Wednesday, 5 February 2020

महिलांनो, तुमच्या चेहऱ्यावर वांग आहेत काय? ते का येतात? जाणून घ्या

  1. चेहऱ्यावर तांब्याच्या रंगाचे, लालसर, काळपट डाग उठतात त्याला वांग/व्यंग/chloasma/Melasma असे म्हणतात. 
  2. हे डाग melanin नावाच्या पदार्थांच्या आधिक्याने येतात. साधारणपणे स्त्रियांमध्ये वय 18 वर्षे - 50 वर्षे या काळात कधीही येऊ शकतात.
  3. ज्या स्त्रिया गर्भ निरोधनासाठी गोळया  केमिकल्स, इंजक्शन घेतात त्यांच्यामध्ये हे अधिक प्रमाणात दिसून येतात. हार्मोन्स च्या असंतुलनामुळे,  तसेच काहिंना गर्भिणी अवस्थेत दिसण्यास सुरवात होते.
  4. वांग येणे हे वंशपरंपरागने देखील दिसून येते. 
  5. ऊन्हात फिरल्याने, शरिरातील उष्णता वाढल्याने, चेहऱ्यावर केमिकल्स युक्त पदार्थांचा वापर, औषधाची अ‍ॅलर्जी ह्यामुळे सुध्दा वांग येतात. 
  6. हे डाग साधारणपणे गाल, वरच्या ओठाच्या वरच्या भागावरील त्वचा, मान, नाक, कपाळ ह्यावर येतात


वांग येऊ नये म्हणून 
  1. ऊन्हात जातांना सूर्यकिरण, सूर्यप्रकाश ह्यापासून त्वचेचे रक्षण करा. त्यासाठी स्कार्फ, छत्री, मोठ्या घेराची कॅप वापरा.   
  2. चेहऱ्यावर केमिकल्स युक्त क्लिनझर, साबणाचा वापर करु नका.  
  3. तिखट, चमचमीत, मिरचीचा ठेचा, लोणचे, फास्टफूड असे पदार्थ खाऊ नये. स्वास्थ्यासाठी उत्तम असा आहार विहार करावा. ऋतु नुसार आहार फळे भाजीपाला खावा. मानसिक स्वास्थ्य टिकेल असे बघावे. 


वांग निघून जाण्यासाठी  उपाय 
  1. प्रवाळ युक्त गुलकंद खावे
  2. दुधात शतावरी व अनंता उकळून घ्यावे
  3. अर्जून साल चुर्ण किंवा मंजिष्ठा चुर्ण लोण्यातून चेहऱ्याला लावावा
  4. ताप्यादी लोह घ्यावे
  5. पंचतिक्त क्षीरबस्ति घ्याव्या 
  6. जलोका रक्तमोक्षण (Leech Therapy) हे पंचकर्म करुन घ्यावे 

टीप :- वरिल सर्व उपचार वैद्यकीय सल्ल्याने करावे. 

No comments:

Post a Comment

Ayurvedic Fertility Medicine - Fox Nut

मखान्न/मखाना Fox nut /Euryale ferox  मखान्नम् स्निग्ध वृष्यं च गर्भस्थापकं परम् l वातपित्त हरं बल्यं शीतं पित्तास्रदाह नुत् ll  आचार्य प्रिय...