिघडतो, ते पातळ होतात व गळतात. केस धुतांना, विंचरताना मोठ्या प्रमाणात, गुच्छात गळून पडतात. 
  2. तरुण असतांना आपल्या शरिरातील योग्य प्रमाणात असलेल्या इस्ट्रोजन व प्रोजेस्टेराॅन मुळे केस दाट राहतात व भरभर वाढतात. पण पाळी जाण्याचे वय आले की हे हार्मोन्स कमी होतात,व testosterone नावाचे हार्मोन वाढते त्यामुळे डोक्यावरचे केस पातळ होतात, गळतात व काही स्त्रियांना चेहऱ्यावर केस येतात. 
  3. Testosterone ह्या हार्मोन ने डोक्याची केसांची मुळे(Hair follicles) संकुचित होतात व त्यामुळे केसांची वाढ खुंटते, गळतात, पातळ होतात. परंतु चेहऱ्यावर, हनुवटीवर केस येतात. 
  4. ह्याशिवाय शारिरीक व मानसिक तणाव, आजारपण, पोषक तत्त्वांची कमतरता, थायरॉइड असंतुलन इत्यादी कारणे असतील तर आणखीनच भर पडते.


आयुर्वेदिक उपचार
  1. तणाव कमी करा. 
  2. नियमीत व्यायाम करा. 
  3. केसांना नियमीतपणे आयुर्वेदिक तेल औषधी लावा जेणेकरून केसाची मुळे मजबुत होतील. 
  4. आयुर्वेदिक औषधांनी शिरोधारा, शिरोबस्ति घ्या
  5. आयुर्वेदिक तज्ञाकडून पंचतिक्त क्षीरबस्ति घ्या
  6. केसांसाठी  केमिकल्स शक्यतोवर वापरु नका, फार गरम ड्रायर, राॅडस् वापरु नका
  7. बाहेर जातांना केसांचे प्रदुषणापासून संरक्षण करा
  8. संतुलित आहार घ्या. आहारात देशी गायीचे तूप ठेवा. 
  9. आयुर्वेदिक रसायन औषधी घ्या. 

Who has reduced immunity?


Peoples with :-
1) More obese body (अतिस्थुल) 
2) More emaciated body (अतिकृश) 
3) Having loose muscle, abnormal blood and bone tissues(अन्यनिविष्टमांसशोणितास्थीनि) 
4) Weak( दुर्बल)
5) Nourished with unhealthy food ( असात्म्याहारोपचिता)
6) The intake of  less quantity food regularly (अल्पाहार) 
7) Having feeble mind (अल्पसत्व)

Ref - Charak Samhita Sutrasthana 28/7

MEMORY (स्मृति)

Do you want to sharpen your memory? 

"Remember these 8 points and follow it by heart." 

Acharya Charak says, there are   eight factors to bring about a good memory:

  1.  Knowledge of cause of a thing (निमित्त ) 
  2.  Knowledge of form of a thing (रुपग्रहणात) 
  3.  Knowledge of similarity( सादृश्यात्) 
  4.  Knowledge of contrast (विपर्यात्)
  5.  Concentration of mind(सत्वानुबंधात्) 
  6.  Practice(अभ्यासात्) 
  7.  Knowledge of Metaphysical knowledge (ज्ञानयोगात्) 
  8.  Seeing, listening and experiencing to something again and again (पुनःश्रुतात, दृष्टश्रुतानुभूतानां) 


Reference :Charak Samhita Sharirsthan 1/148-149

Wednesday, 1 January 2020

TO MAINTAIN YOUR HEALTH

Massage your foot daily :

Acharya Charak has described importance of daily foot massage.
Ref :Charak Samhita Sutrasthan 5/90-92
***************************************
  1. By massaging oil on the feet, roughness, immobility, dryness, tiredness and numbness goes away instantly. 
  2. It increases softness, strength and steadiness of feet 
  3. The eye sight becomes clear. 
  4. It relieves vitiated Vata. 
  5. It prevents from sciatica, cracking of feet, constriction of vessels and ligaments of feet. 

Regimen of diet according to Ayurveda (भोजन करण्याचे आयुर्वेदोक्त नियम)

1) काले – Food should be taken at the proper time, 2)   सात्म्ये-food should be familial, acceptable  3) शुचि – it should be clean 4) हितं -...