Tuesday, 27 August 2024

खेळाडूंसाठी मालिश

 खेळाडूंची व्यायाम शक्ती वाढवण्यासाठी,अवयव व मांसपेशींची लवचिकता व शक्ती वाढवण्यासाठी

 विशिष्ट प्रकारचा मसाज  करावा लागतो.

*************

ह्या मसाज चे 5प्रकार आहेत

1)Effleurage (stroking) –

2)Petrissage (kneading) – 

3)Tapotement (Rhythmic Striking) 

4)Friction

5)Vibration


 ज्यांना खेळात रुची आहे त्यांनी हा मसाज करावा.

त्यामुळे:-

शरीराची लवचिकता वाढते 

इजा होण्यापासून संरक्षण होते

खेळात कामगिरी सुधार होतो

सहनशक्ती वाढते

इजा झाल्यास लवकर भरुन येताततसेच शरीरातील विषारी तत्त्व निघून जातात. रक्त प्रवाह सुधारतो , शरीराचे आवश्यक पोषण तत्वे व रक्त त्या अवयवापर्यंत उत्तम प्रकारे पोहचतात.

अंग दुखणे, थकवा येणे,मांसपेशी आखडणे हे बरे होत.

मनावरचा ताण कमी होतो, झोप छान येते, उत्साह येतो .

****************हा मसाज कधी करावा:-

*स्पर्धेच्या आधी 

*स्पर्धेच्या नंतर

*स्पर्धेसाठी शरीर नेहमीच तयार असावे म्हणून आठवड्यातून एक वेळा .

***************

Vd Pratibha Dhananjay Bhave 

8766740253

उन्माद (Insanity/Psychotic disturbed)

 उन्माद हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे.

हा आजार टाळता येण्यासारखा आहे.

************

 उन्माद कशामुळे व कसा होतो ? ह्याचे उत्तर संक्षेपात आयुर्वेदात पुढील प्रमाणे आहे.:-

संदर्भ:- अष्टांग हृदय उत्तरस्थान 6/2-5,59-60

*विकृत,अहितकर ,मलिन , न पचणारे , विषम अन्न खाणे, विष युक्त अन्नपान.

त्यामुळे शारीरिक वात, पित्त ,कफ बिघडल्याने

* रज तम गुण वाढवल्यामुळे मन दूषित होतात.

* शरीर व मनाने दुर्बल असलेली व्यक्ती,  चिंताग्रस्त ,शोक युक्त असेल, चित्त चंचल असेल तर मन आणखी दुर्बल होते.

*हे शारीरीक व मानसिक दूषित दोष दुर्बल मनाच्या मनुष्याच्या हृदयात जाऊन मग बुद्धीला दूषित करतात.

ह्यामुळे मनाचे कार्य करण्याची पूर्ण प्रणाली नष्ट होते.

* त्यामुळे  व्यक्ती ची बुद्धि, विज्ञान,स्मरणशक्ती भ्रमित  होते.व त्याला सुख - दुःख ह्यातील भेद कळत नाही व 

विनाकारण निरनिराळ्या विचित्र क्रिया करत राहतो.

***************

आयुर्वेद मते उन्माद हा मानसिक आजार आहे.

त्याचे 6प्रकार सांगितले आहेत.

वातपित्त बिघडल्याने होणारे- 4प्रकार  

मानसिक दुःखामुळे होणारा -1

विषामुळे होणारा -1

असे 6 प्रकार.

************

असे मानसिक आजार होऊ नये म्हणून:-

1)हितकर,ताजे,पवित्र, पचायला हलके, नियम पूर्वक भोजन करावे.मांस मद्य सेवन करु नये. 

2)प्रयत्न पूर्वक पवित्र राहावे. मनाचा सत्व गुण वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. 

*****************

Vd Pratibha Bhave Pune 

8766740253

बाळंतिणीला दूध भरपूर यावे म्हणून

 *भरपूर आराम करावा. कुठलेही शारीरिक व मानसिक कष्ट नको. भरपूर झोप घ्यावी.

*मन प्रसन्न ठेवावे.

*तिने जमेल तेवढे दूध प्यावे

*तेल तूप खावे

*लसूण कांदा खावा 

*शिंगाडा, नारळ, दुधी भोपळा, मोहाची फुले, कमलकाकडी, मासे, तीळगुळाचे लाडू, गहू, तांदूळ , यव धान्य खावे.

* दुर्वा,ऊस ह्यांच्या मुळ्या स्वच्छ कुटून धुऊन दुधात शिजवाव्या. ते दूध गाळून त्यात गुळ मिसळून प्यावे 

*शतावरी, विदारी कंद दूधात शिजवून प्यावे.

*अन्न पदार्थ पातळ,गोड, आंबट,खारट चवीचे खावे.

****************

संदर्भ:- काश्यप सूत्रस्थान 19/10-25

         भा.प्र. पू.4/11-13-15.

          यो. र. क्षीरदोष चि.

**************

Vd Pratibha Bhave 

Ayurvedic Gynaecologist Pune 

8766740253

बस्ती कर्म - लवकर म्हातारपण येऊ नये म्हणून

 *गुद मार्गाने निरनिराळी औषधी युक्त तेल, काढा,दूध , दिली जातात. रोग्याचे वय, आजाराचे स्वरुप,ऋतु, इत्यादींचा विचार करुन ती दिली जातात.

*बस्ती बालक, युवा, वृद्ध सर्वांना देता येते.

*निरोगी व्यक्तिला सुद्धा लवकर वृद्धावस्था येऊ नये ह्यासाठी बस्ती चिकित्सा अवश्य करावी. 

*बस्ती ही वयाचे स्थापन करते. म्हणजे वय वाढण्याची चिन्हे लवकर दिसत नाही,

जसे चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, 

वांग, केश पांढरे होणे, इंद्रिय शक्ती कमी होणे.

*बस्ती मुळे विशेषतः शुक्र वाढते तसेच शरीरातील ताकद वाढते(शुक्रबलप्रदश्च).

शरीराचा वर्ण सुधारतो. चेहऱ्याला टवटवीत पणा येतो.

*बस्ती मुळे शरीरात साठलेले सर्व विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर पडतात. सर्व शरीर त्यामुळे शुध्द होते . भूक योग्य प्रकारे लागते.शरीराला हलकेपणा येतो. मल मूत्र प्रवृत्ती योग्य प्रकारे होते.

* झाडाच्या मूळाला योग्य प्रकारे सिंचन केले,पाणी घातले तर त्याला छान कोवळी पालवी येते, योग्य वेळी फुले फळे येतात ,त्याचप्रमाणे योग्य प्रकारे बस्ती घेतल्यास शरीरातील प्रजोत्पादन शक्ती, शरीरातील सर्व अवयावघटक यांचे सर्व क्रिया सुरळीत होतात.

*पावसाळ्यात नक्कीच सर्वांनी बस्ती कर्म करावे.

****************

संदर्भ:- च. चि.1/27-28, च. सि.1/29-31

***************

Vd Pratibha Bhave 

BAMS Ayu MD Obstetrics and Gynaecology 

8766740253

Friday, 9 February 2024

गर्भधारणेसाठी आयुर्वेदिक उपचार (Ayurvedic Treatment in #Infertility)

विश्रांतवाडी पुणे येथील रुग्णा जुलै 2021 मध्ये गर्भ धारणा होत नाही म्हणून उपचारासाठी आमच्या क्लिनिक मध्ये आली.

*लग्नाला 3वर्षे झाली होती. वय 33वर्षे. आयटी मध्ये नोकरीला.

*1वर्षापासून INFRTILITY CENTRE मध्ये उपचार सुरु होते.

*तेथे IUI 3वेळा झाले होते पण गुण आला नाही. आता त्यांना IVF (test tube baby) करावे असे तेथील डॉक्टरांनी सांगितले.

* IUI च्या वेळी injunctions चा त्रास झाला म्हणून रुग्णा आमच्याकडे आली.

—----तपासणीत असे दिसून आले की,--------

*रुग्णाची पाळी 25ते 26दिवसात येत होती.

*जुन्या सोनोग्राफी रिपोर्ट्स मध्ये असे आढळले की त्यांचे folicals पूर्ण वाढ होण्याआधीच फुटतात.साधारणपणे 15 ते 16mm size. त्यामुळे endometrium सुद्धा चांगले तयार होत नव्हते.

*TB PCR endometrium negative होते.

*त्यांच्या पतीचे sperms फक्त 3%normal होते व 97% abnormal होते.

**दोघांनाही उपचाराची गरज आहे असे मी सांगितले. 

लाइफ स्टाइल,आहार ह्यात बदल केला.

**मिस्टरांचे विरेचन व बस्ति केली. 

**रुग्णाला बस्ती व उत्तरबस्ति केले.

**दोघांनाही रक्तशुद्धी करणारी, बीज सुधारणारे औषध दिली.

**हळूहळू पाळीत सुधारणा झाली. 

**जानेवारी 2022मध्ये गर्भधारणा झाली.

**17आठवड्यात ओटीपोटात ओढ बसत असल्याने,  

Sonography मध्ये गर्भाशय ग्रीवा फक्त 2.5cm आढळली,short cervix मुळे गर्भपाताची शक्यता किंवा पुर्ण दिवस न भरता प्रसूती होईल असे वाटले . असे घडू नये म्हणून  #cervical cerclage केले. 

***गर्भिणी अवस्थेत 9महिने आमची औषधी घेतली व तपासण्या व्यवस्थित केल्या. पोटात दुखायला लागले तेव्हा cerclage केलेला टाका काढून टाकला . छान कळा येऊन प्रसूती झाली.

**ऑक्टोबर 2022ला पूर्ण दिवसांचे 3450 gm वजनाचे गुटगुटीत बाळ जन्माला आले.

*बाळ बाळंतीण सुखरुप आहेत.**

#आयुर्वेद व आधुनिक विज्ञानाची कृपा.


Vd Pratibha Bhave ,

 Ayurvedic Gynaecologist 

Sukhkarta Ayurvedic Panchakarma Clinic Pune 8766748253

प्रयत्नांती परमेश्वर

* जून 2021 ला मुंबई वरुन पुण्याला आमच्याकडे उपचारासाठी एक रुग्णा आली. 

*वय 35 वर्षे.

*लग्नाला 7 वर्षे होऊन सुद्धा बाळ नव्हते. 

*त्या स्वतः M.D. आयुर्वेद होत्या.

* आधी 3वेळा गर्भ धारणा झाली, परंतु गर्भपात झाला होता.

*पहिला गर्भपात 7आठवडे ,दुसरा 8 आठवडे  , सोनोग्राफी मध्ये बाळाचे ठोके सुरू झाले होते परंतु नंतर रक्तस्त्राव सुरु झाला म्हणून D&C करावे लागले.

*तिसऱ्या वेळी गर्भ राहिला पण त्यात fetal pole नव्हते त्यामुळे तो सुद्धा काढावा लागला.


असा सर्व इतिहास त्या रुग्णाने सांगितला.

** त्यांची पाळी व्यवस्थित येत होती, इतर कुठलाच आजार नव्हता. Infection नव्हते.मिस्टरांचा semen analysis नॉर्मल होते.

** रुग्णाचा AMH हे 0.8 ng/ml असे होते. म्हणजे नॉर्मल पेक्षा कमी असल्यामुळे गर्भपात होतो , म्हणून डोनर घेऊन IVF हा एकच उपाय आहे असे इतर डॉक्टर्स चे मत होते .

***शेवटचा उपाय म्हणून त्या मोठया आशेने आल्या होत्या. विशेष म्हणजे मुंबईत पंचकर्म झाले होते पण गुण आला नाही असे त्या म्हणाल्या.

**पुण्यात आमच्या क्लिनिक मध्ये शास्त्रोक्त पद्धतीने पंचकर्म, #उत्तरबस्ति केले. 

***3 महिने व्यवस्थितपणे औषधी घेतल्यावर गर्भ ठेवायचा असे ठरले. त्याप्रमाणे ऑक्टोबर-2021 मध्ये गर्भधारणा झाली.गर्भिणी अवस्थेत 9 महिने आमची आयुर्वेदिक औषधे सुरु होती.

पुर्ण दिवसाचे स्वस्थ सुंदर 3250gms चे पुत्ररत्न जन्माला आले. गुण आला.

बाळ बाळंतीण सुखरुप आहेत.


Vd Pratibha Bhave

Ayurvedic Gynaecologist,

Sukhkarta Ayurvedic Panchakarma Clinic Pune 8766740253

तुम्ही मांसाहारी आहात? मग जाणून घ्या.

मज्जा  ( #bone marrow)  चे आयुर्वेद शास्त्रानुसार गुण व त्याचा शरीरासाठी उपयोग:-

*************

  • आहार,औषध, बस्ती रुपात मज्जा उपयोगी आहे. मज्जा  शरीरात कफ, मेद (fat), रस, मज्जा ताकद, बल, वीर्य वाढवतो
  • विशेषतः हाडे मजबूत करतो.
  • संपुर्ण शरीर स्निग्ध करतो.

***पण मज्जा कुणी खावी ह्याचे नियम आहेत.

विशेषत: 

  •  ज्याला कडकडून भूक लागते.
  • जो सतत शारीरिक कष्टाची कामे करतो
  •  उन्हात काम करणारे ,नेहमीच स्नेहपदार्थ खाणारे
  • ज्याला वात रोग आहेत
  • तसेच ज्यांना नेहमीच शौचाला कठीण होते, क्रूरकोष्ठी आहेत ह्यांनी मज्जा ह्या प्राणिज पदार्थाचा आहारात समावेश करता येतो.
  • #आयुर्वेद मते सर्व स्निग्ध पदार्थ हे प्राणिज व वनस्पति जन्य आहेत .

आयुर्वेदात ह्याचे मुख्यतः 4प्रकार केले आहेत.

1) घृत( ghreet )

2) तेल (oil) 

3) वसा (animal fat) 

4) मज्जा(bone marrow) 

 हे सर्व स्निग्ध पदार्थांत हे 4 प्रकार उत्तम आहेत कारण कोणतेही पदार्थ ह्या स्निग्ध पदार्थांमध्ये मिसळले की त्यांचे गुणधर्म ह्या स्निग्ध पदार्थात उतरतात . 


संदर्भ- चरक सूत्र 13/13 

**ह्या चार स्निग्ध पदार्थांमध्ये  घृत सर्वात श्रेष्ठ व त्यामानाने क्रमाने तेल,वसा, मज्जा कमी गुणवान आहेत.

**हे स्निग्ध पदार्थ औषधी स्वरुपात पोटात घेणे,मालिश, नस्य, बस्ति, साठी उपयोगी आहेत.


Vd Pratibha Bhave Pune,8766740253

Regimen of diet according to Ayurveda (भोजन करण्याचे आयुर्वेदोक्त नियम)

1) काले – Food should be taken at the proper time, 2)   सात्म्ये-food should be familial, acceptable  3) शुचि – it should be clean 4) हितं -...