- वयाच्या ह्या कालावधीत शरीरातील हार्मोन्स मध्ये खूप बदल होतो त्यामुळे अनेक शारीरिक रचनात्मक व क्रियात्मक बदल होतो. पाळी जातांना केसांचा पोत बिघडतो, ते पातळ होतात व गळतात. केस धुतांना, विंचरताना मोठ्या प्रमाणात, गुच्छात गळून पडतात.
- तरुण असतांना आपल्या शरिरातील योग्य प्रमाणात असलेल्या इस्ट्रोजन व प्रोजेस्टेराॅन मुळे केस दाट राहतात व भरभर वाढतात. पण पाळी जाण्याचे वय आले की हे हार्मोन्स कमी होतात,व testosterone नावाचे हार्मोन वाढते त्यामुळे डोक्यावरचे केस पातळ होतात, गळतात व काही स्त्रियांना चेहऱ्यावर केस येतात.
- Testosterone ह्या हार्मोन ने डोक्याची केसांची मुळे(Hair follicles) संकुचित होतात व त्यामुळे केसांची वाढ खुंटते, गळतात, पातळ होतात. परंतु चेहऱ्यावर, हनुवटीवर केस येतात.
- ह्याशिवाय शारिरीक व मानसिक तणाव, आजारपण, पोषक तत्त्वांची कमतरता, थायरॉइड असंतुलन इत्यादी कारणे असतील तर आणखीनच भर पडते.
आयुर्वेदिक उपचार
- तणाव कमी करा.
- नियमीत व्यायाम करा.
- केसांना नियमीतपणे आयुर्वेदिक तेल औषधी लावा जेणेकरून केसाची मुळे मजबुत होतील.
- आयुर्वेदिक औषधांनी शिरोधारा, शिरोबस्ति घ्या
- आयुर्वेदिक तज्ञाकडून पंचतिक्त क्षीरबस्ति घ्या
- केसांसाठी केमिकल्स शक्यतोवर वापरु नका, फार गरम ड्रायर, राॅडस् वापरु नका
- बाहेर जातांना केसांचे प्रदुषणापासून संरक्षण करा
- संतुलित आहार घ्या. आहारात देशी गायीचे तूप ठेवा.
- आयुर्वेदिक रसायन औषधी घ्या.
No comments:
Post a Comment